जळगांव, दि. १६ – जळगांव शहरातील जुन्या अपार्टमेन्ट मधील सर्व फ्लॅटधारकांना मिळून फक्त एकच नळ कनेक्शन देण्याच्या महापालिकेच्या नियमाविरूद्ध एकत्रित येऊन सनदशीर मार्गाने लढा देण्यासाठी मनसेचे जिल्हाध्यक्ष ऍड. जमील देशपांडे यांनी पुढाकार घेतलायं.
दरम्यान रविवार १९ जुन रोजी सकाळी ११ वाजता जळगावातील पद्मालय विश्रामगृह येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीत मनसेचे जिल्हाध्यक्ष ऍड. देशपांडे जुन्या फ्लॅट धारकांना मार्गदर्शन करणार आहे.
यासंदर्भात जळगांव शहरातील सर्व जुन्या अपार्टमेन्ट मधील फ्लॅट धारकांना मनसे तर्फे आवाहन करण्यात आले आहे. तसेच आपल्या अपार्टमेन्ट मधील सर्व फ्लॅट धारकांच्या संमतीने सर्वांना वेगवेगळे नळ कनेक्शन मिळणेकामी संमती असले बाबतचा अर्ज बैठकीला येतांना घेऊन यावा असे कळविण्यात आले आहे. बैठकीत सर्व कायदेशीर बाबींवर चर्चा करण्यात येईल व पुढील दिशा ठरवली जाणार आहे.