• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

शामनगर घरफोडीचा छडा; रेल्वेस्थानकावरून आरोपी जेरबंद

चोरीचा १.११ लाखांचा मुद्देमाल हस्तगत; दोन साथीदार फरार

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
November 26, 2026
in गुन्हे, जळगाव जिल्हा
0
शामनगर घरफोडीचा छडा; रेल्वेस्थानकावरून आरोपी जेरबंद

जळगाव, प्रतिनिधी  : शामनगर परिसरात झालेल्या घरफोडीचा छडा लावण्यात रामानंदनगर पोलिसांना यश आले आहे. घरफोडीनंतर बाहेरगावी पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या संशयिताला पोलिसांनी जळगाव रेल्वेस्थानकावरून ताब्यात घेत अटक केली. त्याच्याकडून सोन्या-चांदीचे दागिने आणि सॅमसंग कंपनीचा ४३ इंची टीव्ही असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. या गुन्ह्यात आणखी दोघांचा सहभाग निष्पन्न झाला असून ते फरार आहेत.

शामनगर येथील किरण नंदकिशोर वासेवाय हे १२ नोव्हेंबर रोजी कुटुंबासह पंढरपूर येथे दर्शनासाठी गेले होते. १५ नोव्हेंबरला घरी परतल्यानंतर त्यांना दरवाजाचा कडी-कोंडा तुटलेला दिसला. घरातील कपाटाची पाहणी केली असता सोन्या-चांदीचे दागिने, टीव्ही आणि १२ हजार रुपये रोख असा ऐवज चोरीला गेल्याचे उघड झाले. याप्रकरणी त्यांनी रामानंदनगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.

पोलिस निरीक्षक मधुकर साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोधपथकाने तपास सुरू केला. तांत्रिक माहितीचे विश्लेषण केल्यानंतर राजीव गांधी नगर परिसरातील शक्तीसिंग ऊर्फ हग्गु जीवनसिंग जुन्नी याचा या गुन्ह्यात सहभाग असल्याचे निष्पन्न झाले. त्याच्यासोबत आणखी दोघे असल्याची माहिती तपासातून समोर आली.

१९ नोव्हेंबर रोजी सहाय्यक पोलिस निरीक्षक अंकुश वारुंगसे यांना हग्गुसिंग जळगाव रेल्वेस्थानकावरून बाहेरगावी जाण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळाली. उपनिरीक्षक सचिन रणशेवरे यांच्या पथकाने तातडीने रेल्वेस्थानक गाठून त्याला ताब्यात घेतले. पोलिस कोठडीतील चौकशीत त्याने सुबेरसिंग राजुसिंग टाक आणि शेरुसिंग सोजितसिंग भोंड यांच्या मदतीने घरफोडी केल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले.

पोलिसांनी सोन्याच्या अंगठ्या, कानातील दागिने, मंगळसूत्र, चांदीचा गोफ, ब्रेसलेट, तोरड्या, देव, कडे, फुलपात्र आणि सॅमसंग कंपनीचा ४३ इंची टीव्ही असा मुद्देमाल जप्त केला. या गुन्ह्यातील सुबेरसिंग टाक आणि शेरुसिंग भोंड हे दोघे अद्याप फरार असून त्यांचा शोध सुरू आहे.

पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलिस अधीक्षक संदीप गावित, उपविभागीय पोलिस अधिकारी नितीन गणापुरे आणि रामानंदनगर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक मधुकर साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. कारवाईत सहाय्यक पोलिस निरीक्षक अंकुश वारुंगसे, गुन्हे शोधपथकाचे अधिकारी उपनिरीक्षक सचिन रणशेवरे, उपनिरीक्षक संजय तडवी, पोलिस हवालदार जितेंद्र राजपूत, पोलिस नाईक योगेश बारी, तसेच पोलिस कर्मचारी सुमेध इंधाटे, मुकुंद गवते, मनोज मराठे, सागर नन्नवरे, जुलालसिंग परदेशी आणि मोतीलाल चौधरी यांनी सहभाग घेतला.


 

ताज्या बातम्या

शामनगर घरफोडीचा छडा; रेल्वेस्थानकावरून आरोपी जेरबंद
गुन्हे

शामनगर घरफोडीचा छडा; रेल्वेस्थानकावरून आरोपी जेरबंद

November 26, 2026
महादेव हॉस्पिटलमध्ये डॉ. गगन अग्रवाल यांची ईएनटी तज्ज्ञ म्हणून सेवा उपलब्ध
आरोग्य

महादेव हॉस्पिटलमध्ये डॉ. गगन अग्रवाल यांची ईएनटी तज्ज्ञ म्हणून सेवा उपलब्ध

November 26, 2026
७० वर्षीय वृद्धाच्या मुतखड्याची दोन टाक्यांत यशस्वी शस्त्रक्रिया
आरोग्य

७० वर्षीय वृद्धाच्या मुतखड्याची दोन टाक्यांत यशस्वी शस्त्रक्रिया

November 26, 2026
महादेव रुग्णालयात ६० वर्षीय महिलेवर स्तनाच्या कर्करोगाची यशस्वी शस्त्रक्रिया
आरोग्य

महादेव रुग्णालयात ६० वर्षीय महिलेवर स्तनाच्या कर्करोगाची यशस्वी शस्त्रक्रिया

November 26, 2026
थर्ड वर्ल्ड मेयर्स फोरम समिट-२०२६; महापौर दीपमाला काळे यांनी घेतले आधुनिक नागरी व्यवस्थापनाचे धडे
जळगाव जिल्हा

थर्ड वर्ल्ड मेयर्स फोरम समिट-२०२६; महापौर दीपमाला काळे यांनी घेतले आधुनिक नागरी व्यवस्थापनाचे धडे

November 26, 2026
जेडीसीसी बँक निवडणुकीतील अर्जांच्या घोळाची चौकशी करा; निवडणूक प्रक्रिया स्थगितची मागणी
खान्देश

जेडीसीसी बँक निवडणुकीतील अर्जांच्या घोळाची चौकशी करा; निवडणूक प्रक्रिया स्थगितची मागणी

November 25, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add