• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

एरंडोल व धरणगाव तालुक्यांत सीइओ करिश्मा नायर यांचा क्षेत्रीय दौरा

घरकुल बांधकामे, शाळा, अंगणवाडी व प्राथमिक आरोग्य केंद्रांची प्रत्यक्ष पाहणी; दर्जेदार सुविधांसाठी प्रशासनाला निर्देश

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
October 27, 2026
in खान्देश, जळगाव जिल्हा, शैक्षणिक, सामाजिक
0
एरंडोल व धरणगाव तालुक्यांत सीइओ करिश्मा नायर यांचा क्षेत्रीय दौरा

जळगाव प्रतिनिधी : जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांनी मंगळवारी एरंडोल व धरणगाव तालुक्यांतील विविध गावांना प्रत्यक्ष भेट देऊन घरकुल बांधकामे, जिल्हा परिषद शाळा, अंगणवाडी, ग्रामपंचायत कार्यालय तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रातील कामकाजाची पाहणी केली. ग्रामीण भागातील नागरिकांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ प्रभावीपणे मिळतो आहे का, तसेच त्यांना पुरविण्यात येणाऱ्या मूलभूत सुविधा दर्जेदार आहेत का, याची त्यांनी यावेळी प्रत्यक्ष पडताळणी केली.

हनुमंतखेडे येथे घरकुल बांधकामांची पाहणी : दौऱ्याच्या सकाळच्या सत्रात मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांनी एरंडोल तालुक्यातील हनुमंतखेडे येथे भेट देऊन सुरू असलेल्या घरकुल बांधकामांची पाहणी केली. घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांना वेळेत घरे पूर्ण करता यावीत, यासाठी बांधकामाच्या प्रगतीचा आढावा घेण्यात आला. यावेळी त्यांनी गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व अंगणवाडीला भेट देऊन तेथील शैक्षणिक वातावरण, उपलब्ध सोयी-सुविधा आणि विद्यार्थ्यांना पुरविण्यात येणाऱ्या सुविधांची माहिती घेतली.

गालापूर ग्रामपंचायत कार्यालयाला भेट : यानंतर त्यांनी एरंडोल तालुक्यातील गालापूर येथील ग्रामपंचायत कार्यालयाला भेट देऊन ग्रामपंचायतीच्या कामकाजाचा आढावा घेतला. ग्रामपंचायतीच्या माध्यमातून ग्रामस्थांना पुरविण्यात येणाऱ्या विविध नागरी सुविधा आणि स्थानिक पातळीवरील प्रशासकीय कामकाजाची त्यांनी पाहणी केली.

सोनवद प्राथमिक आरोग्य केंद्रातील सुविधांची तपासणी : धरणगाव तालुक्यातील सोनवद येथील प्राथमिक आरोग्य केंद्रालाही मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांनी भेट दिली. यावेळी आरोग्य केंद्र परिसरातील स्वच्छता, औषधसाठा तसेच रुग्णांना उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या आरोग्यविषयक सोयी-सुविधांची तपासणी करण्यात आली.

ग्रामीण भागातील नागरिकांना आरोग्यसेवा वेळेत आणि दर्जेदार स्वरूपात मिळणे आवश्यक असल्याचे नमूद करत त्यांनी आरोग्य केंद्रातील सर्व सुविधा योग्य पद्धतीने उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले. नागरिकांना सेवा पुरविताना गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड करू नये, असेही त्यांनी स्पष्ट केले.

नागरिकांना दर्जेदार सेवा देण्यावर भर : या क्षेत्रीय दौऱ्याच्या माध्यमातून मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांनी ग्रामीण भागातील विकासकामे आणि मूलभूत सुविधांच्या प्रत्यक्ष स्थितीचा आढावा घेतला. शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी, घरकुलांची कामे वेळेत पूर्ण करणे, शैक्षणिक सुविधांचा दर्जा उंचावणे आणि आरोग्यसेवा अधिक सक्षम करणे यावर प्रशासनाने विशेष लक्ष केंद्रित करावे, हा या दौऱ्याचा मुख्य उद्देश होता.


 

Next Post
किनगाव दगडफेक प्रकरणातील दोषींना तातडीने तडीपार करा; किरीट सोमय्यांची मागणी

किनगाव दगडफेक प्रकरणातील दोषींना तातडीने तडीपार करा; किरीट सोमय्यांची मागणी

ताज्या बातम्या

किनगाव दगडफेक प्रकरणातील दोषींना तातडीने तडीपार करा; किरीट सोमय्यांची मागणी
गुन्हे

किनगाव दगडफेक प्रकरणातील दोषींना तातडीने तडीपार करा; किरीट सोमय्यांची मागणी

October 27, 2026
एरंडोल व धरणगाव तालुक्यांत सीइओ करिश्मा नायर यांचा क्षेत्रीय दौरा
खान्देश

एरंडोल व धरणगाव तालुक्यांत सीइओ करिश्मा नायर यांचा क्षेत्रीय दौरा

October 27, 2026
उघड्यावर कचरा टाकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई ; वार्ड क्र. १० मध्ये महापौरांकडून पाहणी
जळगाव जिल्हा

उघड्यावर कचरा टाकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई ; वार्ड क्र. १० मध्ये महापौरांकडून पाहणी

October 27, 2026
अनुभूतीचे ‘जलदूत’ घराघरांत पोहोचविणार जलसंवर्धनाचा संदेश
खान्देश

अनुभूतीचे ‘जलदूत’ घराघरांत पोहोचविणार जलसंवर्धनाचा संदेश

October 27, 2026
रुग्णाला दिले जीवदान! ; डॉ. उल्हास पाटील रुग्णालयात परमनंट पेसमेकरची यशस्वी शस्त्रक्रिया
आरोग्य

रुग्णाला दिले जीवदान! ; डॉ. उल्हास पाटील रुग्णालयात परमनंट पेसमेकरची यशस्वी शस्त्रक्रिया

October 27, 2026
कामगाराचे टोकाचे पाऊल; कंपनीबाहेरील झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह
गुन्हे

कामगाराचे टोकाचे पाऊल; कंपनीबाहेरील झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह

October 27, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add