• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात स्मार्ट इंडिया हॅकाथॉन उत्साहात

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
September 16, 2026
in गुन्हे, जळगाव जिल्हा, शैक्षणिक, सामाजिक
0
गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात स्मार्ट इंडिया हॅकाथॉन उत्साहात

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात स्मार्ट इंडिया हॅकाथॉन उत्साहात
जळगाव : विद्यार्थ्यांमध्ये नावीन्यपूर्ण विचार,समस्या सोडविण्याची क्षमता, तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर आणि उद्योजकतेची भावना विकसित करण्याच्या उद्देशाने भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाच्या स्मार्ट इंडिया हॅकाथॉन २०२६ अंतर्गत गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात १५ सप्टेंबर रोजी इंटरनल हॅकाथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.
स्पर्धेचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील, प्रमुख परीक्षक व युवा उद्योजक अजिंक्य तोतला, तसेच अधिष्ठाता व विभागप्रमुखांच्या उपस्थितीत झाले. प्रारंभी महाविद्यालयीन समन्वयक डॉ. अतुल बर्हाटे यांनी स्मार्ट इंडिया हॅकाथॉनची संकल्पना, स्पर्धेचे स्वरूप आणि विद्यार्थ्यांना उपलब्ध होणार्या संधी याबाबत मार्गदर्शन केले. स्पर्धेत विद्यार्थ्यांच्या विविध संघांनी सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर या विभागांमध्ये दिलेल्या समस्यांवर आधारित नावीन्यपूर्ण कल्पना व तंत्रज्ञानाधारित उपाय सादर केले. विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत आपल्या कल्पनांचे प्रभावी सादरीकरण केले.स्पर्धेचे परीक्षण अजिंक्य तोतला यांनी केले. अंतर्गत परीक्षणासाठी डॉ. निलेश चौधरी, डॉ. सचिन महेश्री आणि डॉ. किशोर महाजन यांनी परीक्षक म्हणून जबाबदारी पार पाडली. समारोपप्रसंगी तोतला यांनी विद्यार्थ्यांच्या सादरीकरणाचे कौतुक करून संवादकौशल्य, शब्दसंग्रह, देहबोली आणि मुद्देसूद मांडणी यावर अधिक भर देण्याचे आवाहन केले. झालेल्या चुका ओळखून त्यातून शिकत पुढील संधींसाठी अधिक सक्षम होण्याचा संदेश त्यांनी दिला.विजेते संघ :प्रथम अल्गोनिक्स संघ, द्वितीय डिजिटल टायटन्स संघ, तृतीय अॅग्निटर्स एक्स संघ.सूत्रसंचालन रिद्धी भिरुड, मोईश नारखेडे, प्रतीक वारके आणि डिंकी शदानी यांनी केले. कार्यक्रमाच्या आयोजनाबद्दल गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील, सचिव डॉ. वर्षा पाटील, सदस्य डॉ. केतकी पाटील, डॉ. वैभव पाटील आणि डॉ. अनिकेत पाटील यांनी कौतुक केले.

ताज्या बातम्या

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात स्मार्ट इंडिया हॅकाथॉन उत्साहात
गुन्हे

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात स्मार्ट इंडिया हॅकाथॉन उत्साहात

September 16, 2026
नदी संवर्धनासाठी लोकसहभाग आवश्यक : जलपुरुष डॉ.राजेंद्र सिंहजी
खान्देश

नदी संवर्धनासाठी लोकसहभाग आवश्यक : जलपुरुष डॉ.राजेंद्र सिंहजी

September 16, 2026
बोगस हजेरी, कामगारांच्या पिळवणुकीची तक्रार; स्वच्छता निरीक्षकाची मूळ पदावर गच्छंती
खान्देश

बोगस हजेरी, कामगारांच्या पिळवणुकीची तक्रार; स्वच्छता निरीक्षकाची मूळ पदावर गच्छंती

September 16, 2026
उद्दिष्टकेंद्रीत नियोजनातून सेवा संकल्प अभियान यशस्वीपणे राबवा जिल्हाधिकारी 
जळगाव जिल्हा

उद्दिष्टकेंद्रीत नियोजनातून सेवा संकल्प अभियान यशस्वीपणे राबवा जिल्हाधिकारी 

September 16, 2026
अवैध वाळू वाहतुकीवर पोलिसांचा दणका; डंपर, ट्रॅक्टरसह साडेचार लाखांचा मुद्देमाल जप्त
गुन्हे

गुलाल अंगावर टाकल्याचा जाब विचारला अन् भावांवर दगडफेक

September 16, 2026
टायर फुटल्याने ४०७ मालवाहू टेम्पोचा अपघात; दोन हमालांचा जागीच मृत्यू
गुन्हे

टायर फुटल्याने ४०७ मालवाहू टेम्पोचा अपघात; दोन हमालांचा जागीच मृत्यू

September 16, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add