जळगाव, प्रतिनिधी : जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातर्फे आयोजित जिल्हास्तरीय १७ वर्षांखालील मनपा कॅरम स्पर्धेत विद्या इंग्लिश स्कूलची विद्यार्थिनी दुर्गेश्वरी योगेश धोंगडे हिने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करीत विजेतेपद पटकावले. तिने स्पर्धेतील पाचही प्रतिस्पर्ध्यांना २५-० अशा फरकाने पराभूत करीत आपले वर्चस्व सिद्ध केले. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल तिला चषक देऊन गौरविण्यात आले.

ही स्पर्धा ११ ऑक्टोबर रोजी कांताई सभागृहात पार पडली. या स्पर्धेत विविध शाळांमधील ६४ खेळाडूंनी सहभाग नोंदविला होता. दुर्गेश्वरीने पहिल्या फेरीत श्रुष्टी शिंपी, तर पुढील फेरीत गोजराणी बोडबडे आणि दिव्या गायकवाड यांच्यावर मात केली. उपांत्य फेरीत आयशा शेख हिला पराभूत करीत तिने अंतिम फेरीत प्रवेश केला. अंतिम सामन्यात श्रावणी मोरे हिला पराभूत करून दुर्गेश्वरीने विजेतेपदावर आपले नाव कोरले.

पारितोषिक वितरण समारंभाला अताउल्ला खान, सय्यद मोहसीन, जिया खान, तन्वीर खान, शिवछत्रपती पुरस्कारविजेते योगेश धोंगडे आणि शिक्षिका कोमल तायडे उपस्थित होते. दुर्गेश्वरीने मिळविलेल्या यशाबद्दल तिचे कौतुक करण्यात आले.

पहिल्या आठ क्रमांने विजयी झालेले खेळाडू पुढीलप्रमाणे आहेत. दुर्गेश्वरी योगेश धोंगडे विजयी, उपविजयी श्रावणी मोरे (विद्या इंग्लिश मिडीयम स्कूल), तृतीय क्रमांकाने जुनेरा खाटिक, चतुर्थ क्रमाकाने आयशा शेख (ईकरा शाहिन), आराध्या एकशिंगे, दिव्या गायकवाड (अनुभूती स्कूल), अलिस्बा खान (ईकरा शाहीन), नेहा शेख (अलफैज स्कूल)









