• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

शहीद जवानांच्या परिवारांसाठी महादेव हॉस्पिटलमध्ये आरोग्य तपासणी शिबिर संपन्न

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
August 17, 2026
in आरोग्य, जळगाव जिल्हा
0
शहीद जवानांच्या परिवारांसाठी महादेव हॉस्पिटलमध्ये आरोग्य तपासणी शिबिर संपन्न

जळगाव, प्रतिनिधी : येथील महादेव सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल येथे ना. गिरीष महाजन यांच्या संकल्पनेतून शहीद जवानांच्या परिवारांच्या आरोग्याची विशेष काळजी घेण्याच्या उद्देशाने सर्व विभागांच्या तज्ज्ञ डॉक्टरांकडून आरोग्य तपासणी उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमाचे उद्घाटन विरमाता अनुसयाबाई शिंदे, विरपत्नी व माजी सैनिक यांच्यासह माजी खासदार डॉ.उल्हास पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी डीएम कार्डिओलॉजिस्ट डॉ. वैभव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हॉस्पिटलमधील विविध विभागांतील तज्ज्ञ डॉक्टरांनी उपस्थितांची आरोग्य तपासणी केली. हृदयविकार, रक्तदाब, मधुमेह तसेच इतर आवश्यक आरोग्यविषयक तपासण्या करण्यात आल्या. कार्यक्रमाच्या प्रारंभी माजी खासदार डॉ. उल्हास पाटील, सैनिक सेलचे सी.डी.पाटील, श्री. बडगुजर, जी एम फाउंडेशनचे उदय भालेराव, पितांबर भावसार, वैद्यकीय संचालक डॉ.एन.एस. आर्विकर यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर भारत मातेचे पूजन करून शहीद जवानांना आदरांजली अर्पण करण्यात आली. तसेच वीर माता व वीर पत्नी यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी मार्गदर्शन करताना माजी खासदार डॉ. उल्हास पाटील म्हणाले, “देशाच्या रक्षणासाठी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या शहीद जवानांच्या परिवारांची जबाबदारी ही आपली सर्वांची आहे. त्यांच्या आरोग्यासाठी ना.गिरीश महाजन यांच्या सहकार्याने महादेव हॉस्पिटल सदैव तत्पर राहील. शहीद जवानांच्या कुटुंबीयांना आवश्यक वैद्यकीय सेवा आणि योग्य उपचार उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.” देशसेवेसाठी बलिदान देणाऱ्या जवानांच्या कुटुंबीयांप्रती कृतज्ञता व्यक्त करत त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी अशा उपक्रमांचे सातत्याने आयोजन करण्याचा संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला.

ना.गिरीश महाजन यांनी व्हिडीओ कॉल द्वारे शाहिद जवान यांच्या परिवाराशी संवाद साधून त्यांचा आरोग्याची विचार पूस केली. कार्यक्रमास प्रमुख मान्यवार आमदार राजुमामा भोळे, भाजपा जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी, नगरसेविका उज्वला बेंडाळे, उदय भालेराव उपस्थित होते. आरोग्य दूत पितांबर भावसार यांनी शिबीर समन्वयक म्हणून काम केले. महादेव हॉस्पिटलचे एन.जी.चौधरी, तज्ञ् डॉक्टर, वैद्यकीय कर्मचारी, सैनिक सेलचे पदाधिकारी तसेच शहीद जवानांचे कुटुंबीय उपस्थित होते.


 

Next Post
मिशन राइज एक्सच्या यशासाठी युवकांचा सहभाग आवश्यक – श्रीकांत धिवरे

मिशन राइज एक्सच्या यशासाठी युवकांचा सहभाग आवश्यक - श्रीकांत धिवरे

ताज्या बातम्या

एसआयआर प्रक्रियेत कागदपत्रे सादर करण्याची सुविधा
खान्देश

एसआयआर प्रक्रियेत कागदपत्रे सादर करण्याची सुविधा

October 3, 2026
मुंबई WIRC टीमची जळगाव सीए शाखेला भेट
खान्देश

मुंबई WIRC टीमची जळगाव सीए शाखेला भेट

October 3, 2026
आदिवासी योजनांच्या सामाजिक परिणामांच्या विश्लेषण अहवालाचे आदिवासी विकास मंत्री यांच्या हस्ते प्रकाशन
खान्देश

आदिवासी योजनांच्या सामाजिक परिणामांच्या विश्लेषण अहवालाचे आदिवासी विकास मंत्री यांच्या हस्ते प्रकाशन

October 3, 2026
रिक्षात बसवून महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोत लांबविणारे तिघे जेरबंद
खान्देश

रिक्षात बसवून महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोत लांबविणारे तिघे जेरबंद

October 2, 2026
महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंतीनिमित्त ‘गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघटने’तर्फे मानवंदना
जळगाव जिल्हा

महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंतीनिमित्त ‘गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघटने’तर्फे मानवंदना

October 2, 2026
विकास दूध फेडरेशनमध्ये विद्यार्थ्यांनी अनुभवले आधुनिक ऑटोमेशनचे धडे
जळगाव जिल्हा

विकास दूध फेडरेशनमध्ये विद्यार्थ्यांनी अनुभवले आधुनिक ऑटोमेशनचे धडे

October 2, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add