• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

डम्पिंग ग्राउंडवरील प्रकल्पाच्या कामाचा उपमहापौर व स्थायी समिती सभापतींकडून आढावा

ठेकेदाराला दिल्या कडक सूचना

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
November 14, 2026
in जळगाव जिल्हा
0
डम्पिंग ग्राउंडवरील प्रकल्पाच्या कामाचा उपमहापौर व स्थायी समिती सभापतींकडून आढावा

​जळगाव, प्रतिनिधी : शहरातील डम्पिंग ग्राउंड येथे सुरू असलेल्या कचरा प्रक्रिया प्रकल्पाच्या कामाची उपमहापौर मनोज चौधरी आणि स्थायी समिती सभापती डॉ. चंद्रशेखर पाटील यांनी संबंधित अधिकारी व ठेकेदारांसह पाहणी करून आढावा घेतला. ​याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त शोभा बाविस्कर, आरोग्य उपायुक्त निर्मला गायकवाड, मनपा आरोग्य विभाग प्रमुख समीर बोरोले, प्रकल्प प्रमुख अभियंता योगेश वाणी, तसेच ‘रॉयल वेस्टर्न’चे राऊत आणि ‘श्री श्री इन्फ्रास्ट्रक्चर’चे साईट इंजिनीयर उपस्थित होते.

गेल्या वेळी दि. ३० ऑक्टोबर रोजी उपमहापौर मनोज चौधरी तसेच सभापती ड्रा चंद्रशेखर पाटील याच्या सोबत आयुक्त आदित्य जीवणे व महापौर दीपमाला काळे, नगरसेविका प्रतिभा देशमुख, नगरसेविका जयश्री पाटील यांनीही या कामाची पाहणी केली होती. त्या तुलनेत आता कामात चांगली सुधारणा आणि गती दिसून येत आहे. सद्यस्थितीत रॅम्पचे काम सुमारे ८० टक्के, तर प्रोसेसिंग प्लांटचे काम ३० टक्के पूर्ण झाले आहे. रॅम्पचे उर्वरित काम येत्या महिनाभरात पूर्ण होईल, तसेच प्रोसेसिंग प्लांटचे फॅब्रिकेशन तयार असून काँक्रिटींग बेस व पिलरचे काम होताच पुढील ३ ते ४ महिन्यांत फॅब्रिकेशनचे काम पूर्ण केले जाईल, अशी माहिती ठेकेदाराकडून देण्यात आली. हे सर्व काम विहित मुदतीत पूर्ण करण्याचे लेखी हमीपत्र मनपा प्रशासनाला देण्याच्या सूचना उपमहापौर मनोज चौधरी व सभापती डॉ. चंद्रशेखर पाटील यांनी ‘रॉयल वेस्टर्न’च्या प्रतिनिधींना दिल्या.

​धूर आणि आगीच्या समस्येवर तातडीच्या सूचना..
डम्पिंग ग्राउंडवर वारंवार लागणाऱ्या आगीमुळे धुराचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. या धुरामुळे नागरिकांना दिवाळीसारखा सणही नीट साजरा करता आला नाही आणि घराबाहेर पडणेही कठीण झाले आहे. परिसरात दमा, त्वचाविकार (स्किन) आणि कॅन्सरसारख्या गंभीर आजारांचे प्रमाण वाढत असल्याने प्रशासनाने याकडे अजिबात दुर्लक्ष करू नये, अशी भूमिका पदाधिकाऱ्यांनी मांडली. यावर तातडीने उपाययोजना म्हणून डम्पिंग ग्राउंडवर २४ तास अग्निशमन दलाचा बंब तैनात ठेवण्यात यावा, जेणेकरून आग लागणार नाही आणि धूर होणार नाही, अशा स्पष्ट सूचना अतिरिक्त आयुक्त शोभा बाविस्कर यांना देण्यात आल्या.


 

ताज्या बातम्या

डम्पिंग ग्राउंडवरील प्रकल्पाच्या कामाचा उपमहापौर व स्थायी समिती सभापतींकडून आढावा
जळगाव जिल्हा

डम्पिंग ग्राउंडवरील प्रकल्पाच्या कामाचा उपमहापौर व स्थायी समिती सभापतींकडून आढावा

November 14, 2026
गोदावरी लक्ष्मी बँकेच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त सत्यनारायण पूजा उत्साहात
जळगाव जिल्हा

गोदावरी लक्ष्मी बँकेच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त सत्यनारायण पूजा उत्साहात

November 13, 2026
लामणदिव्याची कलाकृती अप्रतिम.. – ॲड. नीलम शिर्के सामंत
जळगाव जिल्हा

लामणदिव्याची कलाकृती अप्रतिम.. – ॲड. नीलम शिर्के सामंत

November 13, 2026
जिल्ह्यात प्रथमच महादेव रुग्णालयात एंडोस्कोपिक स्पाइन सर्जरी यशस्वी!
आरोग्य

जिल्ह्यात प्रथमच महादेव रुग्णालयात एंडोस्कोपिक स्पाइन सर्जरी यशस्वी!

November 12, 2026
जनजातीय गौरव सेवा सप्ताहातून आदिवासींच्या सर्वांगीण विकासाला नवी दिशा – ना. गुलाबराव पाटील
जळगाव जिल्हा

जनजातीय गौरव सेवा सप्ताहातून आदिवासींच्या सर्वांगीण विकासाला नवी दिशा – ना. गुलाबराव पाटील

November 11, 2026
माणुसकीचा अनोखा उपक्रम…! वंचित मुलांच्या चेहऱ्यावर फुलवला आनंद
जळगाव जिल्हा

माणुसकीचा अनोखा उपक्रम…! वंचित मुलांच्या चेहऱ्यावर फुलवला आनंद

November 11, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add