जळगाव, दि.30 – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने जळगावात रस्त्यावरील खड्डे आणि मूलभूत सुविधांसंदर्भात सोमवारी जोरदार आंदोलन केले.
राष्ट्रवादीचे महानगराध्यक्ष अभिषेक पाटील यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले. यावेळी महापालिका प्रशासन व पदाधिकाऱ्यांन विरोधात जोरदार घोषणा देण्यात आल्या. त्याचबरोबर महापालिकेच्या मुख्य प्रवेश द्वाराजवळ ठिय्या आंदोलन करण्यात आले.
जळगाव शहरात रस्त्यांची झालेली दुर्दशा, चिखल, धूळीने जळगावकर त्रस्त झाले असून महापालिकेला मोठं कुलूप लावण्याची वेळ आली आहे. राज्यात जरी महा विकास आघाडीचे सरकार असले, तरी जळगावात महापालिकेवर शिवसेनेची सत्ता आहे. ते जर चुकीचे काम करत असतील तर आम्ही काय बघत राहायचं.. अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे महानगर अध्यक्ष अभिषेक पाटील यांनी दिली.
आंदोलना प्रसंगी देण्यात आलेल्या जोरदार घोषणांनी महापालिकेचा संपूर्ण परिसर दणाणून सोडला होता.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येत उपस्थित होते.