• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

गुलाल अंगावर टाकल्याचा जाब विचारला अन् भावांवर दगडफेक

दोघे जखमी; चारचाकीची तोडफोड, तिघांविरुद्ध गुन्हा

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
September 17, 2026
in गुन्हे, जळगाव जिल्हा
0
अवैध वाळू वाहतुकीवर पोलिसांचा दणका; डंपर, ट्रॅक्टरसह साडेचार लाखांचा मुद्देमाल जप्त

जळगाव, प्रतिनिधी : गणेशोत्सवादरम्यान गुलाल अंगावर टाकल्याचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या तरुणासह त्याच्या भावाला तिघांनी मारहाण करून दगडफेक केल्याची घटना शहरातील सबजेलच्या मागील बाजूस असलेल्या गणेशनगर परिसरात घडली. या दगडफेकीत दोघे भाऊ जखमी झाले असून, नातेवाईकांच्या चारचाकी वाहनाचेही नुकसान झाले आहे. याप्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ओम रविंद्र सोनवणे (वय २०, रा. कलाभवन, नेहते कॉम्प्लेक्स) यांनी याबाबत पोलिसांत फिर्याद दिली आहे. ओम हे १४ सप्टेंबर रोजी रात्री त्यांचा भाऊ शुभम सोनवणे याच्यासोबत सबजेलच्या मागील बाजूस राहणाऱ्या आत्याकडे जेवणासाठी गेले होते. जेवण आटोपून दोघे भाऊ रात्री साडेअकराच्या सुमारास घरी परतत असताना त्यांच्या परिचयातील विक्की बाविस्कर, सनी बाविस्कर आणि आणखी एक जण रस्त्यावर गुलाल उधळत होते. यावेळी त्यांनी शुभम सोनवणे यांच्या अंगावर गुलाल टाकला.

याचा जाब विचारण्यासाठी ओम सोनवणे त्यांच्याकडे गेले असता तिघांनी ओम आणि शुभम या दोघा भावांना मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यानंतर तिघांनी रस्त्यावर पडलेले दगड उचलून दोघांच्या दिशेने फेकले. यावेळी तिघांपैकी एकाने शुभम यांच्या कमरेवर लाकडी दांडक्याने मारहाण केल्याने ते जखमी झाले.

दरम्यान, आरोपींकडून करण्यात आलेल्या दगडफेकीत ओम सोनवणे यांच्या नातेवाईकांच्या चारचाकी वाहनाचेही नुकसान झाले. वाहनाची तोडफोड झाल्याने नुकसान झाले आहे. या घटनेप्रकरणी ओम रविंद्र सोनवणे यांच्या फिर्यादीवरून विक्की बाविस्कर, सनी बाविस्कर आणि त्यांच्या अन्य एका साथीदाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

Next Post
उद्दिष्टकेंद्रीत नियोजनातून सेवा संकल्प अभियान यशस्वीपणे राबवा जिल्हाधिकारी 

उद्दिष्टकेंद्रीत नियोजनातून सेवा संकल्प अभियान यशस्वीपणे राबवा जिल्हाधिकारी 

ताज्या बातम्या

जळगाव जिल्हा बॅडमिंटन चॅम्पियनशिप २०२६ उत्साहात
क्रिडा

जळगाव जिल्हा बॅडमिंटन चॅम्पियनशिप २०२६ उत्साहात

September 17, 2026
आंतरजातीय विवाहास प्रोत्साहन देण्यासाठी ११८ लाभार्थ्यांना अनुदानाचा लाभ
खान्देश

आंतरजातीय विवाहास प्रोत्साहन देण्यासाठी ११८ लाभार्थ्यांना अनुदानाचा लाभ

September 17, 2026
गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात स्मार्ट इंडिया हॅकाथॉन उत्साहात
जळगाव जिल्हा

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात स्मार्ट इंडिया हॅकाथॉन उत्साहात

September 17, 2026
नदी संवर्धनासाठी लोकसहभाग आवश्यक : जलपुरुष डॉ.राजेंद्र सिंहजी
जळगाव जिल्हा

नदी संवर्धनासाठी लोकसहभाग आवश्यक : जलपुरुष डॉ.राजेंद्र सिंहजी

September 17, 2026
बोगस हजेरी, कामगारांच्या पिळवणुकीची तक्रार; स्वच्छता निरीक्षकाची मूळ पदावर गच्छंती
जळगाव जिल्हा

बोगस हजेरी, कामगारांच्या पिळवणुकीची तक्रार; स्वच्छता निरीक्षकाची मूळ पदावर गच्छंती

September 17, 2026
उद्दिष्टकेंद्रीत नियोजनातून सेवा संकल्प अभियान यशस्वीपणे राबवा जिल्हाधिकारी 
जळगाव जिल्हा

उद्दिष्टकेंद्रीत नियोजनातून सेवा संकल्प अभियान यशस्वीपणे राबवा जिल्हाधिकारी 

September 17, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add