• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

वरणगावात प्लास्टिकविरोधी धडक मोहीम; २५ किलो प्लास्टिक जप्त, ३५ हजारांचा दंड वसूल

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
October 9, 2026
in खान्देश, गुन्हे, जळगाव जिल्हा
0
वरणगावात प्लास्टिकविरोधी धडक मोहीम; २५ किलो प्लास्टिक जप्त, ३५ हजारांचा दंड वसूल

वरणगाव, प्रतिनिधी : सेवा संकल्प अभियानांतर्गत वरणगाव नगरपरिषदेने प्लास्टिकबंदीची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी शहरात विशेष मोहीम राबवली. या कारवाईत २५ किलो प्रतिबंधित सिंगल यूज प्लास्टिक जप्त करण्यात आले असून, संबंधित व्यापाऱ्यांकडून ३५ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.

मुख्याधिकारी राहुल भोये यांच्या मार्गदर्शनाखाली नगरपरिषदेच्या स्वच्छता व नियंत्रण पथकाने शहरातील प्रमुख बाजारपेठा, आठवडे बाजार परिसर आणि विविध दुकानांमध्ये अचानक तपासणी केली. यावेळी प्रतिबंधित प्लास्टिक पिशव्या, ग्लास, वाट्या तसेच अन्य प्लास्टिक साहित्याचा वापर करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली.

या मोहिमेत रशीद नौरंगाबादी, राहुल जाधव, संतोष गुजरे, दीपक काळे, राजू गायकवाड, संजय माळी आणि रविकांत नारखेडे यांनी सहभाग घेतला. प्लास्टिक प्रदूषणामुळे पर्यावरण आणि नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. त्यामुळे व्यापारी व नागरिकांनी प्रतिबंधित सिंगल यूज प्लास्टिकचा वापर पूर्णपणे टाळून कापडी पिशव्यांचा पर्याय स्वीकारावा. शहर स्वच्छ, सुंदर आणि प्लास्टिकमुक्त करण्यासाठी नगरपरिषदेची ही मोहीम यापुढेही सुरू राहणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले.

नगरपरिषदेच्या या कारवाईचे पर्यावरणप्रेमी नागरिकांकडून स्वागत होत असून, प्लास्टिकमुक्त वरणगाव घडविण्यासाठी व्यापारी आणि नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन नगरपालिका प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.

Next Post
६५.७० कोटींचे अंमली पदार्थ नष्ट; जळगाव पोलिसांचे अवैध अंमली पदार्थविरोधी मोहिमेत मोठे यश

६५.७० कोटींचे अंमली पदार्थ नष्ट; जळगाव पोलिसांचे अवैध अंमली पदार्थविरोधी मोहिमेत मोठे यश

ताज्या बातम्या

जैन इरिगेशनला ‘इंडस्ट्री एक्सलन्स अवॉर्ड’चा मान!
खान्देश

जैन इरिगेशनला ‘इंडस्ट्री एक्सलन्स अवॉर्ड’चा मान!

October 9, 2026
६५.७० कोटींचे अंमली पदार्थ नष्ट; जळगाव पोलिसांचे अवैध अंमली पदार्थविरोधी मोहिमेत मोठे यश
खान्देश

६५.७० कोटींचे अंमली पदार्थ नष्ट; जळगाव पोलिसांचे अवैध अंमली पदार्थविरोधी मोहिमेत मोठे यश

October 9, 2026
वरणगावात प्लास्टिकविरोधी धडक मोहीम; २५ किलो प्लास्टिक जप्त, ३५ हजारांचा दंड वसूल
खान्देश

वरणगावात प्लास्टिकविरोधी धडक मोहीम; २५ किलो प्लास्टिक जप्त, ३५ हजारांचा दंड वसूल

October 9, 2026
डॉ. वर्षा पाटील यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव
खान्देश

डॉ. वर्षा पाटील यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव

October 9, 2026
प्रहार’ चित्रपटातील राजकुमार राव व वामिका गब्बी जळगावकर रसिकांना भेटणार
जळगाव जिल्हा

प्रहार’ चित्रपटातील राजकुमार राव व वामिका गब्बी जळगावकर रसिकांना भेटणार

October 9, 2026
चिल्लरवर चोरट्यांचा डल्ला; किराणा दुकानातून १.७५ लाखांची रोकड लंपास
गुन्हे

चिल्लरवर चोरट्यांचा डल्ला; किराणा दुकानातून १.७५ लाखांची रोकड लंपास

October 9, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add