• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

जळगावच्या महफिल रेस्टो बारला पहाटे आग; एसी, वायरिंगसह फर्निचर जळून खाक

नेहरू चौकातील हॉटेलमध्ये शॉर्टसर्किटमुळे आग; अग्निशामक दलाच्या तीन बंबांनी आगीवर मिळवले नियंत्रण

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
August 22, 2026
in गुन्हे, जळगाव जिल्हा
0
जळगावच्या महफिल रेस्टो बारला पहाटे आग; एसी, वायरिंगसह फर्निचर जळून खाक

जळगावच्या महफिल रेस्टो बारला पहाटे आग; एसी, वायरिंगसह फर्निचर जळून खाक

नेहरू चौकातील हॉटेलमध्ये शॉर्टसर्किटमुळे आग; अग्निशामक दलाच्या तीन बंबांनी आगीवर मिळवले नियंत्रण

जळगाव | प्रतिनिधी : शहरातील नेहरू चौक परिसरात असलेल्या महफिल रेस्टो बार या हॉटेलला शनिवारी पहाटे पावणे सहा वाजेच्या सुमारास अचानक आग लागल्याची घटना घडली. शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत असून, या आगीत हॉटेलमधील एसी, वायरिंग, टेबल-खुर्च्या, फ्रिज तसेच फॅमिली बारचा भाग जळून मोठे नुकसान झाले आहे.

महफिल रेस्टो बारमधून पहाटेच्या सुमारास धूर आणि आग दिसून आल्यानंतर घटनेची माहिती तातडीने अग्निशामक दलाला देण्यात आली. माहिती मिळताच महापालिका अग्निशामक दलाने तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. गोलाणी मार्केट अग्निशमन केंद्रातील दोन बंब, तसेच महाबळ अग्निशमन केंद्रातील एक बंब असे एकूण तीन अग्निशमन बंब घटनास्थळी दाखल झाले.

https://khandeshprabhat.com/wp-content/uploads/2026/08/WhatsApp-Video-2026-08-22-at-2.38.45-PM2.mp4
https://khandeshprabhat.com/wp-content/uploads/2026/08/WhatsApp-Video-2026-08-22-at-2.38.45-PM1.mp4

अग्निशामक दलाच्या जवानांनी पाण्याचा मारा करत आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. काही वेळातच आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले. त्यामुळे आग हॉटेलच्या इतर भागात तसेच लगतच्या परिसरात पसरण्याचा धोका टळला.

या आगीत हॉटेलमधील एसी, इलेक्ट्रिकल वायरिंग, टेबल-खुर्च्या, फ्रिज आणि फॅमिली बारचा भाग जळून खाक झाला. आगीत नेमके किती रुपयांचे नुकसान झाले, याचा अधिकृत पंचनामा झाल्यानंतरच स्पष्ट होणार आहे. मात्र, या घटनेत हजारो रुपयांचे नुकसान झाल्याचे प्राथमिक स्वरूपात समोर आले आहे.

आगीची माहिती मिळताच अग्निशामक दलाचे चालक व जवान तातडीने घटनास्थळी पोहोचले. अग्निशामक दलाचे चालक अक्षय नाईक, वाहन चालक देविदास सुरवाडे, वाहन चालक गोविंद माळी, फायरमन रोहिदास चौधरी, दीपक रौंदळे, रितेश सुरवाडे, ऋषभ सुरवाडे आणि विकी सोनवणे यांनी आग विझविण्यासाठी प्रयत्न केले.

दरम्यान, आग शॉर्टसर्किटमुळे लागली असल्याचा प्राथमिक अंदाज असून, आगीचे नेमके कारण तसेच नुकसानीचा अधिकृत आकडा तपासानंतर स्पष्ट होणार आहे.


 

Next Post
अक्षरदीप बहिणाई

अक्षरदीप बहिणाई

ताज्या बातम्या

पाचोरा येथे गॅरेजमधून ७७ हजारांची रोख रक्कम लांबवली
खान्देश

पाचोरा येथे गॅरेजमधून ७७ हजारांची रोख रक्कम लांबवली

August 22, 2026
डोळ्यात मिरचीची पूड फेकून ३ लाख १५ हजारांची जबरी चोरी
खान्देश

बंद घर फोडून सोन्याचे दागिने लांबवले

August 22, 2026
मुक्ताईनगरात गॅस गोडाऊन फोडून ८४ हजारांचे ४६ सिलिंडर लांबवले
खान्देश

रामानंदनगरात बंद घर फोडले; सोन्याच्या दागिन्यांसह रोकड लांबवली

August 22, 2026
अक्षरदीप बहिणाई
खान्देश

अक्षरदीप बहिणाई

August 22, 2026
जळगावच्या महफिल रेस्टो बारला पहाटे आग; एसी, वायरिंगसह फर्निचर जळून खाक
गुन्हे

जळगावच्या महफिल रेस्टो बारला पहाटे आग; एसी, वायरिंगसह फर्निचर जळून खाक

August 22, 2026
वाहून जाणारा पाण्याचा प्रत्येक थेंब अडवा; जलसंधारणाला लोकचळवळीचे स्वरूप द्या
खान्देश

वाहून जाणारा पाण्याचा प्रत्येक थेंब अडवा; जलसंधारणाला लोकचळवळीचे स्वरूप द्या

August 21, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add