कौटुंबिक वादातून पत्नीला बेदम मारहाण व जीवे मारण्याची धमकी; पतीविरुद्ध गुन्हा दाखल

जळगाव, प्रतिनिधी : कौटुंबिक वादाच्या कारणावरून पतीने पत्नीला चापटा, बुक्क्या आणि लाथांनी बेदम मारहाण करत दगडी मुसळीने गंभीर जखमी केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पती राजेश विठ्ठल पद्मार (वय ३८, रा. सत्यम पार्क) याच्याविरुद्ध जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरातील सत्यम पार्क परिसरातील सुजय कॉलनीत जयश्री पद्मार या विवाहिता वास्तव्यास आहेत. २१ नोव्हेंबर रोजी रात्री सव्वा दहा वाजेच्या सुमारास कौटुंबिक वादातून पती राजेश पद्मार याने त्यांना चापटा, बुक्क्या व लाथांनी मारहाण केली. तसेच तुझ्या आई-वडील आणि भावाला जिवंत सोडणार नाही, अशी धमकीही दिली.
दगडी मुसळीने मारहाण करत गंभीर दुखापत मारहाणीदरम्यान आरोपीने घरात असलेली दगडी मुसळी विवाहितेच्या हाताच्या दंडावर मारली, तर बुक्क्यांनी तोंडावर प्रहार करून त्यांना गंभीर जखमी केले. या घटनेनंतर पीडित विवाहितेने २२ नोव्हेंबर रोजी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात धाव घेऊन फिर्याद दिली. त्यानुसार आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला असून, पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल गुलाब माळी करत आहेत.









