• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

भुसावळच्या राजकारणाला नवे वळण; अनिल चौधरी, नगराध्यक्षा गायत्री भंगाळे, निखिल चौधरी शिवसेनेत

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
September 3, 2026
in जळगाव जिल्हा, राजकीय
0
भुसावळच्या राजकारणाला नवे वळण; अनिल चौधरी, नगराध्यक्षा गायत्री भंगाळे, निखिल चौधरी शिवसेनेत

जळगाव, (प्रतिनिधी) : भुसावळच्या राजकारणात बुधवारी रात्री मोठी राजकीय घडामोड घडली असून, आगामी काळातील राजकीय समीकरणांना यामुळे नवे वळण मिळण्याची शक्यता आहे. मुंबईतील नंदवन येथे राज्याचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर आणि विचारांवर विश्वास व्यक्त करत प्रहारचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष अनिल चौधरी, भुसावळच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा गायत्री भंगाळे आणि माजी आमदार संतोष चौधरी यांचे सुपुत्र निखिल चौधरी यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.

या प्रवेशामुळे भुसावळच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले असून, स्थानिक पातळीवर शिवसेनेची संघटनात्मक ताकद वाढण्यासोबतच आगामी काळात नवे राजकीय समीकरण आकाराला येण्याची शक्यता व्यक्त होत आहे. भुसावळ आणि जळगाव जिल्ह्याच्या विकासाला गती देणे, शिवसेनेची संघटना अधिक मजबूत करणे आणि सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांसाठी अधिक प्रभावीपणे काम करणे, हा या राजकीय निर्णयामागील प्रमुख उद्देश असल्याचे सांगण्यात आले.

या पक्षप्रवेशावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, आमदार किशोर पाटील, बच्चू कडू, आमदार चंद्रकांत सोनवणे, आमदार चंद्रकांत पाटील, आमदार अमोल पाटील, सरिता माळी-कोल्हे, जिल्हाप्रमुख समाधान महाजन यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

अनिल चौधरी, लोकनियुक्त नगराध्यक्षा गायत्री भंगाळे आणि निखिल चौधरी यांच्या शिवसेना प्रवेशामुळे भुसावळमध्ये पक्षाची राजकीय ताकद किती वाढणार, आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या प्रवेशाचा नेमका परिणाम काय होणार, याकडे आता जिल्ह्यातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. या पक्षप्रवेशामुळे भुसावळच्या राजकारणातील पुढील डावपेचांना वेग येण्याची शक्यता असून, येत्या काळात कोणते नवे राजकीय समीकरण आकाराला येते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.


 

Next Post
स्पा सेंटरच्या नावाखाली देहविक्री! सहा महिलांची सुटका, मालकासह जागामालकावर गुन्हा

स्पा सेंटरच्या नावाखाली देहविक्री! सहा महिलांची सुटका, मालकासह जागामालकावर गुन्हा

ताज्या बातम्या

सणासुदीत जळगावकरांना रेल्वेचा दिलासा! पानिपतसाठी विशेष गाडी धावणार
खान्देश

सणासुदीत जळगावकरांना रेल्वेचा दिलासा! पानिपतसाठी विशेष गाडी धावणार

October 21, 2026
जळगावमध्ये ‘श्री दुर्गामाता महादौड’ उत्साहात संपन्न; राष्ट्रभक्तीच्या महापुरात उजळला इतिहास
जळगाव जिल्हा

जळगावमध्ये ‘श्री दुर्गामाता महादौड’ उत्साहात संपन्न; राष्ट्रभक्तीच्या महापुरात उजळला इतिहास

October 20, 2026
गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये ‘गरबा नी गूंज’द्वारे भक्तीचा जागर
जळगाव जिल्हा

गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये ‘गरबा नी गूंज’द्वारे भक्तीचा जागर

October 20, 2026
नेहरू चौक मित्र मंडळातर्फे विजयादशमीनिमित्त पारंपारिक शस्त्र व ध्वजपूजन सोहळा संपन्न
जळगाव जिल्हा

नेहरू चौक मित्र मंडळातर्फे विजयादशमीनिमित्त पारंपारिक शस्त्र व ध्वजपूजन सोहळा संपन्न

October 20, 2026
पाणी वाया घालवणाऱ्यांसह अनाधिकृत अतिक्रमणांवर कडक कारवाईचे आदेश
जळगाव जिल्हा

पाणी वाया घालवणाऱ्यांसह अनाधिकृत अतिक्रमणांवर कडक कारवाईचे आदेश

October 19, 2026
आंतरराष्ट्रीय बालिका दिनानिमित्त गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगतर्फे राष्ट्रीय रील्स स्पर्धेचे आयोजन
आरोग्य

आंतरराष्ट्रीय बालिका दिनानिमित्त गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगतर्फे राष्ट्रीय रील्स स्पर्धेचे आयोजन

October 19, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add