• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

खान्देशच्या तीन चित्रकारांना अखिल भारतीय पारितोषिक

चित्रकलेसाठी मिळाला ऐतिहासिक सन्मान

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
April 5, 2022
in जळगाव जिल्हा
0
खान्देशच्या तीन चित्रकारांना अखिल भारतीय पारितोषिक

जळगाव, दि.०५ – दिल्ली येथील ऑल इंडिया फाइन आर्ट अॅण्ड क्राफ्ट सोसायटीच्या ९३ व ९४ व्या अखिल भारतीय कला प्रदर्शनात खानदेशातील तीन चित्रकारांना अखिल भारतीय पारितोषिक मिळाले. जळगावमधील जैन इरिगेशनच्या कला विभागातील चित्रकार विकास मल्हारा, विजय जैन यांच्यासह राजू बाविस्कर या तीन चित्रकारांचा यात समावेश आहे. राष्ट्रीय पारितोषिक मिळणे ही खानदेशातील ऐतिहासिक गोष्ट आहे.

विकास मल्हारा आणि राजू बाविस्कर यांना पेंटिंगसाठी तर विजय जैन यांना ड्रॉईंगसाठी हा पुरस्कार प्राप्त झाला आहे. रोख पंधरा हजार, स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. पुरस्कार समारंभ ऑल इंडिया फाइन आर्ट अॅण्ड क्रॉफ्ट सोसायटीच्या दिल्ली येथील कार्यालय आवारात दि.३१ मार्च २०२२ रोजी पार पडला. जगविख्यात शिल्पकार पद्मभूषण राम सुतार, डॉ.करण सिंग यांच्याहस्ते पुरस्कार देऊन तिघंही चित्रकारांना गौरविण्यात आले.

राज्यभरातून चित्रकला क्षेत्रातील मान्यवरांनी जळगावच्या या कलावंतांचे कौतुक केले. जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांनी या चित्रकारांचे कौतुक करताना “एकाच वेळी तीन जणांना हा बहुमान मिळणे ही खूप आनंदाची, अभिमानाची आणि समाधानाची बाब असून चित्रकलेसाठी काम करणाऱ्या तरूण उमेदवारांसाठी ही प्रोत्साहित करणारी घटना आहे !” अशा शब्दात आनंद व्यक्त केला.

तिघे चित्रकार या राष्ट्रीय संस्थेच्या भविष्यातील कॅम्प किंवा वर्कशॉपसाठी पात्र ठरले आहेत. अनेकविध ठिकाणचे राज्य राष्ट्रीय स्तरावरचे पुरस्कारही या चित्रकारांना मिळाले आहेत. राष्ट्रीय आर्ट अॅण्ड क्राफ्ट सोसायटीच्या वार्षिक प्रदर्शनात पेंटिंग, शिल्प, ड्रॉइंग आणि ग्राफिक या चार प्रकारांमध्ये हजारो कलाकृती मधून २४० कलाकृतींची निवड झाली होती. त्यातून ३० कलाकृतींना पारितोषिके देण्यात आली आहेत.

Next Post
स्वर्गीय पी.व्ही.माळी यांच्या स्मरणार्थ जलतरण स्पर्धेचे आयोजन

स्वर्गीय पी.व्ही.माळी यांच्या स्मरणार्थ जलतरण स्पर्धेचे आयोजन

ताज्या बातम्या

डॉ. उल्हास पाटील रुग्णालयातील शस्त्रक्रिया विभागाच्या टीमचे यश
आरोग्य

डॉ. उल्हास पाटील रुग्णालयातील शस्त्रक्रिया विभागाच्या टीमचे यश

October 13, 2026
नाकाबंदीत इनोव्हासह १५.३३ लाखांचा गुटखा जप्त; चाळीसगावचा वाहनचालक ताब्यात
गुन्हे

नाकाबंदीत इनोव्हासह १५.३३ लाखांचा गुटखा जप्त; चाळीसगावचा वाहनचालक ताब्यात

October 13, 2026
जिल्हास्तरीय मनपा कॅरम स्पर्धेत दुर्गेश्वरी धोंगडे विजेती!
क्रिडा

जिल्हास्तरीय मनपा कॅरम स्पर्धेत दुर्गेश्वरी धोंगडे विजेती!

October 13, 2026
नवरात्रीच्या उपवासादरम्यान नऊ वर्षीय खुशीचा मृत्यू; नशिराबादमध्ये शोककळा
खान्देश

नवरात्रीच्या उपवासादरम्यान नऊ वर्षीय खुशीचा मृत्यू; नशिराबादमध्ये शोककळा

October 13, 2026
जैन हिल्स येथील जलसंधारण क्षेत्रभेटीतून जल व्यवस्थापनाचा अनुभवला वस्तूपाठ
खान्देश

जैन हिल्स येथील जलसंधारण क्षेत्रभेटीतून जल व्यवस्थापनाचा अनुभवला वस्तूपाठ

October 13, 2026
नवरात्रोत्सव आणि धार्मिक मिरवणुकांच्या पार्श्वभूमीवर आठवडी बाजार बंदचे आदेश
खान्देश

नवरात्रोत्सव आणि धार्मिक मिरवणुकांच्या पार्श्वभूमीवर आठवडी बाजार बंदचे आदेश

October 13, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add