• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

रौप्य महोत्सवी बालगंधर्व संगीत महोत्सवात नाट्यसंगीत, अभंगवाणी आणि ‘बॉलीवूड घराना’ची मेजवानी

जेन-झी पिढीसाठी अभिजीत पोहनकर यांचा विशेष कार्यक्रम; चारही दिवसांचे सूत्रसंचालन मंगला खाडिलकर करणार

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
November 27, 2026
in जळगाव जिल्हा, मनोरंजन
0
रौप्य महोत्सवी बालगंधर्व संगीत महोत्सवात नाट्यसंगीत, अभंगवाणी आणि ‘बॉलीवूड घराना’ची मेजवानी

जळगाव, प्रतिनिधी : स्व. वसंतराव चांदोरकर स्मृती प्रतिष्ठानतर्फे आयोजित २५ व्या रौप्य महोत्सवी बालगंधर्व संगीत महोत्सवात शास्त्रीय संगीत, नाट्यसंगीत, अभंगवाणी आणि आधुनिक संगीताचा सुरेल संगम रसिकांना अनुभवायला मिळणार आहे. नव्या पिढीला अभिजात संगीताची गोडी लागावी, या उद्देशाने प्रतिष्ठान गेल्या २५ वर्षांपासून प्रयत्नशील आहे. याच प्रयत्नांचा भाग म्हणून यंदा जेन-झी पिढीसाठी ‘बॉलीवूड घराना’ हा विशेष कार्यक्रम सादर करण्यात येणार आहे.

महोत्सवात तबला आणि पखवाज यांची जुगलबंदी जळगावकर रसिकांना अनुभवता येणार आहे. या सादरीकरणाला पं. अजय जोगळेकर हे संवादिनीवर साथसंगत करणार आहेत.

महोत्सवाच्या चौथ्या दिवशी पहिल्या सत्रात नाट्यसंगीत आणि अभंगवाणीचा कार्यक्रम होणार आहे. स्वराधीश डॉ. पं. भरत बलवल्ली हे आपल्या गायनाने रसिकांना मंत्रमुग्ध करतील. त्यांना ऑर्गनवर मकरंद कुंडले, तबल्यावर रामकृष्ण करंबेळकर आणि बासरीवर वरद कवठापूरकर साथ देतील. प्रख्यात सुसंवादिनी मंगला खाडिलकर या कार्यक्रमाचे निरूपण करणार आहेत.

नव्या पिढीला अभिजात संगीताची ओळख व्हावी आणि त्यांच्यात संगीताविषयी आवड निर्माण व्हावी, या उद्देशाने अभिजीत पोहनकर आणि त्यांचे सहकारी ‘बॉलीवूड घराना’ हा विशेष कार्यक्रम सादर करणार आहेत. या कार्यक्रमाने २५ व्या रौप्य महोत्सवी बालगंधर्व संगीत महोत्सवाची सांगता होणार आहे.

तरुणांसह ज्येष्ठ रसिकांसाठीही हा स्वरसोहळा पर्वणी ठरणार आहे. महोत्सवाच्या चारही दिवसांचे सूत्रसंचालन मुंबईच्या प्रख्यात सुसंवादिनी मंगला खाडिलकर करणार आहेत.

उपस्थित राहून या रौप्य महोत्सवी संगीत सोहळ्याचा आनंद घ्यावा, असे आवाहन महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयासह स्व. वसंतराव चांदोरकर स्मृती प्रतिष्ठान आणि महोत्सवाच्या विविध प्रायोजकांनी केले आहे. कार्यक्रम वेळेवर सुरू होण्यासाठी रसिकांनी वेळेवर उपस्थित राहावे, असेही आयोजकांनी कळविले आहे.

महोत्सवाच्या प्रवेशिकांसाठी दीपिका चांदोरकर यांच्याशी ९८२३०७७२७७ किंवा २२२७७२२ या क्रमांकांवर संपर्क साधावा.

 


 

ताज्या बातम्या

रौप्य महोत्सवी बालगंधर्व संगीत महोत्सवात नाट्यसंगीत, अभंगवाणी आणि ‘बॉलीवूड घराना’ची मेजवानी
जळगाव जिल्हा

रौप्य महोत्सवी बालगंधर्व संगीत महोत्सवात नाट्यसंगीत, अभंगवाणी आणि ‘बॉलीवूड घराना’ची मेजवानी

November 27, 2026
बोपदेव घाटात भीषण अपघात; जळगावच्या मोहिनीसह तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू
खान्देश

बोपदेव घाटात भीषण अपघात; जळगावच्या मोहिनीसह तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू

November 27, 2026
कजगावमध्ये तरुणावर अज्ञातांकडून गोळीबार; हल्ल्यात गंभीर जखमी, परिसरात खळबळ
गुन्हे

कजगाव गोळीबार प्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

November 27, 2026
रझा कॉलनीत घरफोडी; दीड लाखांचे सोन्याचे दागिने लंपास
खान्देश

रझा कॉलनीत घरफोडी; दीड लाखांचे सोन्याचे दागिने लंपास

November 27, 2026
अवैध वाळू वाहतुकीवर पोलिसांचा दणका; डंपर, ट्रॅक्टरसह साडेचार लाखांचा मुद्देमाल जप्त
गुन्हे

शिवशाही बसमध्ये महिलेच्या बॅगेतून ४.६३ लाखांचा ऐवज लंपास

November 27, 2026
जळगावात ‘गंमत जंमत बालचित्रपट महोत्सव’ पर्व २ चे आयोजन; चित्रपटांची व जादूची दुहेरी मेजवानी
खान्देश

जळगावात ‘गंमत जंमत बालचित्रपट महोत्सव’ पर्व २ चे आयोजन; चित्रपटांची व जादूची दुहेरी मेजवानी

November 27, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add