• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

राज्यातील कोविड परिस्थितीचा मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा

कोविड परिस्थिती नियंत्रणात; नागरिकांनी घाबरून जाऊ नये

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
December 22, 2022
in आरोग्य, जळगाव जिल्हा
0
राज्यातील कोविड परिस्थितीचा मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा

नागपूर, दि.२२ – जगातील कोरोनाच्या उद्रेकाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातदेखील खबरदारी घेण्यात येत आहे. नागरिकांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहन करतानाच सर्व पालकमंत्र्यांनी आपापल्या जिल्ह्यांमध्ये आरोग्य सुविधा सज्ज राहतील याची दक्षता घ्यावी. त्याचप्रमाणे मुख्य सचिवांनी देखील तातडीने सर्व जिल्हाधिकाऱ्यांशी संवाद साधून कोविड अनुरूप वर्तन पंचसुत्रीचे काटेकोर पालन होईल, हे पाहण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिले.

मंत्रिमंडळ बैठकीपूर्वी मुख्यमंत्र्यांनी विधानभवनात विशेष बैठकीत राज्यातील कोविड परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीष महाजन, आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत, अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड, मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव आदी यावेळी उपस्थित होते.

राज्यातील कोविड परिस्थिती पूर्ण नियंत्रणात असली तरी आंतरराष्ट्रीय पातळीवर मात्र चीन, जपान, अमेरिका, ब्राझील या देशांमध्ये रुग्ण वाढताना दिसत आहेत. चीनमध्ये कोविड विषाणूचा बीएफ.७ हा प्रकार अधिक वेगाने वाढताना आढळत आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील जनुकीय क्रमनिर्धारण व्यवस्थेची माहिती आणि आढावा यावेळी घेण्यात आला.

आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. संजय खंदारे यांनी कोविड परिस्थितीबाबत सादरीकरण केले. राज्यात सध्या २२१६ कोविड रुग्णालये असून १ लाख ३४ हजार विलगीकरण खाटा असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

चाचण्या, ट्रॅकींग, उपचार, लसीकरण आणि कोविड अनुरूप वर्तन अशी पंचसुत्री राबविण्याचे केंद्र शासनाने निर्देश दिले आहेत. त्यानुसार सर्व जिल्ह्यांमध्ये पंचसुत्रीची अमंलबजावणी करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.

 


 

Next Post
जैन इरिगेशनचा ‘बेस्ट इनिशिएटिव्ह अवार्ड’ने गौरव

जैन इरिगेशनचा 'बेस्ट इनिशिएटिव्ह अवार्ड'ने गौरव

ताज्या बातम्या

पती जेवणासाठी बाहेर गेले असताना १८ वर्षीय विवाहितेची आत्महत्या
गुन्हे

पती जेवणासाठी बाहेर गेले असताना १८ वर्षीय विवाहितेची आत्महत्या

September 23, 2026
गणेशोत्सवातून लोकसंवाद; पोस्टल योजनांची माहिती नागरिकांपर्यंत* *गणेश फेस्टिवल पोस्टल नाईट कॅम्पला गणेशभक्तांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
खान्देश

गणेशोत्सवातून लोकसंवाद; पोस्टल योजनांची माहिती नागरिकांपर्यंत* *गणेश फेस्टिवल पोस्टल नाईट कॅम्पला गणेशभक्तांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

September 23, 2026
वॉटर मीटरच्या सदोष कारभारावरून महापौरांनी केली कंत्राटदाराची कानउघाडणी
खान्देश

वॉटर मीटरच्या सदोष कारभारावरून महापौरांनी केली कंत्राटदाराची कानउघाडणी

September 23, 2026
सेवा मंडळासमोरील विसर्जन मार्गावरील खड्ड्यांवरून महापौर दीपमाला काळे आक्रमक; मक्तेदाराला दूरध्वनीवरून धरले धारेवर..!
खान्देश

सेवा मंडळासमोरील विसर्जन मार्गावरील खड्ड्यांवरून महापौर दीपमाला काळे आक्रमक; मक्तेदाराला दूरध्वनीवरून धरले धारेवर..!

September 23, 2026
अवैध वाळू वाहतुकीवर पोलिसांचा दणका; डंपर, ट्रॅक्टरसह साडेचार लाखांचा मुद्देमाल जप्त
गुन्हे

उसनवारीचे पैसे मागितलेच्या रागातून महिलेच्या गळ्यावर ब्लेडने वार; संतप्त नागरिकांकडून संशयिताला चोप 

September 23, 2026
पोलिस असल्याची बतावणी करत वृद्ध व्यावसायिकाचे दागिने लंपास
गुन्हे

पोलिस असल्याची बतावणी करत वृद्ध व्यावसायिकाचे दागिने लंपास

September 23, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add