• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

संत ज्ञानेश्वर विद्यालयात टाळ मृदंगाच्या गजरात विद्यार्थ्यांनी काढली दिंडी

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
July 9, 2022
in धार्मिक, शैक्षणिक
0
संत ज्ञानेश्वर विद्यालयात टाळ मृदंगाच्या गजरात विद्यार्थ्यांनी काढली दिंडी

जळगाव, दि. ०९ – मेहरुण येथील श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात आषाढी एकादशीनिमित्त विशेष दिंडीचे आयोजन करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांनी टाळ मृदुंगाच्या तालावर ठेका धरत वातावरण भक्तीमय केले. विद्यार्थ्यांनी वारकऱ्यांच्या वेशभूषेत तसेच मुलींनी पारंपारिक वस्त्र परिधान करून सहभाग घेतला.

दिंडीमध्ये श्री विठ्ठल-रुक्मिणी यांच्या मनमोहक मूर्ती ठेवलेल्या होत्या. पालखी पूजन व मूर्तिपूजन संस्थेचे अध्यक्ष तथा मेहरुणचे नगरसेवक प्रशांत नाईक व संचालिका अर्चना नाईक यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांनी टाळ मृदुंगाच्या गजरात व लेझीम खेळून जल्लोष केला. यावेळी विद्यार्थ्यांनी फुगडी देखील खेळले. इयत्ता सातवीच्या विद्यार्थ्यांनी “माऊली माऊली” या गाण्यावरती नृत्य सादर केले. पालकांची देखील यावेळी उपस्थिती होती.

दिंडी उपक्रमाचे नियोजन मुख्याध्यापिका शितल कोळी, उपशिक्षक तथा संस्थेचे सचिव मुकेश नाईक, उज्वला नन्नवरे, साधना शिरसाट, आम्रपाली शिरसाट, रूपाली आव्हाड, नयना अडकमोल, सोनाली चौधरी, स्वाती नाईक, प्रियंका जोगी, साक्षी जोगी, दिव्या पाटील, सोनाली जाधव, कोमल पाटील, पुनम निकम, मेघा सोनवणे, जयश्री खैरनार, शिल्पा कोंगे, योगिता सोनवणे, दिनेश पाटील आदींनी यशस्वीपणे केले.

Next Post
मु.जे.महाविद्यालयातील तत्वज्ञान विभागातर्फे एक दिवसीय व्याख्यान

मु.जे.महाविद्यालयातील तत्वज्ञान विभागातर्फे एक दिवसीय व्याख्यान

ताज्या बातम्या

जळगाव जिल्हा बॅडमिंटन चॅम्पियनशिप २०२६ उत्साहात
क्रिडा

जळगाव जिल्हा बॅडमिंटन चॅम्पियनशिप २०२६ उत्साहात

September 17, 2026
आंतरजातीय विवाहास प्रोत्साहन देण्यासाठी ११८ लाभार्थ्यांना अनुदानाचा लाभ
खान्देश

आंतरजातीय विवाहास प्रोत्साहन देण्यासाठी ११८ लाभार्थ्यांना अनुदानाचा लाभ

September 17, 2026
गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात स्मार्ट इंडिया हॅकाथॉन उत्साहात
जळगाव जिल्हा

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात स्मार्ट इंडिया हॅकाथॉन उत्साहात

September 17, 2026
नदी संवर्धनासाठी लोकसहभाग आवश्यक : जलपुरुष डॉ.राजेंद्र सिंहजी
जळगाव जिल्हा

नदी संवर्धनासाठी लोकसहभाग आवश्यक : जलपुरुष डॉ.राजेंद्र सिंहजी

September 17, 2026
बोगस हजेरी, कामगारांच्या पिळवणुकीची तक्रार; स्वच्छता निरीक्षकाची मूळ पदावर गच्छंती
जळगाव जिल्हा

बोगस हजेरी, कामगारांच्या पिळवणुकीची तक्रार; स्वच्छता निरीक्षकाची मूळ पदावर गच्छंती

September 17, 2026
उद्दिष्टकेंद्रीत नियोजनातून सेवा संकल्प अभियान यशस्वीपणे राबवा जिल्हाधिकारी 
जळगाव जिल्हा

उद्दिष्टकेंद्रीत नियोजनातून सेवा संकल्प अभियान यशस्वीपणे राबवा जिल्हाधिकारी 

September 17, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add