जळगाव | प्रतिनिधी

वाघूर उच्चदाब ३३ केव्ही वीजवाहिनीवरील देखभाल व दुरुस्तीचे काम शनिवारी, १२ सप्टेंबर रोजी करण्यात येणार असल्याने जळगाव शहरातील नियोजित पाणीपुरवठा एक दिवस लांबणीवर पडणार आहे. त्यामुळे शनिवारी होणारा नियोजित पाणीपुरवठा करण्यात येणार नसून तो रविवारी, १३ सप्टेंबर रोजी करण्यात येणार आहे.

या बदलामुळे शहरातील पुढील दिवसांचा पाणीपुरवठाही एक दिवसाने पुढे ढकलण्यात आला आहे. त्यानुसार १२ सप्टेंबरचा नियोजित पाणीपुरवठा १३ सप्टेंबरला, तर १४ सप्टेंबरचा नियोजित पाणीपुरवठा १५ सप्टेंबरला करण्यात येणार आहे.

वीजवाहिनीवरील देखभाल व दुरुस्तीचे काम आवश्यक असल्याने हा बदल करण्यात आला असून नागरिकांनी सुधारित पाणीपुरवठा वेळापत्रकाची नोंद घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.









