• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त मोटरसायकल रॅली

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
June 10, 2022
in राजकीय
0
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त मोटरसायकल रॅली

जळगाव, दि. १० – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा २३ वा वर्धापन दिवस पक्षाचे प्रमुख नेते व पदाधिकारी यांच्या उपस्थितित उत्साहात साजरा करण्यात आला. जिल्हाध्यक्ष ऍड. रविंद्र पाटील यांच्या हस्ते सकाळी १०.१० वाजता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा ध्वज फडकविण्यात आला. उपस्थित सर्वांनी ध्वजवंदना देत राष्ट्रगीताचे गायन केले. पक्ष कार्यालयात घेण्यात आलेल्या कार्यक्रमात जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील व जिल्हा बँकेचे चेअरमन गुलाबराव देवकर यांनी कार्यकर्त्यांना संबोधित केले.

देशाचे नेते शरद पवार साहेब यांच्या सक्षम नेतृत्वात आपल्याला काम करायला मिळत असून हे आपले भाग्य आहे. पक्ष स्थापनेपासुन ते आजवर फक्त ५ वर्षांचा अपवाद वगळता पक्ष कायम सत्तेत आहे. याचे सर्व श्रेय पवार साहेब यांनी केलेले कार्य व त्यांच्या विचारसरणीला आहे. कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची व पवार साहेबांची विचारधारा, कार्य सामान्य जनतेपर्यंत पोहोचवावी व जास्तीत जास्त जनहिताचे कार्य करावे, म्हणजे जळगाव जिल्ह्यात देखील सर्व नगरपालिका, जिल्हा परिषद, महानगरपालिका, ग्रामपंचायत येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सत्ता येईल असे मत त्यांनी मांडले. यानंतर केक कापुन सर्वांनी एकमेकांना पक्ष वर्धापन दिनाच्या शुभेच्छा दिल्या व पक्षातील जेष्ठ नागरिक पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.

मोटरसायकल रॅली..
आकाशवाणी चौकातील राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयापासून स्वातंत्र्य चौक, नेहरू चौक, चौबे शाळा, चित्रा चौक, कोर्ट चौक या मार्गाने शहारातून मोटरसायकल रॅली काढण्यात आली दरम्यान रॅलीची सांगता राष्ट्रवादी कार्यालयासमोर करण्यात आली. रॅलीत कार्यकर्त्यांनी अत्यंत उत्साहात जोरदार घोषणा देत परिसर दणाणून सोडला. मोटरसायकल रॅलीत सुमारे य१५० मोटरसायकल व ३०० कार्यकर्ते सहभागी झाले होते.

यावेळी जिल्हाध्यक्ष ऍड. रवींद्र पाटिल, जिल्हा बँकेचे चेअरमन गुलाबराव देवकर, महानगर अध्यक्ष अशोक लाडवंजारी, जिल्हा कार्याध्यक्ष विलास पाटील, विकास पवार, महिला जिल्हाध्यक्षा वंदना चौधरी, युवक जिल्हाध्यक्ष रवींद्र नाना पाटील, महिला महानगर अध्यक्षा मंगला पाटील, वाल्मिक पाटिल, रिकू चौधरी, अमोल कोल्हे, अरविंद मानकरी, मजहर पठाण, राजू मोरे, रवी देशमुख, अश्विनी देशमुख, कल्पिता पाटील आदींसह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

 


 

Next Post
शासकीय अनुदानासाठी अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांचे रास्ता रोको आंदोलन

शासकीय अनुदानासाठी अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांचे रास्ता रोको आंदोलन

ताज्या बातम्या

डॉ. उल्हास पाटील रुग्णालयातील शस्त्रक्रिया विभागाच्या टीमचे यश
आरोग्य

डॉ. उल्हास पाटील रुग्णालयातील शस्त्रक्रिया विभागाच्या टीमचे यश

October 13, 2026
नाकाबंदीत इनोव्हासह १५.३३ लाखांचा गुटखा जप्त; चाळीसगावचा वाहनचालक ताब्यात
गुन्हे

नाकाबंदीत इनोव्हासह १५.३३ लाखांचा गुटखा जप्त; चाळीसगावचा वाहनचालक ताब्यात

October 13, 2026
जिल्हास्तरीय मनपा कॅरम स्पर्धेत दुर्गेश्वरी धोंगडे विजेती!
क्रिडा

जिल्हास्तरीय मनपा कॅरम स्पर्धेत दुर्गेश्वरी धोंगडे विजेती!

October 13, 2026
नवरात्रीच्या उपवासादरम्यान नऊ वर्षीय खुशीचा मृत्यू; नशिराबादमध्ये शोककळा
खान्देश

नवरात्रीच्या उपवासादरम्यान नऊ वर्षीय खुशीचा मृत्यू; नशिराबादमध्ये शोककळा

October 13, 2026
जैन हिल्स येथील जलसंधारण क्षेत्रभेटीतून जल व्यवस्थापनाचा अनुभवला वस्तूपाठ
खान्देश

जैन हिल्स येथील जलसंधारण क्षेत्रभेटीतून जल व्यवस्थापनाचा अनुभवला वस्तूपाठ

October 13, 2026
नवरात्रोत्सव आणि धार्मिक मिरवणुकांच्या पार्श्वभूमीवर आठवडी बाजार बंदचे आदेश
खान्देश

नवरात्रोत्सव आणि धार्मिक मिरवणुकांच्या पार्श्वभूमीवर आठवडी बाजार बंदचे आदेश

October 13, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add