• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

५० लाखांच्या विमा रक्कम लाटण्याचा प्रयत्न करणाऱ्या १० जणांविरुद्ध गुन्हा

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
November 20, 2026
in खान्देश, गुन्हे, जळगाव जिल्हा
0
५० लाखांच्या विमा रक्कम लाटण्याचा प्रयत्न करणाऱ्या १० जणांविरुद्ध गुन्हा

चाळीसगाव, प्रतिनिधी :  विमा कंपनीकडून मोठी रक्कम मिळविण्यासाठी मृत्यू अपघातात झाल्याचा बनाव रचून बनावट साक्षीदार तयार करणे, अपघाताची खोटी माहिती देणे आणि खोटा गुन्हा दाखल करून विमा कंपनीची फसवणूक करण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी मेहुणबारे पोलीस ठाण्यात दहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, यामध्ये खासगी व्यक्तींसह पोलीस अधिकारी, कर्मचारी, वैद्यकीय अधिकारी आणि विमा एजंट यांचाही समावेश असल्याने पोलीस वर्तुळात खळबळ उडाली आहे.

पोलीस ठाण्यातील नोंदीनुसार, या प्रकरणातील कथित घटना ९ जून २०२५ रोजी रात्री ११.४८ वाजता चाळीसगाव तालुक्यातील जामदा शेत शिवारात घडल्याचे दाखविण्यात आले होते. मात्र, या कथित विमा फसवणूक प्रकरणी तब्बल वर्षभरानंतर म्हणजेच १९ नोव्हेंबर २०२६ रोजी सायंकाळी ६.२८ वाजता मेहुणबारे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

फिर्यादीच्या तक्रारीनुसार, संबंधित आरोपींनी आपसांत संगनमत करून बनावट साक्षीदार उभे केले. मृत्यू रस्ते अपघातात झाल्याचे भासवून अपघाताबाबत खोटी माहिती देण्यात आली. त्यानंतर या खोट्या माहितीच्या आधारे गुन्हा दाखल करून विमा कंपनीकडून आर्थिक लाभ मिळविण्याचा कट रचल्याचा आरोप आहे. सुरुवातीला विमा कंपनीकडे ५० लाख रुपयांचा विमा दावा (क्लेम) दाखल करण्यात आला होता. मात्र, या प्रकरणाचा तपास सुरू असताना आरोपी क्रमांक चार यांनी हा क्लेम मागे घेतल्याचे पोलीस नोंदीत नमूद आहे.

दरम्यान, आरोपी क्रमांक चार यांनी मृत व्यक्तीच्या नावावरील फिर्यादीच्या विमा कंपनीच्या डेबिट कार्डचा वापर करून १० लाख रुपये लुबाडल्याचा आणि विमा कंपनीची फसवणूक केल्याचा आरोपही तक्रारीत करण्यात आला आहे. या प्रकरणी भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम ३१८(४), ६१(२) तसेच अन्य लागू कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या दहा जणांचा आरोपींमध्ये समावेश

या प्रकरणात नितेश हिम्मत पाटील (रा. एरंडोल), आकाश सुनील पाटील (रा. जुवाडा, ता. भडगाव), प्रेमचंद त्र्यंबक पाटील (रा. एरंडोल), कविता संजय पाटील (रा. एरंडोल, जि. जळगाव), तपासी अंमलदार पोलीस उपनिरीक्षक रविंद्र एकनाथ बत्तासे, वैद्यकीय अधिकारी डॉ. मंदार करबेकर, विमा एजंट प्रवीण मयाराम पाटील (रा. पारोळा), पोलीस कर्मचारी महेंद्र प्रकाश पाटील, पोलीस कर्मचारी सचिन अशोक निकम आणि सुनील अशोक निकम यांचा समावेश आहे.

या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. विमा कंपनीची फसवणूक करण्यासाठी रचण्यात आलेल्या या कथित कटामागे आणखी कोणाचा सहभाग आहे का, तसेच या प्रकरणातून तपासात कोणते नवे धागेदोरे समोर येतात, याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.


 

ताज्या बातम्या

५० लाखांच्या विमा रक्कम लाटण्याचा प्रयत्न करणाऱ्या १० जणांविरुद्ध गुन्हा
खान्देश

५० लाखांच्या विमा रक्कम लाटण्याचा प्रयत्न करणाऱ्या १० जणांविरुद्ध गुन्हा

November 20, 2026
गोदावरी अभियांत्रिकीच्या आठ खेळाडूंची अ. भा. तलवारबाजी स्पर्धेसाठी निवड!
क्रिडा

गोदावरी अभियांत्रिकीच्या आठ खेळाडूंची अ. भा. तलवारबाजी स्पर्धेसाठी निवड!

November 19, 2026
महादेव हॉस्पिटलमध्ये ८० वर्षीय वृद्धावर मेंदूची अतिजोखमीची शस्त्रक्रिया यशस्वी
Uncategorized

महादेव हॉस्पिटलमध्ये ८० वर्षीय वृद्धावर मेंदूची अतिजोखमीची शस्त्रक्रिया यशस्वी

November 19, 2026
जळगाव जिल्हा क्रिकेट संघासाठी २२ नोव्हेंबरला निवड चाचणी
क्रिडा

जळगाव जिल्हा क्रिकेट संघासाठी २२ नोव्हेंबरला निवड चाचणी

November 19, 2026
जळगाव जिल्हा बँकेच्या निवडणुकीत महायुतीचे वर्चस्व; १२ जागांवर बिनविरोध विजय
खान्देश

जळगाव जिल्हा बँक निवडणुकीत ‘शेतकरी एकता पॅनेल’ मैदानात

November 19, 2026
कानबाईचे विसर्जन करतांना पाय घसरुन पाण्यात बुडून तरुणाचा मृत्यू
गुन्हे

एमबीबीएसच्या प्रथम वर्षातील विद्यार्थ्याचा वसतिगृहात मृत्यू

November 19, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add