• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

बहिणाईंच्या साहित्यात माणूसकीचा मार्ग.. – माजी कुलगुरू डॉ.सुदर्शन अय्यंगार

बहिणाई स्मृती संग्रहालयात बहिणाईंची जयंती साजरी

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
August 24, 2022
in जळगाव जिल्हा
0
बहिणाईंच्या साहित्यात माणूसकीचा मार्ग.. – माजी कुलगुरू डॉ.सुदर्शन अय्यंगार

जळगाव, दि.२४ – कवयित्री बहिणाबाई चौधरी ह्या जरी निरक्षर होत्या मात्र त्यांच्या साहित्यातून त्या ज्ञानी आहेत, ज्ञानाला पुस्तकाची किंवा कोणत्याही विद्यापीठाची गरज नसते तर जीवनातील व्यवहारज्ञानातून माणूसकीचा मार्ग आपल्याला मिळतो, हाच माणूसकीचा मार्ग बहिणाईंच्या साहित्यात दिसतो. बहिणाई निसर्गाशी संवाद साधतात आणि पृथ्वीच्या आरशात स्वर्ग पाहतात हे तत्वज्ञान पुढील पिढीला माणुसकीला मार्गदर्शक ठरेल असे प्रतिपादन गुजरात विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ.सुदर्शन अय्यंगार यांनी केले.

जुने जळगावमधील चौधरीवाड्यातील बहिणाबाई मेमोरियल ट्रस्टच्या बहिणाई स्मृती संग्रहालयात बहिणाईंची १४२ वी जयंती साजरी करण्यात आली. त्याप्रसंगी माजी कुलगुरू डॉ.सुदर्शन अय्यंगार प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. यावेळी बहिणाईंच्या नातसून पद्माबाई चौधरी, पणतसून स्मिता चौधरी, खापर पणतू देवेश चौधरी, विश्वस्त दिनानाथ चौधरी, ज्ञानेश्वर शेंडे, विजय जैन, हर्षल पाटील, अशोक चौधरी उपस्थित होते. सुदर्शन अय्यंगार व पद्माबाई चौधरी यांच्याहस्ते बहिणाईंच्या प्रतिमेला माल्यार्पण व पुजन करण्यात आले. यावेळी मुंबईच्या मनिषा कोल्हे, आदिती त्रिवेदी, रिती शहा, देवेंद्र पाटील यांच्यासह चौधरी वाड्यातील परिवारातील सदस्यांनी बहिणाईंना अभिवादन केले.

अनुभूती निवासी स्कूलमधील इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी लेखक, साहित्यिकांच्या निवासस्थानी जाऊन त्यांचे साहित्य अभ्यासले. यावेळी त्यांना मराठी शिक्षक हर्षल पाटील यांनी मार्गदर्शन केले. विजय जैन यांनी बहिणाईंच्या साहित्यावर आपले विचार मांडले. विद्यार्थ्यांनी बहिणाईंच्या कविता सादर केला. मनपा शिक्षिका पुष्पा साळवे यांनी बहिणाईंवर स्व:लिखीत कविता सादर केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन, प्रस्तावना ज्ञानेश्वर शेंडे यांनी केली तर अशोक चौधरी यांनी आभार मानले. यशस्वीतेसाठी अशोक चौधरी, देवेंद्र पाटील, ललित हिवाळे, प्रशांत पाटील, दिनेश थोरवे यांनी सहकार्य केले.

Next Post
भवरलाल अ‍ॅण्ड कांताबाई जैन फाऊंडेशनतर्फे साहित्य कला पुरस्कार जाहीर

भवरलाल अ‍ॅण्ड कांताबाई जैन फाऊंडेशनतर्फे साहित्य कला पुरस्कार जाहीर

ताज्या बातम्या

डॉ. उल्हास पाटील रुग्णालयातील शस्त्रक्रिया विभागाच्या टीमचे यश
आरोग्य

डॉ. उल्हास पाटील रुग्णालयातील शस्त्रक्रिया विभागाच्या टीमचे यश

October 13, 2026
नाकाबंदीत इनोव्हासह १५.३३ लाखांचा गुटखा जप्त; चाळीसगावचा वाहनचालक ताब्यात
गुन्हे

नाकाबंदीत इनोव्हासह १५.३३ लाखांचा गुटखा जप्त; चाळीसगावचा वाहनचालक ताब्यात

October 13, 2026
जिल्हास्तरीय मनपा कॅरम स्पर्धेत दुर्गेश्वरी धोंगडे विजेती!
क्रिडा

जिल्हास्तरीय मनपा कॅरम स्पर्धेत दुर्गेश्वरी धोंगडे विजेती!

October 13, 2026
नवरात्रीच्या उपवासादरम्यान नऊ वर्षीय खुशीचा मृत्यू; नशिराबादमध्ये शोककळा
खान्देश

नवरात्रीच्या उपवासादरम्यान नऊ वर्षीय खुशीचा मृत्यू; नशिराबादमध्ये शोककळा

October 13, 2026
जैन हिल्स येथील जलसंधारण क्षेत्रभेटीतून जल व्यवस्थापनाचा अनुभवला वस्तूपाठ
खान्देश

जैन हिल्स येथील जलसंधारण क्षेत्रभेटीतून जल व्यवस्थापनाचा अनुभवला वस्तूपाठ

October 13, 2026
नवरात्रोत्सव आणि धार्मिक मिरवणुकांच्या पार्श्वभूमीवर आठवडी बाजार बंदचे आदेश
खान्देश

नवरात्रोत्सव आणि धार्मिक मिरवणुकांच्या पार्श्वभूमीवर आठवडी बाजार बंदचे आदेश

October 13, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add