• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

कामगाराचे टोकाचे पाऊल; कंपनीबाहेरील झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह

आत्महत्येचे कारण अस्पष्ट

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
October 27, 2026
in गुन्हे, जळगाव जिल्हा
0
कामगाराचे टोकाचे पाऊल; कंपनीबाहेरील झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह

जळगाव (प्रतिनिधी) : जळगाव शहरातील महाबळ परिसरात वास्तव्यास असलेल्या ४५ वर्षीय कंपनी कामगाराचा कंपनीबाहेरील झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आल्याची घटना आज मंगळवारी (दि. २७ ऑक्टोबर) सकाळी उघडकीस आली. अरविंद शामराव पाटील असे मृत कामगाराचे नाव आहे. त्यांच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून, या प्रकरणी पाळधी दूरक्षेत्र पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अरविंद पाटील हे पाळधी पोलिस स्टेशन हद्दीतील स्नेहल इंडस्ट्रीज या कंपनीत गेल्या काही वर्षांपासून काम करत होते. ते जळगाव शहरातील महाबळ परिसरात वास्तव्यास होते. आज मंगळवारी सकाळी नेहमीप्रमाणे ते कामावर जाण्यासाठी सकाळी सहा वाजेच्या सुमारास घरातून निघाले होते.

दरम्यान, कंपनीबाहेरील एका झाडाला सुती दोरीच्या साहाय्याने गळफास घेतलेल्या अवस्थेत ते आढळून आले. सकाळी कामासाठी कंपनीत आलेल्या कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास हा प्रकार आल्यानंतर परिसरात खळबळ उडाली. सहकाऱ्यांनी तातडीने त्यांना खाली उतरवून उपचारासाठी जळगाव येथील जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून त्यांना मृत घोषित केले.

या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. अरविंद पाटील यांनी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल का उचलले, याबाबत अद्याप कोणतीही ठोस माहिती समोर आलेली नाही. पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून, या घटनेमागील कारणांचा शोध घेण्यासाठी पुढील तपास सुरू आहे.


 

Next Post
मृत्यूच्या दारातून रुग्णाला दिले जीवदान! ; डॉ. उल्हास पाटील रुग्णालयात रुग्णावर परमनंट पेसमेकरची यशस्वी शस्त्रक्रिया

मृत्यूच्या दारातून रुग्णाला दिले जीवदान! ; डॉ. उल्हास पाटील रुग्णालयात रुग्णावर परमनंट पेसमेकरची यशस्वी शस्त्रक्रिया

ताज्या बातम्या

मृत्यूच्या दारातून रुग्णाला दिले जीवदान! ; डॉ. उल्हास पाटील रुग्णालयात रुग्णावर परमनंट पेसमेकरची यशस्वी शस्त्रक्रिया
आरोग्य

मृत्यूच्या दारातून रुग्णाला दिले जीवदान! ; डॉ. उल्हास पाटील रुग्णालयात रुग्णावर परमनंट पेसमेकरची यशस्वी शस्त्रक्रिया

October 27, 2026
कामगाराचे टोकाचे पाऊल; कंपनीबाहेरील झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह
गुन्हे

कामगाराचे टोकाचे पाऊल; कंपनीबाहेरील झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह

October 27, 2026
मुलीच्या साखरपुड्यापूर्वीच काळाचा घाला! शेतात विजेच्या धक्क्याने शेतकरी दाम्पत्याचा मृत्यू
गुन्हे

मुलीच्या साखरपुड्यापूर्वीच काळाचा घाला! शेतात विजेच्या धक्क्याने शेतकरी दाम्पत्याचा मृत्यू

October 27, 2026
दिवाळीनिमित्त जळगाव शहरात मोकळ्या प्लॉटमधील स्वच्छता मोहीम
खान्देश

दिवाळीनिमित्त जळगाव शहरात मोकळ्या प्लॉटमधील स्वच्छता मोहीम

October 27, 2026
शहर स्वच्छतेसाठी महापौर दीपमाला काळे आक्रमक; काम न करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाईचा इशारा
जळगाव जिल्हा

शहर स्वच्छतेसाठी महापौर दीपमाला काळे आक्रमक; काम न करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाईचा इशारा

October 27, 2026
मोतीबिंदू मुक्त जळगाव जिल्हा’ अभियान; चोपड्यात मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीराचा प्रारंभ
आरोग्य

मोतीबिंदू मुक्त जळगाव जिल्हा’ अभियान; चोपड्यात मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीराचा प्रारंभ

October 27, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add