• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

कलावंत राजू बाविस्कर, विजय जैन यांना ‘फायनेक्स्ट- २०२२’ मध्ये पुरस्कार

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
September 12, 2022
in जळगाव जिल्हा
0
कलावंत राजू बाविस्कर, विजय जैन यांना ‘फायनेक्स्ट- २०२२’ मध्ये पुरस्कार

जळगाव, दि.१२ – मध्यप्रदेशातील भोपाळ येथील यशस्विनी शिक्षा संस्थानच्या ‘फायनेक्स्ट ॲवॉर्ड ॲण्ड इंटरनॅशनल एक्जीबीशन ऑफ मिनी आर्टवर्क-२०२२’ मध्ये मानाचा श्री. एस.के.बाकरे इंटरनॅशनल ॲवॉर्ड जळगाव जिल्ह्यातील चित्रकार राजू बाविस्कर यांना तर जैन इरिगेशनमधील कला विभागातील सहकारी विजय जैन यांना ‘हायली रेकेमेंडेड ॲवॉर्ड’ जाहीर झाला आहे.

उल्लेखनीय बाब म्हणजे या प्रदर्शनात जैन इरिगेशनमधील कला विभागातील सहकारी विकास मल्हारा आणि आनंद पाटील यांचे पेंटिंग्जसुध्दा प्रदर्शित करण्यात आली आहेत.
राजू बाविस्कर यांच्या चित्रांची ललित कला अकादमीने दखल घेतली असून त्यांच्या चित्रांना बॉम्बे आर्ट सोसायटी, ऑल इंडिया आर्ट अँड क्राफ्ट सोसायटी, कॅम्लिन आणि साऊथ सेंट्रल झोन यांचे पुरस्कार मिळाले आहेत.

विजय जैन यांच्या चित्रांची दोन वेळा ललित कला अकादमी, आर्ट सोसायटी ऑफ इंडिया, टागोर नॅशनल प्रदर्शन, भारत भवन, राज्य कला संचालनालय मुंबई यांनी दखल घेतली असून ऑल इंडिया फाइन आर्ट्स अँड क्राफ्ट सोसायटी चा २०२२ चा पुरस्कार मिळाला आहे. देश विदशातून आलेल्या शेकडो पेंटिंग्ज, शिल्प, ड्रॉइंग, ग्राफिक्स आणि फोटोज् मधून निवडक कलाकृती मधून १४ कलाकृतींना गौरवण्यात आले आहे.

२१ सप्टेंबर पर्यंत इंदोर मधील कॅनेरिज फाइन आर्ट गॅलरी मधे चालणाऱ्या प्रदर्शनाचे उद्घाटन आणि पुरस्कार वितरण सोहळा १७ सप्टेंबर रोजी सायंकाळी पार पडणार आहे. खान्देशातील चित्रकलेतील या कामगिरीबद्दल जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन, परिवर्तनचे अध्यक्ष शंभू पाटील यांच्यासह कला क्षेत्रातील मान्यवरांनी चित्रकारांचे अभिनंदन केले.

Next Post
महात्मा गांधीजींची ती सायकल आता गांधीतीर्थमध्ये !

महात्मा गांधीजींची ती सायकल आता गांधीतीर्थमध्ये !

ताज्या बातम्या

जैन इरिगेशनच्या कृषी महोत्सवास शेतकऱ्यांचा प्रतिसाद
कृषी

जैन इरिगेशनच्या कृषी महोत्सवास शेतकऱ्यांचा प्रतिसाद

January 19, 2026
राष्ट्रीय योगासन स्पर्धेत आर्टिस्टिक पेअरमध्ये महाराष्ट्र आघाडीवर
क्रिडा

राष्ट्रीय योगासन स्पर्धेत आर्टिस्टिक पेअरमध्ये महाराष्ट्र आघाडीवर

January 18, 2026
चोपड्याच्या जिरायत पाडा येथे अंनिसतर्फे चमत्कारांचे सादरीकरण, प्रबोधन
जळगाव जिल्हा

चोपड्याच्या जिरायत पाडा येथे अंनिसतर्फे चमत्कारांचे सादरीकरण, प्रबोधन

January 18, 2026
एसटी प्रशासनाचा ‘रामभरोसे’ कारभार; डोळ्यासमोर बस असूनही चौकशी खिडकीतून प्रवाशांची दिशाभूल!
खान्देश

एसटी प्रशासनाचा ‘रामभरोसे’ कारभार; डोळ्यासमोर बस असूनही चौकशी खिडकीतून प्रवाशांची दिशाभूल!

January 18, 2026
जळगावात २३ जानेवारीपासून ‘बहिणाबाई महोत्सवा’चा जागर; खाद्यसंस्कृती आणि मनोरंजनाची मेजवानी
खान्देश

जळगावात २३ जानेवारीपासून ‘बहिणाबाई महोत्सवा’चा जागर; खाद्यसंस्कृती आणि मनोरंजनाची मेजवानी

January 18, 2026
“जळगावकरांचा विश्वास सार्थ ठरणार, प्रभागाचा विकास हेच आमचे ध्येय” – विष्णू भंगाळे
खान्देश

“जळगावकरांचा विश्वास सार्थ ठरणार, प्रभागाचा विकास हेच आमचे ध्येय” – विष्णू भंगाळे

January 18, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group