• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

व्यसनमुक्तीचा युवकांना संदेश ‘सेवा संकल्प अभियानांतर्गत जळगावात कार्यक्रम

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
October 1, 2026
in खान्देश, जळगाव जिल्हा
0
व्यसनमुक्तीचा युवकांना संदेश ‘सेवा संकल्प अभियानांतर्गत जळगावात कार्यक्रम

जळगाव, प्रतिनिधी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत ‘सेवा संकल्प अभियान’ राबविण्यात येत आहे. या अभियानाचा एक भाग म्हणून जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयांतर्गत जनऔषधवैद्यकशास्त्र विभागाच्या वतीने सिंधी कॉलनी येथील समाज कल्याण विभागाच्या वसतिगृहातील विद्यार्थ्यांसाठी व्यसनमुक्ती तसेच रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

युवकांमध्ये व्यसनमुक्तीबाबत जनजागृती निर्माण करणे, अमली पदार्थ व अन्य व्यसनांपासून दूर राहण्यासाठी सकारात्मक विचारसरणी विकसित करणे तसेच निरोगी व सक्षम समाजनिर्मितीत युवकांचा सहभाग वाढविण्याच्या उद्देशाने व्यसनमुक्ती जनजागृती कार्यक्रमही घेण्यात आला.

यावेळी डॉ.शशांक गढळे यांनी कार्यक्रमाच्या प्रारंभी उपस्थितांची आरोग्य तपासणी केली. तसेच व्यसनमुक्ती जनजागृती व समुपदेशन करताना व्यसनांचे शारीरिक, मानसिक, सामाजिक आणि आर्थिक दुष्परिणाम याबाबत मार्गदर्शन केले. व्यसनमुक्त जीवनशैलीचे महत्त्व, व्यसनांपासून दूर राहण्याचे उपाय तसेच समाजात व्यसनमुक्तीचा संदेश पोहोचविण्यात युवकांची भूमिका याबाबत त्यांनी माहिती दिली. कार्यक्रमात विद्यार्थी व युवकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. उपस्थितांना व्यसनमुक्तीची शपथ देण्यात आली. तसेच ‘नशामुक्त भारत’ घडविण्यासाठी सामूहिक प्रयत्न करण्याचे आवाहन करण्यात आले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. मारुती पोटे व वैद्यकीय अधीक्षक डॉ.योगिता बावस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि डॉ. विलास मालकर यांच्या समन्वयाने सहायक प्राध्यापक डॉ. महेश चव्हाण, डॉ. अमृता शास्त्री, औषधीवैद्यकशास्त्र विभागातील वरिष्ठ व कनिष्ठ निवासी डॉक्टर, आंतरवासीयता विद्यार्थी तसेच कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

Next Post
सहकारी संस्थांशी संबंधित लोकशाही दिन ५ ऑक्टोबर रोजी

सहकारी संस्थांशी संबंधित लोकशाही दिन ५ ऑक्टोबर रोजी

ताज्या बातम्या

उपमहापौर मनोज चौधरी यांचा मिशन लक्षवेधच्या ॲथलेटिक्स खेळाडूंशी संवाद; खेळाडूंना दिले मोलाचे मार्गदर्शन
क्रिडा

उपमहापौर मनोज चौधरी यांचा मिशन लक्षवेधच्या ॲथलेटिक्स खेळाडूंशी संवाद; खेळाडूंना दिले मोलाचे मार्गदर्शन

October 1, 2026
फलकनाज शेखचे राज्यस्तरीय स्पर्धेत रौप्यपदक
जळगाव जिल्हा

फलकनाज शेखचे राज्यस्तरीय स्पर्धेत रौप्यपदक

October 1, 2026
गोदावरी अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांची जैन फार्म फ्रेश व गांधी तीर्थला भेट
खान्देश

गोदावरी अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांची जैन फार्म फ्रेश व गांधी तीर्थला भेट

October 1, 2026
सहकारी संस्थांशी संबंधित लोकशाही दिन ५ ऑक्टोबर रोजी
खान्देश

सहकारी संस्थांशी संबंधित लोकशाही दिन ५ ऑक्टोबर रोजी

October 1, 2026
व्यसनमुक्तीचा युवकांना संदेश ‘सेवा संकल्प अभियानांतर्गत जळगावात कार्यक्रम
खान्देश

व्यसनमुक्तीचा युवकांना संदेश ‘सेवा संकल्प अभियानांतर्गत जळगावात कार्यक्रम

October 1, 2026
गांधी जयंतीनिमित्त अहिंसा सद्भावना शांती रॅली; गांधी रिसर्च फाउंडेशनतर्फे विविध कार्यक्रम
जळगाव जिल्हा

गांधी जयंतीनिमित्त अहिंसा सद्भावना शांती रॅली; गांधी रिसर्च फाउंडेशनतर्फे विविध कार्यक्रम

October 1, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add