• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

भाजयुमोच्या कार्यकर्त्यांविरोधात युवासेनेचे पोलिस अधीक्षकांना निवेदन

आंदोलकांवर गुन्हे दाखल करून कारवाईची मागणी

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
January 19, 2022
in गुन्हे, जळगाव जिल्हा, राजकीय
0
भाजयुमोच्या कार्यकर्त्यांविरोधात युवासेनेचे पोलिस अधीक्षकांना निवेदन

जळगाव, दि. 19 – विद्यापीठ कायदा सुधारणा विधेयकाविरोधात भारतीय जनता पक्षाकडून विरोध होत आहे. दरम्यान जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या घरासमोर भारतीय जनता युवा मोर्चाच्या सदस्यांनी काळी रांगोळी टाकून आंदोलन केले होते. या आंदोलनाचा निषेध करत आंदोलन करणाऱ्या विरोधात कारवाई करण्याच्या मागणीचे निवेदन युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी पोलीस अधीक्षक डॉक्टर प्रवीण मुंडे यांना दिले.

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या घरासमोर भारतीय जनता युवा मोर्चा च्या पदाधिकाऱ्यांनी गनिमी काव्याने काळी रांगोळी टाकून विरोध केला व घोषणाबाजी केली. भाजयुमोची निषेध व्यक्त करण्याची ही कोणती पद्धत? असा प्रश्न उपस्थित करत रात्रीबेरात्री कुणाच्या निवासस्थानी जाऊन असे आंदोलन म्हणजे समाजातील शांतता भंग करण्यासाठीचा ठरवून केल्याचा प्रकार असल्याचे निवेदनात म्हटले आहे. या प्रकारात दोषींवर गुन्हे दाखल करून कारवाई कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.

यावेळी युवासेनेचे सहसचिव विराज कावडीया, जिल्हा युवा अधिकारी शिवराज पाटील, स्वप्निल परदेशी, विशाल वाणी, विकास पाटील, सचिन चौधरी, यश सपकाळे, विजय लाड, निलेश वाघ, राकेश चौधरी, गिरीश सपकाळे, सागर हिवराळे, अमोल मोरे, वैष्णवी खैरनार, अमित जगताप, प्रितम शिंदे, शंतनू नारखेडे आदी उपस्थित होते.

Next Post
डॉ.उल्हास पाटील रुग्णालयात नाक-कान-घसा तपासणी शिबिर

डॉ.उल्हास पाटील रुग्णालयात नाक-कान-घसा तपासणी शिबिर

ताज्या बातम्या

मेहरुण येथे श्रीराम प्रभू संघातर्फे ज्येष्ठ नागरिकांचा वाढदिवस उत्साहात साजरा
जळगाव जिल्हा

मेहरुण येथे श्रीराम प्रभू संघातर्फे ज्येष्ठ नागरिकांचा वाढदिवस उत्साहात साजरा

May 31, 2026
जैन हिल्स येथे फाली-१२ वार्षिक अधिवेशन; १५०० विद्यार्थी करणार कृषी उद्योजकतेचे सादरीकरण
कृषी

जैन हिल्स येथे फाली-१२ वार्षिक अधिवेशन; १५०० विद्यार्थी करणार कृषी उद्योजकतेचे सादरीकरण

May 31, 2026
महिलांच्या आरोग्य हक्कांविषयी जनजागृतीसाठी परिसंवाद; गोदावरी नर्सिंग महाविद्यालयाचा उपक्रम
आरोग्य

महिलांच्या आरोग्य हक्कांविषयी जनजागृतीसाठी परिसंवाद; गोदावरी नर्सिंग महाविद्यालयाचा उपक्रम

May 30, 2026
आय.पी.एल. चा थरार जळगावकर अनुभवणार एलईडी स्क्रीनवर!
क्रिडा

आय.पी.एल. चा थरार जळगावकर अनुभवणार एलईडी स्क्रीनवर!

May 30, 2026
चोपड्यात वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश; ६ महिलांची सुटका, ११ जणांवर गुन्हा दाखल
गुन्हे

चोपड्यात वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश; ६ महिलांची सुटका, ११ जणांवर गुन्हा दाखल

May 30, 2026
भुसावळात ३० हजारांची लाच मागणाऱ्या फौजदारासह खाजगी इसमावर गुन्हा; पोलीस उपनिरीक्षक फरार!
गुन्हे

भुसावळात ३० हजारांची लाच मागणाऱ्या फौजदारासह खाजगी इसमावर गुन्हा; पोलीस उपनिरीक्षक फरार!

May 29, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group