• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

दुहेरी आघात: जावयाच्या अंत्यविधीची तयारी सुरू असताना प्रकृती ढासळल्याने सासूचीही प्राणज्योत मालवली

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
November 11, 2026
in जळगाव जिल्हा
0
दुहेरी आघात: जावयाच्या अंत्यविधीची तयारी सुरू असताना प्रकृती ढासळल्याने सासूचीही प्राणज्योत मालवली

जळगाव, प्रतिनिधी : शहरातील बळीराम पेठ परिसरातील मलिक पार्क येथील रहिवासी मसूद शेख नवाज (वय ५९) यांचे दि. ९ रोजी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्या निधनाचा मोठा धक्का कुटुंबीयांना बसला असतानाच, जावयाच्या अंत्यविधीसाठी पुण्याहून जळगावात आलेल्या त्यांच्या सासू शकीला सलीम खान यांचेही अचानक निधन झाले. जावयाचा अंत्यविधी सुरू असतानाच सासूची प्राणज्योत मालवल्याने या हृदयद्रावक घटनेने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

शेख मसूद यांच्या निधनानंतर दि. १० रोजी सकाळी ११ वाजता बळीराम पेठेतील अल -अमीन अपार्टमेंट येथून त्यांची अंत्ययात्रा काढण्यात आली. त्यांच्या अंत्यविधीसाठी त्यांच्या सासू शकीला सलीम खान या पुणे येथून मंगळवारी सकाळीच जळगावात आल्या होत्या. जावयाच्या निधनाची बातमी आणि त्यानंतरचे दुःखद वातावरण यामुळे त्या व्यथित झाल्या होत्या.

अंत्यविधीची तयारी सुरू असतानाच प्रकृती ढासळली..
अंत्यविधीची तयारी सुरू असतानाच त्यांना अचानक अस्वस्थ वाटू लागले. नातेवाईकांनी तातडीने त्यांना खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, अजिंठा चौफुली येथील मुस्लिम कब्रस्तानमध्ये शेख मसूद यांचा अंत्यविधीसाठी घेऊन जात असतानाच रुग्णालयात त्यांच्या सासू शकीला खान यांचीही प्राणज्योत मालवली.

काही तासात दोघांचे निधन..
एकीकडे जावयाचा अंत्यविधी सुरू असताना दुसरीकडे सासूच्या निधनाची बातमी समोर आल्याने नातेवाईकांना मोठा धक्का बसला. अवघ्या काही तासांत एकाच कुटुंबावर दोन दुःखद प्रसंग ओढवल्याने उपस्थितांचे मन हेलावून गेले. या घटनेने परिसरात शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

शेख मसूद यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, ४ मुली, जावई आणि नातवंडे असा परिवार आहे. ते कय्यूम नवाज यांचे लहान बंधू, तर पत्रकार जकी अहमद यांचे मामा होत. तसेच शकीला सलीम खान यांच्या पश्चात पती, ४ मुले, ४ मुली, सून, जावई, नातवंडे असा परिवार आहे.


 

ताज्या बातम्या

दुहेरी आघात: जावयाच्या अंत्यविधीची तयारी सुरू असताना प्रकृती ढासळल्याने सासूचीही प्राणज्योत मालवली
जळगाव जिल्हा

दुहेरी आघात: जावयाच्या अंत्यविधीची तयारी सुरू असताना प्रकृती ढासळल्याने सासूचीही प्राणज्योत मालवली

November 11, 2026
अनैतिक संबंधाच्या संशयातून झालेल्या खून प्रकरणातील आरोपीला काही तासांतच केले जेरबंद
गुन्हे

अनैतिक संबंधाच्या संशयातून झालेल्या खून प्रकरणातील आरोपीला काही तासांतच केले जेरबंद

November 10, 2026
रौप्यमहोत्सवी ‘पाडवा पहाट’ कार्यक्रमात शास्त्रीय संगीत व सुगम संगीताची पर्वणी
जळगाव जिल्हा

रौप्यमहोत्सवी ‘पाडवा पहाट’ कार्यक्रमात शास्त्रीय संगीत व सुगम संगीताची पर्वणी

November 10, 2026
वरणगाव गोळीबार प्रकरणातील जखमीचा उपचारादरम्यान मृत्यू
गुन्हे

वरणगाव गोळीबार प्रकरणातील जखमीचा उपचारादरम्यान मृत्यू

November 9, 2026
दुष्काळी संकटातही बंजारा तांड्यात दिवाळीचा आनंद; मंत्री गुलाबराव पाटलांकडून शेतकऱ्यांना मदतीची ग्वाही
जळगाव जिल्हा

दुष्काळी संकटातही बंजारा तांड्यात दिवाळीचा आनंद; मंत्री गुलाबराव पाटलांकडून शेतकऱ्यांना मदतीची ग्वाही

November 8, 2026
भगवान धन्वंतरींचे पूजन व स्तवन पठण; आरोग्यसेवेचा संकल्प
जळगाव जिल्हा

भगवान धन्वंतरींचे पूजन व स्तवन पठण; आरोग्यसेवेचा संकल्प

November 8, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add