जळगाव, दि.१२ – येथील मेहरूण भागातील जामा मस्जिद येथे ईद मिलन व मस्जिद परिचय कार्यक्रम रविवारी घेण्यात आला. यावेळी अकोला येथील मौलाना शेख जुनेद यांनी उपस्थित हिंदू-मुस्लीम बांधवांना मार्गदर्शन करीत परमेश्वराने दिलेला एकात्मतेचा व मानवतेचा संदेश दिला. यावेळी मेहरूणवासियांनी कार्यक्रमात सहभाग घेऊन माहिती जाणून घेतली.
कार्यक्रमात मौलाना शेख जुनेद, ईश्तीयाक खान, नगरसेवक प्रशांत नाईक प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी मेहरूण परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने कार्यक्रमात सहभागी झाले होते. त्यांनी कार्यक्रमात उत्स्फुर्तपणे आपली मते मांडली. मानवता जिवंत ठेवायची असेल तर माणसा-माणसांमध्ये कुठलाही भेदभाव व वैर नको. सर्व परमेश्वराचा शांतीचा संदेश घेऊन आपण जगत आहोत. शांती, एकता यामध्येच मानवतेचे कल्याण आहे, शेजारधर्म पाळला पाहिजे, सामाजिक बांधिलकी जिवंत ठेवावी अशी माहिती मौलाना शेख जुनेद यांनी दिली.
यावेळी नगरसेवक प्रशांत नाईक यांनी, मेहरूणमधील नागरिक एकता, सलोख्याने राहणारी आहे. येथे सामंजस्याचे वातावरण असल्याने अनेक वर्षापासून नागरिक सुखासमाधानाने राहत आहे, असे सांगितले. मेहरूण मधील नागरिकांनी देखील मते मांडली. प्रसंगी प्रा. नारायण पवार, सामाजिक कार्यकर्ते अनिल सोनवणे, नत्थू सानप, शेखर सोनवणे, विलास भदाणे, पोलीस अधिकारी अनिस शेख, अतुल वंजारी, निंबाळकर, सदाशिव सोनवणे, रुपेश ठाकरे, नामदेव नाईक, सुनील नाईक, शामकांत सोनवणे, वासुदेव सानप, रमेश चाटे, संजय पाटील, शालिक वानखेडे, सतीश चाटे, बाबुराव वाघ, दत्तू ढाकणे, समाधान सानप, हर्षल सानप, युवराज चौधरी, भरत महाजन, रवींद्र पाटील, संजय पाटील, यांच्यासह आयोजक मस्जिद कमिटीचे अध्यक्ष इक्बाल पिरजादे, झाहिद हाफिज पिरजादे, आड. बुरहानुद्दीन पिरजादे, सदरुद्दिन पिरजादे, अकील पिरजादे, इस्माईल पिरजादे, दोस्त मोहम्मद पिरजादे, भागवत सानप, भानुदास नाईक, चेतन नाईक, अनिल घुगे, बशीर पिरजादे, चांगो पाटील, महेंद्र सोनवणे, शकीर पिरजादे, वसीम पिरजादे, अहमद पिरजादे, मेहबूब शेख, मुस्तफा खान, युनुस शेख आदी उपस्थित होते.