• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

मध्यरात्री घरात घुसले अन् आईला दिली मुलाच्या हत्येची धमकी; तिघे जेरबंद

एमआयडीसी पोलिसांची कारवाई; आरोपीकडून गावठी कट्टा जप्त, न्यायालयाने दिली पोलीस कोठडी

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
August 16, 2026
in खान्देश, गुन्हे, जळगाव जिल्हा
0
मध्यरात्री घरात घुसले अन् आईला दिली मुलाच्या हत्येची धमकी; तिघे जेरबंद

जळगाव, प्रतिनिधी : जुन्या वादाचा राग मनात धरून मध्यरात्री तरुणाच्या घरात घुसत त्याच्या आईला मुलाच्या हत्येची धमकी देत दहशत निर्माण करणाऱ्या रेकॉर्डवरील तिघांच्या मुसक्या आवळण्यात एमआयडीसी पोलिसांना यश आले आहे. पोलिसांनी तिघांना अटक केली असून, त्यापैकी गणेश दंडगव्हाळ याच्याकडून गुन्ह्यात वापरलेला गावठी कट्टा जप्त करण्यात आला आहे.

२ ऑगस्ट रोजी रात्री साडेएकच्या सुमारास लक्ष्मीनगर परिसरातील आकाश अजय सोनार यांच्या घरात काही इसमांनी प्रवेश केला. रोशन उर्फ बबलू हिरामन मनोरे, अविनाश रामेश्वर राठोड, गणेश भास्कर दंडगव्हाळ, जिगर बोंडारे यांच्यासह अन्य तीन अनोळखी व्यक्ती या घटनेत सहभागी असल्याचे फिर्यादीत नमूद आहे. यावेळी एका आरोपीच्या हातात कोयता असल्याचेही सांगण्यात आले.

आकाश घरात नसल्याचे समजल्यानंतर आरोपींनी त्याच्या आईला शिवीगाळ करत आकाशचा आज मर्डर करतो, अशी धमकी दिल्याचा आरोप आहे. आकाश न मिळाल्याने संतप्त झालेल्या आरोपींनी घरावर दगडफेक करून दहशत निर्माण केल्याचे पोलिसांनी सांगितले.

या घटनेनंतर एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ६३९/२०२६ दाखल करण्यात आला. भारतीय न्याय संहितेतील विविध कलमांसह आर्म्स ॲक्टच्या कलम ३/२५ नुसार गुन्हा नोंदविण्यात आला. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी आरोपींच्या शोधासाठी गुन्हे शोध पथक सक्रिय केले.

पथकाने तिघांना उचलले

तपासादरम्यान पोलिसांनी १२ ऑगस्ट रोजी रोशन उर्फ बबलू हिरामन मनोरे (२५), गणेश भास्कर दंडगव्हाळ (२७) आणि अविनाश रामेश्वर राठोड (२७) यांना ताब्यात घेतले. चौकशीत गणेश दंडगव्हाळ याच्याकडून गुन्ह्यात वापरलेला गावठी कट्टा पोलिसांनी हस्तगत केला. अटक केलेल्या तिन्ही आरोपींना न्यायालयासमोर हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांची पोलीस कोठडी मंजूर केली आहे. या घटनेतील इतर आरोपींचा सहभाग तसेच गुन्ह्यात वापरण्यात आलेल्या शस्त्राबाबत पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली धडक कारवाई

ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत, उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे आणि एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत धनके, पोहेकॉ रामकृष्ण पाटील, पोलीस कॉन्स्टेबल नितीन ठाकूर, किरण पाटील, गणेश ठाकरे आणि राहुल घेटे यांच्या पथकाने आरोपींना जेरबंद केले.या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल रमेश चौधरी करीत आहेत.


 

Next Post
जैन इरिगेशनसह विविध आस्थापनांमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात

जैन इरिगेशनसह विविध आस्थापनांमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात

ताज्या बातम्या

एसआयआर प्रक्रियेत कागदपत्रे सादर करण्याची सुविधा
खान्देश

एसआयआर प्रक्रियेत कागदपत्रे सादर करण्याची सुविधा

October 3, 2026
मुंबई WIRC टीमची जळगाव सीए शाखेला भेट
खान्देश

मुंबई WIRC टीमची जळगाव सीए शाखेला भेट

October 3, 2026
आदिवासी योजनांच्या सामाजिक परिणामांच्या विश्लेषण अहवालाचे आदिवासी विकास मंत्री यांच्या हस्ते प्रकाशन
खान्देश

आदिवासी योजनांच्या सामाजिक परिणामांच्या विश्लेषण अहवालाचे आदिवासी विकास मंत्री यांच्या हस्ते प्रकाशन

October 3, 2026
रिक्षात बसवून महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोत लांबविणारे तिघे जेरबंद
खान्देश

रिक्षात बसवून महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोत लांबविणारे तिघे जेरबंद

October 2, 2026
महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंतीनिमित्त ‘गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघटने’तर्फे मानवंदना
जळगाव जिल्हा

महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंतीनिमित्त ‘गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघटने’तर्फे मानवंदना

October 2, 2026
विकास दूध फेडरेशनमध्ये विद्यार्थ्यांनी अनुभवले आधुनिक ऑटोमेशनचे धडे
जळगाव जिल्हा

विकास दूध फेडरेशनमध्ये विद्यार्थ्यांनी अनुभवले आधुनिक ऑटोमेशनचे धडे

October 2, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add