• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

जिल्हास्तरीय शालेय खो-खो स्पर्धेला उत्साहात सुरुवात

१६ संघांचा सहभाग; अनुभूती इंग्लिश मीडियम स्कूलने पटकावले प्रथम स्थान

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
October 1, 2026
in क्रिडा, खान्देश, जळगाव जिल्हा
0
जिल्हास्तरीय शालेय खो-खो स्पर्धेला उत्साहात सुरुवात

जळगाव, प्रतिनिधी : क्रीडा व युवा सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा क्रीडा परिषद, जळगाव तसेच जळगाव शहर महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने आणि जळगाव जिल्हा खो-खो असोसिएशनच्या सहकार्याने जिल्हास्तरीय शालेय खो-खो स्पर्धेला उत्साहात सुरुवात झाली. या स्पर्धेत मुलांच्या १६ संघांनी सहभाग नोंदविला.

स्पर्धेचे उद्घाटन जळगाव मनपाच्या महापौर दीपमालाताई काळे यांच्या हस्ते झाले. यावेळी मनपा क्रीडा अधिकारी दिनानाथ भामरे, शिवछत्रपती पुरस्कारप्राप्त अध्यक्ष गणपतराव पोळ, महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे सहसचिव व माजी खेळाडू जयांशू पोळ, खजिनदार डॉ. तुषार राणे, जळगाव जिल्हा खो-खो असोसिएशनच्या विद्या कलंत्री, राज्यस्तरीय पंच दिलीप सूर्यवंशी तसेच क्रीडा शिक्षिका सरस्वती पाटील उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एन. डी. सोनवणे यांनी केले, तर आभार विशाल पाटील यांनी मानले. क्रीडा अधिकारी सुरेश थरकुडे आणि जळगाव जिल्हा खो-खो असोसिएशनचे सचिव राहुल पोळ यांच्या मार्गदर्शनाखाली विशाल पाटील, गोपाळ पवार, छगन मुखडे, कमलेश पावरा, केतन चौधरी, मोहित गुंजकर, हिमांशू पाटील, हर्षल बेडीसकर व प्रथमेश कंखरे यांनी पंच म्हणून काम पाहिले.

स्पर्धा यशस्वी करण्यासाठी जळगाव जिल्हा खो-खो असोसिएशन तसेच श्री. गणपतराव पोळ क्रीडा विकास प्रबोधिनीच्या खेळाडूंनी परिश्रम घेतले.

१४ वर्षांखालील मुलांच्या गटात अनुभूती इंग्लिश मीडियम स्कूल, जळगावने प्रथम क्रमांक पटकावला. श्रीराम माध्यमिक विद्यालय, जळगावने द्वितीय, तर आर. आर. विद्यालय, जळगावने तृतीय क्रमांक मिळविला.

Next Post
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त शाहूनगरमध्ये ५ अंगणवाड्यांमध्ये खाऊ व भेटवस्तू वाटप

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त शाहूनगरमध्ये ५ अंगणवाड्यांमध्ये खाऊ व भेटवस्तू वाटप

ताज्या बातम्या

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त शाहूनगरमध्ये ५ अंगणवाड्यांमध्ये खाऊ व भेटवस्तू वाटप
खान्देश

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त शाहूनगरमध्ये ५ अंगणवाड्यांमध्ये खाऊ व भेटवस्तू वाटप

October 1, 2026
जिल्हास्तरीय शालेय खो-खो स्पर्धेला उत्साहात सुरुवात
क्रिडा

जिल्हास्तरीय शालेय खो-खो स्पर्धेला उत्साहात सुरुवात

October 1, 2026
खून करून पळाले, रेल्वेने आले अन् जळगावात अडकले
खान्देश

खून करून पळाले, रेल्वेने आले अन् जळगावात अडकले

October 1, 2026
उपमहापौर मनोज चौधरी यांचा मिशन लक्षवेधच्या ॲथलेटिक्स खेळाडूंशी संवाद; खेळाडूंना दिले मोलाचे मार्गदर्शन
क्रिडा

उपमहापौर मनोज चौधरी यांचा मिशन लक्षवेधच्या ॲथलेटिक्स खेळाडूंशी संवाद; खेळाडूंना दिले मोलाचे मार्गदर्शन

October 1, 2026
फलकनाज शेखचे राज्यस्तरीय स्पर्धेत रौप्यपदक
जळगाव जिल्हा

फलकनाज शेखचे राज्यस्तरीय स्पर्धेत रौप्यपदक

October 1, 2026
गोदावरी अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांची जैन फार्म फ्रेश व गांधी तीर्थला भेट
खान्देश

गोदावरी अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांची जैन फार्म फ्रेश व गांधी तीर्थला भेट

October 1, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add