• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

न्या.चंद्रशेखर धर्माधिकारी व्याख्यानमालेत दुसरे पुष्प गुंफणार देवाजी तोफा

गडचिरोली जिल्ह्यातील मेंढा-लेखा गावाचा परिवर्तनाचा प्रवास उलगडणार

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
December 25, 2022
in जळगाव जिल्हा, सामाजिक
0
न्या.चंद्रशेखर धर्माधिकारी व्याख्यानमालेत दुसरे पुष्प गुंफणार देवाजी तोफा

जळगाव, दि.२५ – गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे आयोजित न्यायमूर्ती चंद्रशेखर धर्माधिकारी स्मृती व्याख्यानमालेमध्ये मागीलवर्षी डॉ. अभय बंग यांनी प्रथम पुष्प गुंफले होते. यावेळी श्री. देवाजी तोफा हे दुसरे पुष्प गुंफणार आहेत. ‘सर्व सहमति से ग्राम स्वराज की ओर’ याविषयावर ते संवाद साधतील. अवघ्या 500 लोकवस्ती असलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील मेंढा-लेखा गावाचा रौचक इतिहासासह परिवर्तनाची प्रेरक कहाणी काही महत्त्वाच्या आठवणींचे क्षण उलगडणार आहेत.

जैन हिल्समधील गांधी तिर्थ येथील कस्तूरबा सभागृहामध्ये दि. २७ डिसेंबर ला संध्याकाळी ४ वाजेला देवाजी तोफा व्याख्यानात मार्गदर्शन करतील. याप्रसंगी प्रमुख उपस्थिती म्हणून गांधी रिसर्च फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ. अनिल काकोडकर, गुजरात विद्यापीठाचे माजी कुलगुरू तथा गांधी रिसर्च फाऊंडेशनचे संचालक डॉ. सुदर्शन आयंगार, गांधी रिसर्च फाऊंडेशनचे संचालक तथा जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांची असेल. वरिष्ठ गांधीयन न्या. चंद्रशेखर धर्माधिकारी यांच्यात तत्वनिष्ठता, सज्जनता आणि विवेकशीलता यांचा संगम होता. गांधी रिसर्च फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष म्हणून न्यायमूर्ती चंद्रशेखर धर्माधिकारी यांनी कार्य केले आणि सर्वोदय समाज घडविण्यासाठी दिशा दिली. त्यांच्या सन्मानार्थ २०२१ पासून गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे व्याख्यानमाला आयोजित केली जात आहे.

मागील वर्षी डॉ. अभय बंग यांनी मार्गदर्शन केले तर यावर्षी श्री. देवाजी तोफा दुसरे पुष्प गुंफतील. वन अधिकार कानून – २००६ नुसार २००९ मध्ये सामुहिक वन अधिकार पत्र प्राप्त करणारे गडचिरोली जिल्ह्यातील मेंढा-लेखा ही ग्रामसभा देशातील पहिली ठरली होती. यावेळी ‘दिल्ली, मुंबई हमारी सरकार, हमारे गाव में हम ही सरकार’ याचा बुलंद आवाज सार्थक करणारे मेंढा-लेखा गावाचे नायक देवाजी तोफा हे ‘सर्व सहमति से ग्राम स्वराज की ओर’ या विषयावर संवाद साधणार आहे. यावेळी मेंढा-लेखा गावात झालेल्या परिवर्तनिय बदलांविषयीची रोचक माहिती न्या. चंद्रशेखर धर्माधिकारी यांच्या स्मृति व्याख्यानाप्रसंगी उपस्थितांना देवाजी तोफा अवगत करतील.

ग्रामीण भागाच्या विकासाच्या दृष्टीने ग्रामसभा व ग्रामपंचायत यांचे अधिकार, कर्तव्य, जबाबदाऱ्यांविषयी ते अवगत करतील. कुणीही न चुकवावे असे या व्याख्यानात ग्रामसभेचे महत्त्व त्यातील बाराकावे समजण्यासाठी ग्रामपंचायत अधिकारी, सदस्य, सरपंच, राज्यशास्त्राचे विद्यार्थी यासह आदिवासी भागातील बंधू-भगिनींना अभ्यासपूर्ण माहिती श्री. देवाजी तोफा यांच्या व्याख्यानातून मिळेल. त्यामुळे व्याख्यानाप्रसंगी उपस्थितीत राहण्याचे आवाहन गांधी रिसर्च फाऊंडेशनच्या वतीने करण्यात आले आहे.


 

Next Post
पत्रकार दिनानिमित्तान अमळनेरात रंगणार हास्स्य कविसंमेलन

पत्रकार दिनानिमित्तान अमळनेरात रंगणार हास्स्य कविसंमेलन

ताज्या बातम्या

आषाढी एकादशीनिमित्त पालखी, दिंडी व सांस्कृतिक कार्यक्रम अनुभूती बाल निकेतनमध्ये उत्साहात
शैक्षणिक

आषाढी एकादशीनिमित्त पालखी, दिंडी व सांस्कृतिक कार्यक्रम अनुभूती बाल निकेतनमध्ये उत्साहात

July 25, 2026
आषाढी एकादशीनिमित्त गोदावरी इंग्लिश मीडियम सीबीएसई स्कूलमध्ये भक्तिमय जल्लोष
जळगाव जिल्हा

आषाढी एकादशीनिमित्त गोदावरी इंग्लिश मीडियम सीबीएसई स्कूलमध्ये भक्तिमय जल्लोष

July 25, 2026
विठ्ठलनामाच्या गजरात अनुभूती स्कूलमध्ये आषाढी एकादशी उत्साहात
जळगाव जिल्हा

विठ्ठलनामाच्या गजरात अनुभूती स्कूलमध्ये आषाढी एकादशी उत्साहात

July 24, 2026
निवृत्तीवेतनधारकांसाठी ‘महा-उपलब्धी’ मोबाईल ॲप; शासनाच्या डिजिटल सुविधांचा लाभ घेण्याचे आवाहन
जळगाव जिल्हा

निवृत्तीवेतनधारकांसाठी ‘महा-उपलब्धी’ मोबाईल ॲप; शासनाच्या डिजिटल सुविधांचा लाभ घेण्याचे आवाहन

July 24, 2026
गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंग एनएसएस विभागातर्फे हरीत यज्ञ उत्साहात
जळगाव जिल्हा

गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंग एनएसएस विभागातर्फे हरीत यज्ञ उत्साहात

July 24, 2026
मेंदूज्वर झालेल्या १३ वर्षीय बालकावर यशस्वी उपचार
आरोग्य

मेंदूज्वर झालेल्या १३ वर्षीय बालकावर यशस्वी उपचार

July 24, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add