• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

खून करून पळाले, रेल्वेने आले अन् जळगावात अडकले

लोकेशनच्या आधारे शनिपेठ पोलिसांची कारवाई; हिमाचलमधील चौघे आरोपी ताब्यात

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
October 1, 2026
in खान्देश, गुन्हे, जळगाव जिल्हा
0
खून करून पळाले, रेल्वेने आले अन् जळगावात अडकले

जळगाव, प्रतिनिधी : हिमाचल प्रदेशातील खूनप्रकरणात फरार झाल्यानंतर मुंबईच्या दिशेने निघालेल्या चार आरोपींचा तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे शनिपेठ पोलिसांनी जळगावात शोध घेत जेरबंद केले. पैसे संपल्याने व भूक लागल्याने जळगाव रेल्वे स्थानकावर उतरलेल्या या आरोपींनी मोबाईल विक्रीसाठी शहरात हालचाली सुरू केल्याची माहिती पोलिसांना मिळाली. हिमाचल प्रदेश पोलिसांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे शनिपेठ पोलिसांनी तातडीने शोधमोहीम राबवून चौघांना ताब्यात घेतले.

हिमाचल प्रदेश पोलिसांच्या माहितीनुसार, मुकेश कुमार यांच्या खूनप्रकरणी ३० सप्टेंबर २०२६ रोजी एफआयआर क्रमांक ८२/२०२६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मयत मुकेश कुमार आणि आरोपी एकत्र दारू पीत असताना त्यांच्यात वाद झाला. या वादातून खून झाल्याची प्राथमिक माहिती तपासात समोर आली आहे. खून केल्यानंतर मृतदेह तलावात फेकण्यात आल्याची माहितीही तपासादरम्यान समोर आली असल्याचे हिमाचल प्रदेश पोलिसांनी कळविले.

घटनेनंतर चारही आरोपी किसनपूर येथून अंबाला येथे पोहोचले. त्यानंतर त्यांनी ११०५८ अमृतसर-मुंबई एक्स्प्रेसने मुंबईच्या दिशेने प्रवास सुरू केला. प्रवासादरम्यान पैसे संपल्याने आणि भूक लागल्याने ते जळगाव रेल्वे स्थानकावर उतरले. त्यानंतर मोबाईल विक्री करण्यासाठी ते जळगाव शहरात आल्याची माहिती पोलिसांच्या तपासात समोर आली.

हिमाचल प्रदेश पोलिसांकडून शोध सुरू असलेल्या आरोपींमध्ये चंदन कुमार (रा. कुतुबपूर, जि. मुझफ्फरपूर, बिहार), रोशन गोगल मुखिया (रा. कुतुबपूर, जि. मुझफ्फरपूर, बिहार), संतोष कुमार (रा. बरियारपूर, जि. मुझफ्फरपूर, बिहार) आणि अजित कुमार जोगा मेहतो (रा. पंडरक, जि. पाटणा, बिहार) यांचा समावेश आहे. चारही आरोपी शनिपेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीत असल्याचे लोकेशन हिमाचल प्रदेश पोलिसांना मिळाले. ही माहिती त्यांनी शनिपेठ पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी डॉ. विशाल जयस्वाल यांना दिली. माहिती मिळताच त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना अवगत करून गुन्हे शोध पथकाला आरोपींचा तातडीने शोध घेण्याच्या सूचना दिल्या.

त्यानुसार परि. पोउनि संतोष खेडकर, पोहेकॉ विजय खैरे, पोहेकॉ योगेश जाधव, पोहेकॉ अनिल साळुंखे, पोलिस कॉन्स्टेबल निलेश घुगे, नवजीत चौधरी, अमोल वंजारी, पराग दुसाने आणि रवींद्र साबळे यांच्या पथकाने शोधमोहीम सुरू केली.

तांत्रिक माहिती आणि मिळालेल्या लोकेशनच्या आधारे पोलिसांनी आरोपींचा माग काढला. शोधमोहीम राबवित अखेर चारही आरोपींना शनिपेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीतून ताब्यात घेण्यात आले. पोलीस अधीक्षक श्रीकांत धीवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावित, पोलीस उपविभागीय अधिकारी नितीन गणपुरे आणि पोलीस निरीक्षक डॉ. विशाल जयस्वाल यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

ताब्यात घेतलेल्या चारही आरोपींची माहिती हिमाचल प्रदेशातील संबंधित पोलिस ठाण्याच्या तपासी अधिकाऱ्यांना देण्यात आली आहे. पुढील कायदेशीर कारवाईसाठी हिमाचल प्रदेश पोलिसांशी समन्वय साधण्यात येत असल्याचे शनिपेठ पोलिसांनी सांगितले.


 

Next Post
जिल्हास्तरीय शालेय खो-खो स्पर्धेला उत्साहात सुरुवात

जिल्हास्तरीय शालेय खो-खो स्पर्धेला उत्साहात सुरुवात

ताज्या बातम्या

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त शाहूनगरमध्ये ५ अंगणवाड्यांमध्ये खाऊ व भेटवस्तू वाटप
खान्देश

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त शाहूनगरमध्ये ५ अंगणवाड्यांमध्ये खाऊ व भेटवस्तू वाटप

October 1, 2026
जिल्हास्तरीय शालेय खो-खो स्पर्धेला उत्साहात सुरुवात
क्रिडा

जिल्हास्तरीय शालेय खो-खो स्पर्धेला उत्साहात सुरुवात

October 1, 2026
खून करून पळाले, रेल्वेने आले अन् जळगावात अडकले
खान्देश

खून करून पळाले, रेल्वेने आले अन् जळगावात अडकले

October 1, 2026
उपमहापौर मनोज चौधरी यांचा मिशन लक्षवेधच्या ॲथलेटिक्स खेळाडूंशी संवाद; खेळाडूंना दिले मोलाचे मार्गदर्शन
क्रिडा

उपमहापौर मनोज चौधरी यांचा मिशन लक्षवेधच्या ॲथलेटिक्स खेळाडूंशी संवाद; खेळाडूंना दिले मोलाचे मार्गदर्शन

October 1, 2026
फलकनाज शेखचे राज्यस्तरीय स्पर्धेत रौप्यपदक
जळगाव जिल्हा

फलकनाज शेखचे राज्यस्तरीय स्पर्धेत रौप्यपदक

October 1, 2026
गोदावरी अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांची जैन फार्म फ्रेश व गांधी तीर्थला भेट
खान्देश

गोदावरी अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांची जैन फार्म फ्रेश व गांधी तीर्थला भेट

October 1, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add