• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

पाळधी रेल्वे पुलावर आयशरची दुचाकीला धडक; नवविवाहित तरुणाचा मृत्यू

तीन महिन्यांपूर्वीच झाला होता विवाह; अपघातांच्या मालिकेत बळींची संख्या १३ वर

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
October 28, 2026
in गुन्हे
0
पाळधी रेल्वे पुलावर आयशरची दुचाकीला धडक; नवविवाहित तरुणाचा मृत्यू

जळगाव, प्रतिनिधी : पाळधी-तरसोद बायपासवरील अपघातांचे सत्र थांबण्याचे नाव घेत नसून, पाळधी रेल्वे पुलावर आयशर मालवाहू वाहनाने दुचाकीला धडक दिल्याने योगेश गजमल राक्षे या तरुणाचा मृत्यू झाला. अवघ्या तीन महिन्यांपूर्वी विवाह झालेल्या योगेश यांच्या अपघाती मृत्यूने राक्षे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

योगेश राक्षे हे आव्हाणे येथील खताच्या गोदामात मजुरीचे काम करत होते. दुचाकीने घरी परतत असताना पाळधी रेल्वे पुलावर समोरून येणाऱ्या आयशर वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात ते गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले.

दरम्यान, ३० जुलै रोजी आसोदा पुलाचा भराव धसल्यानंतर या बायपासवरील वाहतूक बंद करण्यात आली होती. परिणामी, अवजड वाहनांची वाहतूक शहरातून वळवण्यात आली. त्यामुळे शहरातील तसेच पर्यायी मार्गांवरील वाहतुकीचा ताण वाढला असून, अपघातांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

जुलै महिन्यापासून आतापर्यंत या मार्गावर २५ अपघातांच्या घटनांची नोंद झाली असून, त्यामध्ये १३ जणांचा मृत्यू झाला आहे. वारंवार घडणाऱ्या या दुर्घटनांमुळे वाहनचालकांच्या सुरक्षिततेबाबत चिंता व्यक्त होत आहे. अवजड वाहतुकीचे योग्य नियोजन आणि अपघात रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना करण्याची गरज अधोरेखित झाली आहे.

या अपघातप्रकरणी पोलिसांनी आयशर वाहनचालक धर्मेंद्र प्रवीण सिंग गोयल याला ताब्यात घेतले आहे. पुढील तपास सुरू आहे.


 

ताज्या बातम्या

पाळधी रेल्वे पुलावर आयशरची दुचाकीला धडक; नवविवाहित तरुणाचा मृत्यू
गुन्हे

पाळधी रेल्वे पुलावर आयशरची दुचाकीला धडक; नवविवाहित तरुणाचा मृत्यू

October 28, 2026
मेहरुणमधील ४८३ चौ. मी. जागेची बनावट कागदपत्रांद्वारे परस्पर नोंदणी
Uncategorized

मेहरुणमधील ४८३ चौ. मी. जागेची बनावट कागदपत्रांद्वारे परस्पर नोंदणी

October 28, 2026
कुंटणखान्यावर पोलिसांची धाड; चालकाला अटक
गुन्हे

कुंटणखान्यावर पोलिसांची धाड; चालकाला अटक

October 28, 2026
किनगाव दगडफेक प्रकरणातील दोषींना तातडीने तडीपार करा; किरीट सोमय्यांची मागणी
गुन्हे

किनगाव दगडफेक प्रकरणातील दोषींना तातडीने तडीपार करा; किरीट सोमय्यांची मागणी

October 27, 2026
एरंडोल व धरणगाव तालुक्यांत सीइओ करिश्मा नायर यांचा क्षेत्रीय दौरा
खान्देश

एरंडोल व धरणगाव तालुक्यांत सीइओ करिश्मा नायर यांचा क्षेत्रीय दौरा

October 27, 2026
उघड्यावर कचरा टाकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई ; वार्ड क्र. १० मध्ये महापौरांकडून पाहणी
जळगाव जिल्हा

उघड्यावर कचरा टाकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई ; वार्ड क्र. १० मध्ये महापौरांकडून पाहणी

October 27, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add