• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

रौप्यमहोत्सवी ‘पाडवा पहाट’ कार्यक्रमात शास्त्रीय संगीत व सुगम संगीताची पर्वणी

शास्त्रीय संगीत, नाट्यगीत आणि भक्तिगीतांच्या सादरीकरणाने महात्मा गांधी उद्यानात स्वरांची मैफल

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
November 10, 2026
in जळगाव जिल्हा
0
रौप्यमहोत्सवी ‘पाडवा पहाट’ कार्यक्रमात शास्त्रीय संगीत व सुगम संगीताची पर्वणी

जळगाव, प्रतिनिधी : दीपावलीच्या मंगलमय पहाटे शास्त्रीय संगीत, नाट्यगीत, अभंग आणि भक्तिगीतांच्या सुरेल सादरीकरणाने महात्मा गांधी उद्यानातील वातावरण भक्तिमय आणि संगीतमय झाले. आकाशवाणी जळगाव, स्व. वसंतराव चांदोरकर समिती प्रतिष्ठान आणि कै. नथ्यूशेठ चांदसरकर चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने, भवरलाल अँड कांताबाई जैन फाउंडेशनच्या सौजन्याने आयोजित रौप्यमहोत्सवी ‘पाडवा पहाट’ कार्यक्रमाला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

कार्यक्रमाचे उद्घाटन खा. स्मिता वाघ, ज्येष्ठ विधिज्ञ पद्मश्री खासदार ॲड. उज्ज्वल निकम, महापौर दीपमाला काळे, आकाशवाणी जळगावचे कार्यक्रम प्रमुख ज्ञानेश्वर बोबडे, दीपक चांदोरकर, पं. सुभाष दसककर आणि मेजर नाना वाणी यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाले. यावेळी आ. सुरेश भोळे, रमेशदादा जैन, कॅप्टन मोहन कुलकर्णी, व्ही. एम. भट, पीयूष रावळ, स्वानंद झारे यांच्यासह शहरातील संगीतप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात आशिष रानडे यांनी रामकली रागातील बंदिश आणि ‘दीपावली सूरके संग…’ या सादरीकरणाने केली. त्यानंतर आशिष रानडे, ईश्वरी दसककर-कदडी आणि पूजा दसककर यांनी ‘राधाधर मधुमिलिंद जय जय…’ ही रचना सादर केली. रानडे यांनी ‘कट्यार काळजात घुसली’ या नाटकातील ‘तेजो निधी लोहगोल’ हे नाट्यगीत प्रभावीपणे सादर करून रसिकांची दाद मिळवली. अहिर भैरव रागातील, श्रीनिवास खळे यांचे संगीत लाभलेले आणि पं. भीमसेन जोशी व लता मंगेशकर यांच्या स्वरांनी अजरामर झालेले ‘राम का गुणगान…’ हे गीत रानडे आणि ईश्वरी यांनी सादर केले.

या संगीत मैफलीत गायक आशिष रानडे, ईश्वरी दसककर-कदडी आणि पूजा दसककर यांना पं. सुभाष दसककर (संवादिनी), सुजित काळे (तबला), विजय नेवे (सिंथेसायझर) आणि नितेश पाटील (ॲक्टोपॅड) यांनी समर्थ साथसंगत केली. कार्यक्रमात सर्व कलाकारांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन दीपिका घैसास यांनी केले.


 

ताज्या बातम्या

रौप्यमहोत्सवी ‘पाडवा पहाट’ कार्यक्रमात शास्त्रीय संगीत व सुगम संगीताची पर्वणी
जळगाव जिल्हा

रौप्यमहोत्सवी ‘पाडवा पहाट’ कार्यक्रमात शास्त्रीय संगीत व सुगम संगीताची पर्वणी

November 10, 2026
वरणगाव गोळीबार प्रकरणातील जखमीचा उपचारादरम्यान मृत्यू
गुन्हे

वरणगाव गोळीबार प्रकरणातील जखमीचा उपचारादरम्यान मृत्यू

November 9, 2026
दुष्काळी संकटातही बंजारा तांड्यात दिवाळीचा आनंद; मंत्री गुलाबराव पाटलांकडून शेतकऱ्यांना मदतीची ग्वाही
जळगाव जिल्हा

दुष्काळी संकटातही बंजारा तांड्यात दिवाळीचा आनंद; मंत्री गुलाबराव पाटलांकडून शेतकऱ्यांना मदतीची ग्वाही

November 8, 2026
भगवान धन्वंतरींचे पूजन व स्तवन पठण; आरोग्यसेवेचा संकल्प
जळगाव जिल्हा

भगवान धन्वंतरींचे पूजन व स्तवन पठण; आरोग्यसेवेचा संकल्प

November 8, 2026
दृष्टीहीन व अपंग बांधवांना दिवाळीनिमित्त मिठाई व फरसाण वाटप
जळगाव जिल्हा

दृष्टीहीन व अपंग बांधवांना दिवाळीनिमित्त मिठाई व फरसाण वाटप

November 7, 2026
जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात अत्याधुनिक नेत्र आणि बाल अतिदक्षता विभागाचे लोकार्पण
आरोग्य

जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात अत्याधुनिक नेत्र आणि बाल अतिदक्षता विभागाचे लोकार्पण

November 6, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add