• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

फुपनगरी फाट्यावर मृत्यूचा सापळा ! भरधाव वाहनाच्या धडकेत २१ वर्षीय तरुणाचा मृत्यू

तीन वर्षांत ४ जणांचा बळी; अपघातांचे सत्र सुरूच, सुरक्षिततेच्या उपाययोजनांची मागणी

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
October 23, 2026
in गुन्हे, जळगाव जिल्हा
0
फुपनगरी फाट्यावर मृत्यूचा सापळा ! भरधाव वाहनाच्या धडकेत २१ वर्षीय तरुणाचा मृत्यू

जळगाव, प्रतिनिधी : कानळदा रोडवरील फुपनगरी फाट्याजवळ भरधाव अज्ञात वाहनाने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने पाळधी येथील २१ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. सागर सुनील कोळी असे मृत तरुणाचे नाव असून, बुधवार, २१ ऑक्टोबर रोजी मध्यरात्री हा अपघात घडला. अपघातानंतर वाहनचालक घटनास्थळावरून पसार झाला. या घटनेमुळे फुपनगरी फाट्यावरील अपघातांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

सागर कोळी हा पाळधी (ता. धरणगाव) येथील रहिवासी होता. रात्री काम आटोपून तो दुचाकीने (एमएच १९ ईएम ६१८५) आपल्या गावी परतत होता. कानळदा रोडवरील फुपनगरी फाट्याजवळून जात असताना भरधाव अज्ञात वाहनाने त्याच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या भीषण धडकेत सागरचा मृत्यू झाला.

अपघातानंतर संबंधित वाहनचालक जखमी तरुणाला मदत न करता घटनास्थळावरून पळून गेला. स्थानिक नागरिकांच्या मदतीने सागरला जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नेण्यात आले; मात्र या अपघातात त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी नवल कोळी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक श्यामकुमार मोरे तपास करीत आहेत.

कानळदा रोडवरील फुपनगरी फाट्याजवळील धोकादायक वळण अपघातांचे केंद्र बनत चालले आहे. या ठिकाणी वारंवार अपघात होत असल्याने वाहनचालकांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. या घटनेच्या दोन दिवस आधी, १८ ऑक्टोबर रोजी रात्रीही याच परिसरात अपघात झाला होता. त्या वेळी सुदैवाने जीवितहानी झाली नव्हती.

मात्र, गेल्या वर्षी याच वळणावर झालेल्या अपघातात दोन तरुणांना प्राण गमवावे लागले होते. गेल्या तीन वर्षांत या ठिकाणी सात ते आठ भीषण अपघात झाले असून, त्यामध्ये चार जणांचा मृत्यू, तर सात ते आठ जण गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे.

सातत्याने होणाऱ्या अपघातांमुळे या ठिकाणी तातडीने उपाययोजना करण्याची गरज व्यक्त होत आहे. धोकादायक वळणावर योग्य दिशादर्शक फलक, रात्रीच्या वेळी पुरेशी प्रकाशव्यवस्था आणि आवश्यक सुरक्षा उपाययोजना कराव्यात, अशी मागणी वाहनचालक व नागरिकांकडून होत आहे. आणखी किती बळी गेल्यानंतर प्रशासनाला जाग येणार, असा सवालही उपस्थित केला जात आहे.


 

Next Post
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर !

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर !

ताज्या बातम्या

महापौर दीपमाला काळे यांच्या अचानक पाहणी दौऱ्याने प्रशासकीय यंत्रणेची झाडाझडती
जळगाव जिल्हा

महापौर दीपमाला काळे यांच्या अचानक पाहणी दौऱ्याने प्रशासकीय यंत्रणेची झाडाझडती

October 23, 2026
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर !
जळगाव जिल्हा

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर !

October 23, 2026
फुपनगरी फाट्यावर मृत्यूचा सापळा ! भरधाव वाहनाच्या धडकेत २१ वर्षीय तरुणाचा मृत्यू
गुन्हे

फुपनगरी फाट्यावर मृत्यूचा सापळा ! भरधाव वाहनाच्या धडकेत २१ वर्षीय तरुणाचा मृत्यू

October 23, 2026
अवैध वाळू वाहतुकीवर पोलिसांचा दणका; डंपर, ट्रॅक्टरसह साडेचार लाखांचा मुद्देमाल जप्त
गुन्हे

नशेसाठी पैसे न दिल्याने भंगार व्यावसायिकावर धारदार शस्त्राने हल्ला

October 23, 2026
डीयूपीएमसीच्या ऋग्वेद देशपांडे, जान्हवी अर्धापूरकर  यांची विद्यापीठाच्या बुद्धिबळ संघात निवड
क्रिडा

डीयूपीएमसीच्या ऋग्वेद देशपांडे, जान्हवी अर्धापूरकर  यांची विद्यापीठाच्या बुद्धिबळ संघात निवड

October 23, 2026
किरण चेतन तळेले यांना लेवा भ्रातृ मंडळ, पुणेतर्फे २५,००० शैक्षणिक मदत
Uncategorized

किरण चेतन तळेले यांना लेवा भ्रातृ मंडळ, पुणेतर्फे २५,००० शैक्षणिक मदत

October 23, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add