• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

नोकरीचे आमिष दाखवून चौघांची ४ लाखांची फसवणूक; फैजपूर पोलिसांत गुन्हा

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
August 24, 2026
in गुन्हे, जळगाव जिल्हा
0
रशियन कंपनीत गुंतवणुकीचे आमिष दाखवून जळगावातील वकिलाची साडेसात लाखांची फसवणूक; पुण्याच्या दोघांवर गुन्हा

नोकरीचे आमिष दाखवून चौघांची ४ लाखांची फसवणूक; फैजपूर पोलिसांत गुन्हा

फैजपूर | प्रतिनिधी : नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून एका ६९ वर्षीय सेवानिवृत्त व्यक्तीकडून तब्बल ४ लाख रुपये घेत फसवणूक केल्याप्रकरणी फैजपूर पोलिस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फैजपूर पोलिस ठाण्यात याप्रकरणी सीसीटीएनएस गुन्हा क्रमांक १७८/२०२६ नुसार भारतीय न्याय संहिता कलम ३१८(४), ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, फैजपूर तालुक्यातील मिल्लतनगर परिसरातील ६९ वर्षीय तक्रारदार शेख शकिल शेख दगू हे सेवानिवृत्त सहायक पोलीस फौजदार आहेत. त्यांच्या तक्रारीनुसार, इरफान शेख कामील मोमीन, हिना कैसर इरफान शेख मोमीन आणि कामील बिस्मिल्ला शेख मोमीन (सर्व रा. फातेमानगर, कुसुंबे शिवार, एमआयडीसी, जळगाव) यांनी संगनमत करून त्यांचा विश्वास संपादन केला.

फॅक्टरीमध्ये नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवत त्यांच्याकडून २ लाख रुपये घेतले. तसेच जळगाव-कुसुंबे शिवारातील गट क्रमांक ३७/०३/०३ मधील प्लॉट क्रमांक ३६ या मालमत्तेबाबत स्टॅम्प पेपरवर ताबेगहाण करण्याची नोटरी करून दिल्याचे तक्रारीत नमूद आहे.

तक्रारदाराच्या मुलाला बँकेत नोकरी लावून देण्याचे हमीपत्र करून देत पुन्हा २ लाख रुपये घेतल्याचेही तक्रारीत म्हटले आहे. अशा प्रकारे नोकरीचे आमिष दाखवून एकूण ४ लाख रुपये रोख घेत फसवणूक व विश्वासघात केल्याचा आरोप आहे.

या प्रकरणी तक्रारदाराच्या फिर्यादीवरून फैजपूर पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विनोद गाभणे करीत आहेत.

Next Post
अनुभूती बालनिकेतन विद्यानिकेतन च्या शिक्षकांची ‘पालकांशी थेट भेट’

अनुभूती बालनिकेतन विद्यानिकेतन च्या शिक्षकांची ‘पालकांशी थेट भेट’

ताज्या बातम्या

माणूस केंद्रस्थानी असलेले साहित्यच चिरंतन – कवि किरण येले
जळगाव जिल्हा

माणूस केंद्रस्थानी असलेले साहित्यच चिरंतन – कवि किरण येले

August 24, 2026
जनतेची लूट करून कुठला विकास दाखवताय? शिवसेना जळगाव महानगरतर्फे सरकारचा तीव्र निषेध
खान्देश

जनतेची लूट करून कुठला विकास दाखवताय? शिवसेना जळगाव महानगरतर्फे सरकारचा तीव्र निषेध

August 24, 2026
अनुभूती बालनिकेतन विद्यानिकेतन च्या शिक्षकांची ‘पालकांशी थेट भेट’
गुन्हे

अनुभूती बालनिकेतन विद्यानिकेतन च्या शिक्षकांची ‘पालकांशी थेट भेट’

August 24, 2026
रशियन कंपनीत गुंतवणुकीचे आमिष दाखवून जळगावातील वकिलाची साडेसात लाखांची फसवणूक; पुण्याच्या दोघांवर गुन्हा
गुन्हे

नोकरीचे आमिष दाखवून चौघांची ४ लाखांची फसवणूक; फैजपूर पोलिसांत गुन्हा

August 24, 2026
मुक्ताईनगरात गॅस गोडाऊन फोडून ८४ हजारांचे ४६ सिलिंडर लांबवले
गुन्हे

शिवीगाळ केल्याच्या रागातून तरुणाला मारहाण; चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

August 24, 2026
१२ वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार करणाऱ्या नराधम बापाला अटक
गुन्हे

१२ वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार करणाऱ्या नराधम बापाला अटक

August 24, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add