• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

सरस्वती वहनाचे भक्तीमय स्वागत; मंत्री गिरीश महाजन यांची विशेष उपस्थिती

महापौर दीपमाला काळे, नगरसेविका ॲड. शुचिता हाडा यांच्या निवासस्थानी 'श्री सरस्वती वहनाचे' आगमन 

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
November 15, 2026
in जळगाव जिल्हा
0
सरस्वती वहनाचे भक्तीमय स्वागत; मंत्री गिरीश महाजन यांची विशेष उपस्थिती

जळगाव, प्रतिनिधी : जलग्रामोत्सव अर्थात श्रीराम मंदिर संस्थानच्या १५४ वर्षांच्या प्राचीन व ऐतिहासिक परंपरेचा वारसा सांगणाऱ्या श्रीराम रथोत्सवातील ‘श्री सरस्वती वहन’ सोहळा शनिवारी अत्यंत भावपूर्ण आणि भक्तिमय वातावरणात पार पडला. महानगरपालिकेच्या महापौर दीपमाला मनोज काळे व नगरसेविका ॲड. शुचिता अतुलसिंह हाडा यांच्या निवासस्थानी रात्री वहनाचे आगमन झाले.

या प्रसंगी आयोजित पानसुपारी कार्यक्रमास राज्याचे जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री ना. गिरीश महाजन, खासदार स्मिता वाघ, उपमहापौर मनोज चौधरी, माजी नगराध्यक्ष बंडूदादा काळे, भाजपचे महानगर जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी, शिवसेना जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, पोलीस पाटील प्रभाकर पाटील यांच्यासह राजकीय, सामाजिक, वैद्यकीय, औद्योगिक व धार्मिक क्षेत्रातील मान्यवरांनी हजेरी लावत प्रभू श्रीरामचंद्र व श्री सरस्वती मातेचे दर्शन घेतले.

मंत्रोच्चार आणि टाळ-मृदंगाच्या गजरात स्वागत..
रथयात्रेदरम्यान वहन निवासस्थानी दाखल होताच श्रीराम मंदिर संस्थानचे गादीपती ह.भ.प. मंगेश महाराज जोशी आणि ब्रह्मवृंदांचे अत्यंत पारंपरिक पद्धतीने व भक्तिभावाने स्वागत करण्यात आले. वेदघोष, टाळ-मृदंगाचा गजर आणि “जय श्रीराम”च्या जयघोषाने संपूर्ण रामदास कॉलनी परिसर दुमदुमून गेला होता. महापौर दीपमाला काळे व नगरसेविका ॲड. शुचिता हाडा यांनी सहकुटुंब वहनाची विधिवत पूजा व महाआरती केली.

यावेळी जळगाव शहर महानगरपालिकेचे नगरसेवक, भारतीय जनता पक्ष, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच परिसरातील नागरिक व महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. सर्व भाविक आणि मान्यवरांचे पानसुपारी देऊन स्वागत करण्यात आले. भक्ती, परंपरा आणि आपुलकीचा संगम असलेल्या या सोहळ्याने उपस्थितांची मने जिंकली.


 

ताज्या बातम्या

सरस्वती वहनाचे भक्तीमय स्वागत; मंत्री गिरीश महाजन यांची विशेष उपस्थिती
जळगाव जिल्हा

सरस्वती वहनाचे भक्तीमय स्वागत; मंत्री गिरीश महाजन यांची विशेष उपस्थिती

November 15, 2026
जळगाव जिल्हा पुरुष खो-खो संघाची निवड चाचणी उत्साहात; ५१ खेळाडूंचा उत्स्फूर्त सहभाग
क्रिडा

जळगाव जिल्हा पुरुष खो-खो संघाची निवड चाचणी उत्साहात; ५१ खेळाडूंचा उत्स्फूर्त सहभाग

November 15, 2026
भगवान बिरसा मुंडा यांची १५१ वी जयंती भाजप कार्यालयात उत्साहात साजरी
Uncategorized

भगवान बिरसा मुंडा यांची १५१ वी जयंती भाजप कार्यालयात उत्साहात साजरी

November 15, 2026
जिल्हाभर पोलिसांची विशेष तपासणी मोहीम; वाहतूक नियम मोडणाऱ्यांना दणका
Uncategorized

जिल्हाभर पोलिसांची विशेष तपासणी मोहीम; वाहतूक नियम मोडणाऱ्यांना दणका

November 15, 2026
लाच स्वीकारताना महावितरणचा सहाय्यक अभियंता एसीबीच्या जाळ्यात
गुन्हे

लाच स्वीकारताना महावितरणचा सहाय्यक अभियंता एसीबीच्या जाळ्यात

November 15, 2026
अखेर त्या अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल; ॲड. अनिकेत निकम यांनी रिक्षाचालकाची पोलीस ठाण्यात मांडली बाजू
गुन्हे

अखेर त्या अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल; ॲड. अनिकेत निकम यांनी रिक्षाचालकाची पोलीस ठाण्यात मांडली बाजू

November 15, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add