• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

केरळी महिला ट्रस्टच्या अयप्पा स्वामी मंदिरात २३ नोव्हेंबरपासून कार्तिक पौर्णिमा उत्सव

मंदिरात पूजा-अभिषेकाची तयारी, भाविकांसाठी दर्शनाची सुविधा

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
November 21, 2026
in जळगाव जिल्हा
0
केरळी महिला ट्रस्टच्या अयप्पा स्वामी मंदिरात २३ नोव्हेंबरपासून कार्तिक पौर्णिमा उत्सव

जळगाव, प्रतिनिधी : निवृत्तीनगर येथील केरळी महिला ट्रस्टच्या अयप्पा स्वामी मंदिरात सोमवार, २३ नोव्हेंबरपासून कार्तिक पौर्णिमा उत्सवाला प्रारंभ होणार आहे. रात्री ११.३० वाजता पौर्णिमा तिथी सुरू होत असून, २४ नोव्हेंबर रोजी पौर्णिमा आणि कृत्तिका नक्षत्राचा विशेष शुभयोग जुळून येत आहे. या पार्श्वभूमीवर मंदिरात विविध धार्मिक विधी, पूजा-अभिषेक आणि आकर्षक सजावटीची तयारी सुरू आहे.यंदा पौर्णिमा तिथी २३ नोव्हेंबर रोजी रात्री ११.३० वाजता सुरू होऊन २४ नोव्हेंबर रोजी रात्री ९.४५ वाजेपर्यंत राहणार आहे. कृत्तिका नक्षत्रयुक्त पौर्णिमेचा शुभ मुहूर्त २४ नोव्हेंबर रोजी पहाटे २.०७ ते रात्री ९.४५ वाजेपर्यंत आहे. त्यानंतर रात्री ९.४५ वाजता कार्तिक नक्षत्राला प्रारंभ होऊन ते रात्री १२.३० वाजेपर्यंत राहणार आहे. केरळमधील गुरुजींच्या मार्गदर्शनाखाली या उत्सवाचा शुभमुहूर्त निश्चित करण्यात आला आहे.

उत्तर महाराष्ट्रातील हे एकमेव अयप्पा स्वामी मंदिर असून, येथे प्राणप्रतिष्ठा शास्त्रोक्त पद्धतीने करण्यात आली आहे. जानेवारी २००० मध्ये तामिळनाडू येथील गुरुजींच्या हस्ते मंदिरातील मूर्तींची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली होती. मंदिरात महाबलीपुरम येथून आणलेली कार्तिकस्वामींची मूर्ती, कोट्टायम तंथनम प्रतिकृती, मदुराई मीनाक्षी देवी आणि गुरुवायूर श्री विष्णू यांच्या मूर्ती विराजमान आहेत.कार्तिक पौर्णिमेनिमित्त मंदिरात धन, सोने आणि चांदी अशा तीन प्रकारचे अभिषेक केले जातात. यासाठी भाविकांकडून चिल्लर नाणी संकलित केली जातात.

चेन्नईहून विशेषतः मागविण्यात आलेल्या १०८ नाण्यांच्या माध्यमातून सोने आणि चांदीचा अभिषेक केला जातो. या पवित्र काळात अयप्पा स्वामींचे दर्शन घेणे शुभ मानले जात असल्याने दरवर्षी हजारो भाविक नवसपूर्तीसाठी मंदिरात येतात. उत्सव काळात शहरातील मान्यवरांच्या हस्ते विविध पूजा आणि अभिषेक विधी पार पडणार आहेत. गेल्या २५ वर्षांपासून केरळी परंपरेनुसार कार्तिक पौर्णिमेला मंदिराची विशेष सजावट करून ते भाविकांसाठी खुले ठेवले जाते.

जागृत देवस्थान म्हणून ओळखल्या जाणार्‍या या मंदिरात नवग्रहांसह अन्य देवतांची मंदिरेही असून, ती वर्षभर भाविकांसाठी दर्शनाकरिता खुली असतात.यंदाच्या उत्सवासाठी मंदिर परिसरात आकर्षक सजावट, रोषणाई, मंडप उभारणी आणि धार्मिक विधींची तयारी अंतिम टप्प्यात आहे. भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून अयप्पा स्वामींचे दर्शन घ्यावे आणि उत्सवाचा लाभ घ्यावा, असे आवाहन केरळी महिला ट्रस्टतर्फे करण्यात आले आहे.


 

ताज्या बातम्या

केरळी महिला ट्रस्टच्या अयप्पा स्वामी मंदिरात २३ नोव्हेंबरपासून कार्तिक पौर्णिमा उत्सव
जळगाव जिल्हा

केरळी महिला ट्रस्टच्या अयप्पा स्वामी मंदिरात २३ नोव्हेंबरपासून कार्तिक पौर्णिमा उत्सव

November 21, 2026
महादेव हॉस्पिटलमध्ये दुर्बिणीद्वारे केली मणक्याची यशस्वी शस्त्रक्रिया
आरोग्य

महादेव हॉस्पिटलमध्ये दुर्बिणीद्वारे केली मणक्याची यशस्वी शस्त्रक्रिया

November 21, 2026
नोटा बदलण्याच्या बहाण्याने महिलेची १९ हजार ५०० रुपयांची फसवणूक
गुन्हे

नोटा बदलण्याच्या बहाण्याने महिलेची १९ हजार ५०० रुपयांची फसवणूक

November 21, 2026
१५४ वर्षांची परंपरा लाभलेल्या श्रीराम रथोत्सव आज ; सर्वत्र भाविक भक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण
जळगाव जिल्हा

१५४ वर्षांची परंपरा लाभलेल्या श्रीराम रथोत्सव आज ; सर्वत्र भाविक भक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण

November 21, 2026
रस्त्यावरून जाताना व्यापाऱ्याची पावणेदोन लाखांची रोकड लंपास
खान्देश

पार्किंगमधून एक लाखांची रोकड लंपास

November 20, 2026
जळगाव जिल्हा पोलीस दलात खांदेपालट; तीन प्रभारी अधिकाऱ्यांच्या बदल्या
Uncategorized

जळगाव जिल्हा पोलीस दलात खांदेपालट; तीन प्रभारी अधिकाऱ्यांच्या बदल्या

November 20, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add