• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

भोकर स्टेट बँकेत सशस्त्र दरोडा; ३५ कोटींचे सोने, १५ लाखांची रोकड लुटली मात्र अवघ्या दोन तासांत चौघांना मुद्देमालासह अटक

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
November 1, 2026
in गुन्हे, जळगाव जिल्हा
0
भोकर स्टेट बँकेत सशस्त्र दरोडा; ३५ कोटींचे सोने, १५ लाखांची रोकड लुटली मात्र अवघ्या दोन तासांत चौघांना मुद्देमालासह अटक

जळगाव, प्रतिनिधी : तालुक्यातील भोकर गावात भरवस्तीत असलेल्या स्टेट बँकेच्या शाखेत शनिवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास दोन दुचाकींवरून आलेल्या चौघांनी हेल्मेट आणि मास्क घालून प्रवेश केला. त्यांनी रोखपाल आणि शाखा व्यवस्थापक जयेश राणे यांना एअरगनचा धाक दाखवून लॉकर रूममध्ये नेले आणि विरोध केल्यावर हवेत दोन राऊंड फायर केले. त्यानंतर दरोडेखोरांनी बँकेच्या १६ लॉकर्समधील सुमारे ३५ कोटी रुपयांचे सोन्याचे दागिने आणि १५ लाखांची रोकड सहा बॅगांमध्ये भरून पोबारा केला.

​घटनेची माहिती मिळताच जळगाव तालुका पोलिसांनी तातडीने परिसराचे रस्ते सील करत नाकाबंदी केली आणि ग्रामीण भागातील पोलीस पाटलांच्या मदतीने शोधमोहीम राबवून अवघ्या दोन तासांत चौघा संशयितांना मुददेमालासह जेरबंद केले. तपासात हा संपूर्ण कट कारागृहात रचल्याचे निष्पन्न झाले असून, २०२४ पासून खूनप्रकरणात कारागृहात असलेला गजानन पवार आणि जळगावच्या दुसऱ्या बँक दरोड्याप्रकरणातील बडतर्फ फौजदार शंकर जासक यांची तुरुंगात ओळख झाली होती. जामिनावर बाहेर आल्यावर त्यांनी चादरी विकणारे फेरीवाले बनून बँकेची रेकी केली होती.

​या प्रकरणात बडतर्फ पोलीस उपनिरीक्षक शंकर रमेश जासक, अंकुश श्रावण चव्हाण, गजानन राजेंद्र पवार आणि अंकुश तुळशीराम चव्हाण या चौघांना अटक करण्यात आली असून, पोलीस या गुन्ह्याचा अधिक तपास करत आहेत.

 


 

ताज्या बातम्या

भोकर स्टेट बँकेत सशस्त्र दरोडा; ३५ कोटींचे सोने, १५ लाखांची रोकड लुटली मात्र अवघ्या दोन तासांत चौघांना मुद्देमालासह अटक
गुन्हे

भोकर स्टेट बँकेत सशस्त्र दरोडा; ३५ कोटींचे सोने, १५ लाखांची रोकड लुटली मात्र अवघ्या दोन तासांत चौघांना मुद्देमालासह अटक

November 1, 2026
महापालिकेत सरदार वल्लभभाई पटेल जयंती उत्साहात साजरी; अधिकारी, कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय एकात्मतेची शपथ
जळगाव जिल्हा

महापालिकेत सरदार वल्लभभाई पटेल जयंती उत्साहात साजरी; अधिकारी, कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय एकात्मतेची शपथ

November 1, 2026
महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेतर्फे ‘चेस इन स्कूल’ उपक्रम सुरू; पुढील ५ वर्षांत ५ हजार शाळांपर्यंत पोहोचण्याचे लक्ष्य!
क्रिडा

महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेतर्फे ‘चेस इन स्कूल’ उपक्रम सुरू; पुढील ५ वर्षांत ५ हजार शाळांपर्यंत पोहोचण्याचे लक्ष्य!

October 31, 2026
गोदावरीत सरदार पटेल यांना अभिवादन; स्मृतींना दिला उजाळा
जळगाव जिल्हा

गोदावरीत सरदार पटेल यांना अभिवादन; स्मृतींना दिला उजाळा

October 31, 2026
प्लास्टिव्हिजन इंडिया २०२७ ठरणार जगातील दुसरे सर्वात मोठे प्लास्टिक प्रदर्शन
जळगाव जिल्हा

प्लास्टिव्हिजन इंडिया २०२७ ठरणार जगातील दुसरे सर्वात मोठे प्लास्टिक प्रदर्शन

October 31, 2026
अवघ्या चार महिन्यांच्या बाळाला मिळाले नवजीवन!
Uncategorized

अवघ्या चार महिन्यांच्या बाळाला मिळाले नवजीवन!

October 30, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add