जळगाव, दि.26- मेंदूची किचकट अशी फ्लोडायव्हर्टर शस्त्रक्रिया यशस्वी करण्यात जळगावातील एक्साॅन ब्रेन हॉस्पिटलचे डॉक्टर नीलेश किनगे यांना यश आलयं.
पाचोरा येथील वनराज समाधान भोई वय वर्षे 38 यांना अचानक डोकेदुखी आणि चक्कर येऊन ते बेशुद्ध पडले होते. त्यानंतर त्यांना डॉक्टर नीलेश किनगे यांच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले.
दरम्यान सर्व तपासण्या केल्या नंतर रुग्णावर मेंदूची फ्लोडायव्हर्टर शस्त्रक्रिया करण्यात आली.
खान्देशात प्रथमच अशी कीचकट शस्त्रक्रिया करण्यात आली असल्याचा दावा डॉक्टर निलेश किनगे यांनी केला. दरम्यान रुग्णाची प्रकृती आता सामान्य असून भविष्यात होणारा जीवाचा धोका पूर्णपणे नाहीसा झाला असल्याचे देखील डॉक्टर किनगे यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले.
डॉक्टरांनी माझे प्राण वाचवले असून मी त्यांचा आभारी आहे अशी प्रतिक्रिया वनराज भोई यांनी दिली. मेंदूच्या किचकट शस्त्रक्रियेसाठी रुग्णांना पुणे, मुंबई अशा मोठ्या शहरात जावे लागत होते. मात्र डॉक्टर निलेश किनगे यांनी जळगावात ही किचकट शस्त्रक्रिया यशस्वी केल्याने रुग्णांच्या नातेवाईकांनी डॉक्टर किनगे यांचे आभार मानले.