• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

विश्व महापौर फोरम आणि सातव्या एशियन सिटीज समिटमध्ये महापौर दीपमाला काळे सहभागी होणार

मुंबईत २५, २६ नोव्हेंबरला आंतरराष्ट्रीय परिषद; जगभरातून सुमारे १ हजार महापौर उपस्थित राहणार

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
November 23, 2026
in जळगाव जिल्हा, राजकीय
0
विश्व महापौर फोरम आणि सातव्या एशियन सिटीज समिटमध्ये महापौर दीपमाला काळे सहभागी होणार

जळगाव, प्रतिनिधी : ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ लोकल सेल्फ गव्हर्नमेंट (AIILSG) च्या शताब्दी महोत्सवाच्या समारोपानिमित्त मुंबईतील फेअरमॉन्ट हॉटेल येथे २५ व २६ नोव्हेंबर रोजी तिसरा ‘विश्व महापौर फोरम’ आणि सातवी ‘एशियन सिटीज समिट’ ही भव्य आंतरराष्ट्रीय परिषद आयोजित करण्यात आली आहे. या जागतिक स्तरावरील परिषदेत जळगाव शहर महानगरपालिकेच्या महापौर दीपमाला मनोज काळे या सहभागी होणार असून, त्या जळगाव शहराचे प्रतिनिधित्व करतील.

या आंतरराष्ट्रीय संमेलनासाठी जगभरातून सुमारे एक हजाराच्या आसपास महापौर आणि शहरी प्रशासन प्रतिनिधी एकत्र येणार आहेत. यामध्ये परदेशातील तब्बल ७५ महापौरांनी आपली अधिकृत नोंदणी केली असून, देशांतील ५०० हून जास्त शहरांचे प्रतिनिधी तसेच देशाच्या विविध कानाकोपऱ्यांतून विविध महानगरपालिकांचे महापौर, नगरीय संस्थांचे पदाधिकारी, धोरणकर्ते आणि शहरी विकास तज्ज्ञ एकाच मंचावर येणार आहेत.

महत्त्वाच्या विषयांवर तांत्रिक सत्रे व विचारमंथन..
दोन दिवस चालणाऱ्या या परिषदेत शहरी विकासाशी संबंधित विविध महत्त्वाच्या विषयांवर तांत्रिक सत्रे आयोजित करण्यात आली आहेत. यामध्ये प्रामुख्याने विविध विषयांवर सखोल चर्चा व विचारमंथन होणार आहे. घनकचरा व्यवस्थापन आणि जलसंधारण (पाणी बचत), नद्या आणि पर्यावरणीय परिसंस्थेचे पुनरुज्जीवन, पर्यावरण संरक्षण आणि ‘नेट झिरो सिटी’ची निर्मिती, स्थानिक स्वराज्य संस्थांचे सक्षमीकरण आणि शहरी वाहतूक व्यवस्था, नागरी प्रशासनात कृत्रिम बुद्धिमत्तेची (AI) भूमिका, महानगरीय व्यवस्थापन आणि हवामान बदलाची आव्हाने याविषयी चर्चा होईल.

या जागतिक परिषदेतील सहभागामुळे जळगाव शहराच्या शाश्वत विकासासाठी, स्वच्छता व घनकचरा व्यवस्थापनासाठी आणि आधुनिक नागरी सुविधांच्या अंमलबजावणीसाठी आंतरराष्ट्रीय स्तरावरील नावीन्यपूर्ण उपक्रम आणि तंत्रज्ञानाची माहिती घेण्याची मोठी संधी महापौर दीपमाला काळे यांना मिळणार आहे.


 

ताज्या बातम्या

विश्व महापौर फोरम आणि सातव्या एशियन सिटीज समिटमध्ये महापौर दीपमाला काळे सहभागी होणार
जळगाव जिल्हा

विश्व महापौर फोरम आणि सातव्या एशियन सिटीज समिटमध्ये महापौर दीपमाला काळे सहभागी होणार

November 23, 2026
जळगावात बऱ्हाणपूरचा दुचाकी चोरटा जेरबंद; २.३२ लाखांच्या ९ मोटारसायकली हस्तगत
गुन्हे

जळगावात बऱ्हाणपूरचा दुचाकी चोरटा जेरबंद; २.३२ लाखांच्या ९ मोटारसायकली हस्तगत

November 23, 2026
गावांच्या विकासासाठी अधिकारी, कर्मचारी आणि लोकप्रतिनिधींनी एकजुटीने काम करावे.. – ना. गुलाबराव पाटील
जळगाव जिल्हा

गावांच्या विकासासाठी अधिकारी, कर्मचारी आणि लोकप्रतिनिधींनी एकजुटीने काम करावे.. – ना. गुलाबराव पाटील

November 23, 2026
लग्नसराईच्या तोंडावर सोन्याच्या बाजारात अचानक काय घडलं?
खान्देश

लग्नसराईच्या तोंडावर सोन्याच्या बाजारात अचानक काय घडलं?

November 23, 2026
कर्जबाजारीपणा आणि पीक नुकसानीच्या विवंचनेतून विदगावातील दिव्यांग शेतकऱ्याची आत्महत्या
खान्देश

कर्जबाजारीपणा आणि पीक नुकसानीच्या विवंचनेतून विदगावातील दिव्यांग शेतकऱ्याची आत्महत्या

November 23, 2026
प्रमोद वाणी यांना महाराष्ट्र भूषण जीवन गौरव पुरस्कार
खान्देश

प्रमोद वाणी यांना महाराष्ट्र भूषण जीवन गौरव पुरस्कार

November 23, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add