• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

सासर आणि माहेरची बाजू जर समजून घेतली तर दोघीकडे स्वर्ग निर्माण होऊ शकतो.. – प्रल्हाद महाराज

मेहरुणमध्ये कीर्तन सप्ताहाचा दुसऱ्या दिवशी नागरिकांचा प्रतिसाद

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
November 17, 2022
in जळगाव जिल्हा, धार्मिक
0
सासर आणि माहेरची बाजू जर समजून घेतली तर दोघीकडे स्वर्ग निर्माण होऊ शकतो.. – प्रल्हाद महाराज

जळगाव, दि. १७ – महिलेला माहेरी सुख असतं तर सासरी दुःख असतं असं चित्र निर्माण केलं जातं. मात्र दोन्ही बाजूने जर समजून घेतलं तर स्वर्ग निर्माण होतो. त्यामुळे जसा मुलीचा आदर असतो तसा सुनेचा आदर असावा. जसा आईचा आदर आहे तसा सासूचा देखील आदर असावा, असे मार्गदर्शन कळमसरे येथील ह.भ.प. प्रल्हाद महाराज यांनी केले.

मेहरूण प्रभागामध्ये श्री संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळा प्रित्यर्थ अखंड हरिनाम कीर्तन सप्ताह तथा संगीतमय श्रीमद् भागवत कथेचे आयोजन १५ नोव्हेंबर ते २२ नोव्हेंबर दरम्यान करण्यात आले आहे. सप्ताहाचे २२ वे वर्षे आहे. दुसऱ्या दिवशी बुधवारी रात्री कळमसरे येथील कीर्तनकार हभप प्रल्हाद महाराज यांनी प्रभावी शैलीमध्ये भाविकांचे प्रबोधन केले.

प्रल्हाद महाराज पुढे म्हणाले की, आयुष्यामध्ये माणूस पुढे जाण्यासाठी नेहमी प्रयत्न करीत असतो. हे प्रयत्न करीत असताना त्यांना अनेकदा अपयशाचे तडाखे सहन करावे लागतात. मात्र अपयश ही यशाची पायरी आहे, नेहमी विसरता कामा नये. यश आहे तर अपयश आहे. अपयश आहे तेथे शिकवण आहे. कुठल्याही कामामध्ये जीव ओतून काम करा, असेल मरगळ तर निघून जाईल आणि हाती घेतलेले काम यशस्वी होईल असा मूलमंत्र हभप प्रल्हाद महाराजांनी दिला.

सासर-माहेरची व्याख्या समजावून सांगत लखन महाराजांनी, प्रत्येक महिलेला आयुष्यात त्रास होतो मात्र हा त्रास न वाटून घेता त्याचे निराकरण सोप्या पद्धतीने केले व प्रत्येकाने आपल्या घरातील स्त्रीला समजून घेतले तर प्रत्येक घरात स्वर्गाचे नंदनवन निर्माण होईल असे त्यांनी कीर्तनात सांगितले.

यावेळी आयोजक नगरसेवक प्रशांत नाईक यांच्यासह मेहरुण परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. शुक्रवारी दिनांक १८ नोव्हेंबर रोजी रात्री ८ वाजता शेळगाव येथील दीपक महाराज कीर्तन करणार आहेत.

Next Post
किर्तन परंपरा जोपासण्यासाठी तरुणांनी पुढे आले पाहिजे.. – दिनेश महाराज

किर्तन परंपरा जोपासण्यासाठी तरुणांनी पुढे आले पाहिजे.. - दिनेश महाराज

ताज्या बातम्या

आपत्ती व्यवस्थापनात सर्व यंत्रणांनी ‘ॲक्शन मोड’ मध्ये काम करावे – मंत्री गिरीश महाजन
महाराष्ट्र

आपत्ती व्यवस्थापनात सर्व यंत्रणांनी ‘ॲक्शन मोड’ मध्ये काम करावे – मंत्री गिरीश महाजन

July 30, 2025
‘एक पेड माँ के नाम’ उपक्रमांतर्गत वृक्षारोपण मोहीमेला सुरुवात; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते शुभारंभ
जळगाव जिल्हा

‘एक पेड माँ के नाम’ उपक्रमांतर्गत वृक्षारोपण मोहीमेला सुरुवात; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते शुभारंभ

July 30, 2025
संत ज्ञानेश्वर विद्यालयात आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिन आणि नागपंचमीचा अनोखा संगम
जळगाव जिल्हा

संत ज्ञानेश्वर विद्यालयात आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिन आणि नागपंचमीचा अनोखा संगम

July 30, 2025
जळगावात यंदा ११ वर्षांखालील राष्ट्रीय बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेचे महासंग्राम!
क्रिडा

जळगावात यंदा ११ वर्षांखालील राष्ट्रीय बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेचे महासंग्राम!

July 29, 2025
प्रधानमंत्री सूर्यघर योजनेतील उत्कृष्ट कामगिरीसाठी महावितरणचा ‘बिझनेस टायटन्स’ पुरस्काराने सन्मान
जळगाव जिल्हा

प्रधानमंत्री सूर्यघर योजनेतील उत्कृष्ट कामगिरीसाठी महावितरणचा ‘बिझनेस टायटन्स’ पुरस्काराने सन्मान

July 29, 2025
रावेर पोलिसांची यशस्वी कामगिरी; अल्पवयीन मुलीचे अपहरण करणाऱ्या तरुणाला अटक
खान्देश

रावेर पोलिसांची यशस्वी कामगिरी; अल्पवयीन मुलीचे अपहरण करणाऱ्या तरुणाला अटक

July 29, 2025
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group