गजानन पाटील | अमळनेर, दि.२४ – येथील सामर्थ्य प्रतिष्ठानच्या वतीने बालिका अत्याचाराच्या घटनेच्या निषेधार्थ पोलिस निरीक्षक जयपाल हिरे यांना निवेदन देण्यात आले. सदर घटनेचा निषेध करीत आरोपीस तात्काळ शिक्षा व्हावी यासाठी हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालविण्याच्या मागणीचे निवेदन प्रशासनास देण्यात आले.
आपल्या राज्यात अशी घटना घडते, हि लाजिरवाणी बाब असून माणुसकीला काळिमा फासणारी घटना आहे. दोषींवर कठोर कार्यवाही करण्यात यावी, अशा आशयाचे निवेदन देण्यात आले.
यावेळी सामर्थ्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष अमोल माळी, शिव बहुद्देशीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष रणजित शिंदे, शिवव्याख्याते प्रा.लिलाधर पाटील, अर्बन बँकेचे व्हाईस चेअरमन प्रविण पाटील उपस्थित होते.