जळगाव, दि. 21 – तालुक्यातील शिरसोली येथे नुकतीच प्राजक्ता बारी हिच्या संशयास्पद मृत्यूची घटना घडलीये. दरम्यान प्राजक्ताच्या नातेवाईकांनी तिच्या सासरच्या मंडळींना दोशी ठरवत, हूंडाबळीमुळे आमच्या मुलीचा मृत्यू झाला असल्याचा आरोप केलायं. यासंदर्भात सामाजिक कार्यकर्त्या मंगला बारी यांच्यासह मुलीच्या नातेवाईकांनी शुक्रवारी पोलीस विभागाला निवेदन दिले.
दरम्यान या प्रकरणात मुलीच्या सासरकडील मंडळींना अटक करण्यात आली असून, पोलिसांनी कुणालाही पाठीशी घालू नये. या घटनेची सखोल चौकशी करत दोषींना कठोर शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी निवेदनात करण्यात आलीये.