• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

चिल्लरवर चोरट्यांचा डल्ला; किराणा दुकानातून १.७५ लाखांची रोकड लंपास

विसनजी नगरातील मयूर ट्रेडर्सला लक्ष्य; चोरीच्या रकमेत १ लाख १६ हजारांची चिल्लर

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
October 9, 2026
in गुन्हे, जळगाव जिल्हा
0
चिल्लरवर चोरट्यांचा डल्ला; किराणा दुकानातून १.७५ लाखांची रोकड लंपास

चिल्लरवर चोरट्यांचा डल्ला; किराणा दुकानातून १.७५ लाखांची रोकड लंपास

विसनजी नगरातील मयूर ट्रेडर्सला लक्ष्य; चोरीच्या रकमेत १ लाख १६ हजारांची चिल्लर

जळगाव, प्रतिनिधी : बंद किराणा दुकानाचे शटर रॉडच्या सहाय्याने उचकवून चोरट्यांनी दुकानातील तब्बल १ लाख ७५ हजार २५० रुपयांची रोकड चोरून नेल्याची घटना विसनजी नगरात घडली. विशेष म्हणजे, चोरी झालेल्या रकमेत १ लाख १६ हजार २५० रुपयांच्या चिल्लरचा समावेश आहे. या प्रकरणी जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गणपती नगरातील व्यावसायिक मयूर पुरुषोत्तम मंडोरे (वय ४१) यांचे विसनजी नगरात ‘मयूर ट्रेडर्स’ नावाचे किराणा दुकान आहे. ६ ऑक्टोबर रोजी पहाटे दुकान बंद असताना अज्ञात चोरट्यांनी रॉडच्या सहाय्याने दुकानाचे शटर उचकवून आत प्रवेश केला. त्यानंतर दुकानातील रोकड घेऊन चोरटे पसार झाले.

चोरट्यांनी विविध दरांच्या नोटांसह मोठ्या प्रमाणात चिल्लरही चोरून नेली. यात ५ रुपयांच्या नाण्यांची ३१ हजार २५० रुपये किमतीची चार बॅग, १ रुपयांच्या नाण्यांची ५ हजार रुपये किमतीची एक बॅग, १० रुपयांची ४० हजार रुपये किमतीची चार हजार नाणी आणि २० रुपयांची ४० हजार रुपये किमतीची दोन हजार नाणी यांचा समावेश आहे.

अशा प्रकारे एकूण १ लाख ७५ हजार २५० रुपयांची रोकड चोरीस गेली. या घटनेमुळे परिसरातील व्यावसायिकांमध्ये चिंता व्यक्त होत असून, जिल्हा पेठ पोलीस अज्ञात चोरट्यांचा शोध घेत आहेत.

ताज्या बातम्या

चिल्लरवर चोरट्यांचा डल्ला; किराणा दुकानातून १.७५ लाखांची रोकड लंपास
गुन्हे

चिल्लरवर चोरट्यांचा डल्ला; किराणा दुकानातून १.७५ लाखांची रोकड लंपास

October 9, 2026
भुसावळमध्ये वॉटर पार्कजवळ तरुणाचा मृतदेह; मृत्यूचे गूढ कायम
गुन्हे

भुसावळमध्ये वॉटर पार्कजवळ तरुणाचा मृतदेह; मृत्यूचे गूढ कायम

October 9, 2026
जळगावात अल्पवयीन मुलासह १९ वर्षीय तरुणी बेपत्ता; अपहरणाचे गुन्हे दाखल
गुन्हे

जळगावात अल्पवयीन मुलासह १९ वर्षीय तरुणी बेपत्ता; अपहरणाचे गुन्हे दाखल

October 9, 2026
अवैध वाळू वाहतुकीवर पोलिसांचा दणका; डंपर, ट्रॅक्टरसह साडेचार लाखांचा मुद्देमाल जप्त
गुन्हे

इन्स्टाग्रामवर कपडे मागवणे महिलेला पडले महागात!

October 9, 2026
नाना पाटेकरांच्या आठवणी जैन हिल्सच्या मातीत कायम जिवंत
खान्देश

नाना पाटेकरांच्या आठवणी जैन हिल्सच्या मातीत कायम जिवंत

October 9, 2026
कारचा अपघात अन् गुटखा तस्करी उघड ;दोघे अटकेत
गुन्हे

कारचा अपघात अन् गुटखा तस्करी उघड ;दोघे अटकेत

October 9, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add