• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

अनैतिक संबंधांना विरोध केल्याने पत्नीचा गळा दाबून खून; पतीला जन्मठेप, मुलाला दोन लाखांची भरपाई

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
November 24, 2026
in गुन्हे, जळगाव जिल्हा
0
अनैतिक संबंधांना विरोध केल्याने पत्नीचा गळा दाबून खून; पतीला जन्मठेप, मुलाला दोन लाखांची भरपाई

जळगाव, प्रतिनिधी : जेठाणीसोबत असलेल्या अनैतिक संबंधांना विरोध करणाऱ्या पत्नीचा नाका-तोंडावर हात ठेवून श्वास रोखत क्रूरपणे खून करणाऱ्या पतीला जळगाव जिल्हा व सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. चेतन दलेरसिंग राठोड असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव असून, जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. एन. मोरवाले यांनी २३ नोव्हेंबर रोजी हा महत्त्वपूर्ण निकाल दिला. तसेच मृत मनीषा हिच्या मुलाला तीन महिन्यांच्या आत दोन लाख रुपये भरपाई देण्याचे आदेशही न्यायालयाने दिले आहेत.

पाचोरा तालुक्यातील गाळण शिवारातील शेतात राहणारा चेतन राठोड याचे त्याच्या जेठाणीसोबत अनैतिक संबंध असल्याची माहिती पत्नी मनीषा हिला समजली होती. मनीषाने या संबंधांना तीव्र विरोध केल्याने पतीसह सासरच्या मंडळींकडून तिचा छळ सुरू होता. अखेर ४ फेब्रुवारी २०२२ रोजी मनीषा हिचा राहत्या घरात खून करण्यात आला. याप्रकरणी पाचोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

खटल्यादरम्यान वैद्यकीय अहवालातून खूनाची क्रूरता समोर आली. घटनेच्या वेळी घरात मनीषा आणि पती चेतन हे दोघेच उपस्थित होते. यावेळी चेतनने एका हाताने तिची छाती दाबून धरली, तर दुसऱ्या हाताने नाका-तोंडावर हात ठेवून श्वास रोखत तिचा जीव घेतला, ही बाब वैद्यकीय पुराव्यांतून न्यायालयासमोर सिद्ध झाली.

या खटल्यात सरकार पक्षातर्फे एकूण १२ साक्षीदारांचे जबाब नोंदविण्यात आले. सुनावणीदरम्यान या प्रकरणातील पंच फितूर झाले होते. मात्र, तरीही अतिरिक्त सरकारी वकील ॲड. भारती खडसे यांनी डगमगता सलग तीन दिवस प्रभावी युक्तिवाद केला. त्यांनी विविध उच्च व सर्वोच्च न्यायालयांचे न्यायनिवाडे सादर करत, घराच्या चार भिंतीत घडलेल्या घटनेत भारतीय पुरावा कायद्याच्या तरतुदी कशा लागू होतात, हे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले.

सर्व साक्षी, वैद्यकीय पुरावे आणि युक्तिवादाचे निरीक्षण नोंदवून न्या. एस. एन. मोरवाले यांनी चेतन राठोड याला दोषी ठरवत जन्मठेप ठोठावली. न्यायालयाने शिक्षा सुनावताच उपस्थित असलेल्या मयताच्या भावाला अश्रू अनावर झाले. या खटल्याच्या कामकाजात पैरवी अधिकारी राजेश भावसार आणि केस वॉच अधिकारी सुनील निकम यांनी मोलाचे सहकार्य केले.

 


 

Next Post
डॉ. उल्हास पाटील होमिओपॅथिक महाविद्यालयाच्या दोन खेळाडूंची आंतरविभागीय चाचणीसाठी निवड

डॉ. उल्हास पाटील होमिओपॅथिक महाविद्यालयाच्या दोन खेळाडूंची आंतरविभागीय चाचणीसाठी निवड

ताज्या बातम्या

अल्पवयीन मुलीस पळवले; तरुणास ३ वर्षे सश्रम कारावास
गुन्हे

अल्पवयीन मुलीस पळवले; तरुणास ३ वर्षे सश्रम कारावास

November 25, 2026
कार्तिक पौर्णिमेनिमित्त अय्यप्पा स्वामी मंदिरात भाविकांची अलोट गर्दी!
जळगाव जिल्हा

कार्तिक पौर्णिमेनिमित्त अय्यप्पा स्वामी मंदिरात भाविकांची अलोट गर्दी!

November 25, 2026
ट्रॅक सायकलिंगमध्ये जळगावच्या आकांक्षा म्हेत्रेची ‘दुहेरी’ रौप्यपदकाची कमाई
क्रिडा

ट्रॅक सायकलिंगमध्ये जळगावच्या आकांक्षा म्हेत्रेची ‘दुहेरी’ रौप्यपदकाची कमाई

November 25, 2026
शेतीच्या वादातून व्यापाऱ्याचा डोक्यात लोखंडी पाईप घालून खून; मृतदेह बहुळा नदीत फेकला
Uncategorized

शेतीच्या वादातून व्यापाऱ्याचा डोक्यात लोखंडी पाईप घालून खून; मृतदेह बहुळा नदीत फेकला

November 25, 2026
जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्याकडून भागपुर उपसा सिंचन प्रकल्पाची  पाहणी
जळगाव जिल्हा

जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्याकडून भागपुर उपसा सिंचन प्रकल्पाची  पाहणी

November 25, 2026
होम व्हिजिटिंगमधून ग्रामीण जनतेत आरोग्य योजनांची जनजागृती करा; नर्सिंग विद्यार्थ्यांना आवाहन
Uncategorized

होम व्हिजिटिंगमधून ग्रामीण जनतेत आरोग्य योजनांची जनजागृती करा; नर्सिंग विद्यार्थ्यांना आवाहन

November 24, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add