जळगाव, दि. 19 – विद्यापीठ कायदा सुधारणा विधेयकाविरोधात भारतीय जनता पक्षाकडून विरोध होत आहे. दरम्यान जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या घरासमोर भारतीय जनता युवा मोर्चाच्या सदस्यांनी काळी रांगोळी टाकून आंदोलन केले होते. या आंदोलनाचा निषेध करत आंदोलन करणाऱ्या विरोधात कारवाई करण्याच्या मागणीचे निवेदन युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी पोलीस अधीक्षक डॉक्टर प्रवीण मुंडे यांना दिले.
पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या घरासमोर भारतीय जनता युवा मोर्चा च्या पदाधिकाऱ्यांनी गनिमी काव्याने काळी रांगोळी टाकून विरोध केला व घोषणाबाजी केली. भाजयुमोची निषेध व्यक्त करण्याची ही कोणती पद्धत? असा प्रश्न उपस्थित करत रात्रीबेरात्री कुणाच्या निवासस्थानी जाऊन असे आंदोलन म्हणजे समाजातील शांतता भंग करण्यासाठीचा ठरवून केल्याचा प्रकार असल्याचे निवेदनात म्हटले आहे. या प्रकारात दोषींवर गुन्हे दाखल करून कारवाई कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
यावेळी युवासेनेचे सहसचिव विराज कावडीया, जिल्हा युवा अधिकारी शिवराज पाटील, स्वप्निल परदेशी, विशाल वाणी, विकास पाटील, सचिन चौधरी, यश सपकाळे, विजय लाड, निलेश वाघ, राकेश चौधरी, गिरीश सपकाळे, सागर हिवराळे, अमोल मोरे, वैष्णवी खैरनार, अमित जगताप, प्रितम शिंदे, शंतनू नारखेडे आदी उपस्थित होते.