• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र व जैन इरिगेशन यांच्यात सामंजस्य करार

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
May 22, 2022
in कृषी
0
राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र व जैन इरिगेशन यांच्यात सामंजस्य करार

जळगाव, दि.२२ – कृषी क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी जैन इरिगेशन सिस्टम्स लिमिटेड जळगाव आणि सोलापूर येथील राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र यांच्यामध्ये ‘डाळींबाच्या सोलापूर लाल’ या त्यांच्या संशोधित व हायब्रीड वाणाची टिश्यूकल्चरच्या सहाय्याने निर्मिती करून देशात प्रसार करण्यासाठी नुकताच सामंजस्य करार झाला. डाळिंब केंद्राचे संचालक डॉ. आर ए मराठे जैन टिशू कल्चर चे डॉ. अनिल पाटील व के. बी. पाटील यांच्या करारावर स्वाक्षरी आहेत.

डाळिंबाची सोलापूर लाल ही जात किंवा वाण पोषण दृष्टीने उत्तम असून त्यात लोहाचे प्रमाण भरपूर असते. उष्णतेचा परिणाम कमी होतो. जास्त तापमानात सुद्धा दाण्यांचा रंग चांगला असतो. फळांचा रंग, गंध तसेच आतील दाण्यांचा लाल रंग व उत्तम चव तसेच प्रोटीन, झिंक आणि ‘क’ जीवन सत्वाचे प्रमाण अधिक आहे. ही जात भगव्याच्या तुलनेत 15 ते 20 दिवस लवकर येते. सर्वच दृष्टीने सोलापूर लाल हे डाळींबाचे वाण उजवे ठरलेले आहे. त्यामुळे डाळिंब उत्पादक त्याकडे वळत आहेत. प्रक्रियेसाठी सुद्धा चांगली जात आहे.

जैन इरिगेशनचे टिश्युकल्चर डाळिंबा मध्ये जगात नावलौकीक आहे. कंपनी दरवर्षी 70 लाख डाळिंबाचे रोपे निर्माण करते. आता सोलापुर लाल निर्मातीचे अधिकार मिळाले असून सोलापूर लाल जातीचे क्षेत्र वाढेल. करारनामा करते वेळी परभणी कृषी विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ.डी.पी. वासकर, केंद्राच्या प्रधान शास्त्रज्ञ डॉ. जोत्सना शर्मा, अखिल भारतीय डाळिंब उत्पादक संघाचे अध्यक्ष प्रभाकर चांदणे, डॉ. एन.व्ही सिंग, डॉ. गायकवाड, डॉ. मल्लिकार्जुन, डॉ. प्रकाश कुलकर्णी, तुषार जाधव, डॉ एस.व्ही. जजीनवार डॉ. मंजुनाथ बागलकोट, कृषी विद्यापीठ हे उपस्थित होते.

Next Post
तायक्वांदो असोसिएशनच्या ठाण्यातील सहा पदाधिकाऱ्यांनी दिले राजीनामे

तायक्वांदो असोसिएशनच्या ठाण्यातील सहा पदाधिकाऱ्यांनी दिले राजीनामे

ताज्या बातम्या

डॉ. उल्हास पाटील रुग्णालयातील शस्त्रक्रिया विभागाच्या टीमचे यश
आरोग्य

डॉ. उल्हास पाटील रुग्णालयातील शस्त्रक्रिया विभागाच्या टीमचे यश

October 13, 2026
नाकाबंदीत इनोव्हासह १५.३३ लाखांचा गुटखा जप्त; चाळीसगावचा वाहनचालक ताब्यात
गुन्हे

नाकाबंदीत इनोव्हासह १५.३३ लाखांचा गुटखा जप्त; चाळीसगावचा वाहनचालक ताब्यात

October 13, 2026
जिल्हास्तरीय मनपा कॅरम स्पर्धेत दुर्गेश्वरी धोंगडे विजेती!
क्रिडा

जिल्हास्तरीय मनपा कॅरम स्पर्धेत दुर्गेश्वरी धोंगडे विजेती!

October 13, 2026
नवरात्रीच्या उपवासादरम्यान नऊ वर्षीय खुशीचा मृत्यू; नशिराबादमध्ये शोककळा
खान्देश

नवरात्रीच्या उपवासादरम्यान नऊ वर्षीय खुशीचा मृत्यू; नशिराबादमध्ये शोककळा

October 13, 2026
जैन हिल्स येथील जलसंधारण क्षेत्रभेटीतून जल व्यवस्थापनाचा अनुभवला वस्तूपाठ
खान्देश

जैन हिल्स येथील जलसंधारण क्षेत्रभेटीतून जल व्यवस्थापनाचा अनुभवला वस्तूपाठ

October 13, 2026
नवरात्रोत्सव आणि धार्मिक मिरवणुकांच्या पार्श्वभूमीवर आठवडी बाजार बंदचे आदेश
खान्देश

नवरात्रोत्सव आणि धार्मिक मिरवणुकांच्या पार्श्वभूमीवर आठवडी बाजार बंदचे आदेश

October 13, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add