जळगाव, दि.२८ – के.सी.ई च्या पी.जी.महाविद्यालयात स्वच्छ भारत मिशनमध्ये तरुणांची भूमिका या विषयावर निबंध लेखन व पोस्टर प्रेझेंटेशन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. स्पर्धा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. व्ही. एस. झोपे व सुक्ष्मजीव विभाग प्रमुख प्रा.संदीप पाटील यांच्या उपस्थितीत पार पडली.
विद्यार्थ्यांनी विविध विषयांचे भित्तीपत्रके द्वारे अतिशय उत्तम प्रकारे सादरीकरण केले. स्वच्छ भारत संकल्पनेवर विद्यार्थ्यांनी रांगोळ्या काढल्या. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सुक्ष्मजीव विभागातील प्रा.धनश्री पाटील, प्रा. एकता फुसे व प्रसाद उंबरकर यांनी परिश्रम घेतले. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग घेतला.
स्पर्धेत क्रमांक प्राप्त करणारे गुणवंत विद्यार्थी..
निबंध स्पर्धेत प्रथम क्रमांक- जाधव गायत्री कैलास, द्वितीय- सूर्यवंशी प्राजक्ता संजय तर तृतीय क्रमांक- पाटील ऋतुजा योगेंद्रसिंग यांनी पटकावला. पोस्टर प्रेझेंटेशन स्पर्धेत प्रथम क्रमांक- पाटील रागिनी भागवत द्वितीय क्रमांक- सूर्यवंशी प्राजक्ता संजय, आणि तृतीय क्रमांक- सोनवणे मयुरी सुधीर यांनी पटकावला.