• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

अभाविप जळगाव महानगराची नूतन कार्यकारिणी जाहीर; प्रा. डॉ. अमरदीप पाटील अध्यक्ष तर आर्यन भालशंकर मंत्री

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
August 12, 2026
in जळगाव जिल्हा
0
अभाविप जळगाव महानगराची नूतन कार्यकारिणी जाहीर; प्रा. डॉ. अमरदीप पाटील अध्यक्ष तर आर्यन भालशंकर मंत्री

​जळगाव, (प्रतिनिधी) : अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (अभाविप), जळगाव महानगराच्या नूतन महानगर कार्यकारिणीची घोषणा मुळजी जेठा महाविद्यालयातील सोहम सभागृहात पार पडलेल्या विशेष कार्यक्रमात उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आली. या वेळी जळगाव महानगरासह तीन विविध नगरांच्या कार्यकारिणीची आणि शहरातील १० महाविद्यालय अध्यक्षांचीही अधिकृत घोषणा करण्यात आली.

​या नव्या कार्यकारिणीत जळगाव महानगर अध्यक्षपदी प्रा. डॉ. अमरदीप पाटील तर महानगर मंत्रीपदी आर्यन भालशंकर यांची निवड करण्यात आली आहे. तसेच महानगर सहमंत्री म्हणून मनोज कुंभारे व अंकुश सर्वेकर यांची नियुक्ती झाली आहे. याशिवाय, नगरांच्या जबाबदाऱ्यांमध्ये छत्रपती शिवाजी महाराज नगर अध्यक्षपदी प्रा. बिपाशा पात्रा व नगरमंत्रीपदी रमण चौधरी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर अध्यक्षपदी प्रा. दीपक पाटील व नगरमंत्रीपदी ओम गुरव, आणि विद्यापीठ नगर अध्यक्षपदी प्रा. प्रिती सोनी व नगरमंत्रीपदी आयुष महाजन यांची घोषणा करण्यात आली.

​या प्रसंगी मार्गदर्शन करताना देवगिरी प्रदेश मंत्री डॉ. वरुणराज नन्नवरे म्हणाले की, विद्यार्थी परिषद ही केवळ संघटनात्मक कार्य करणारी संस्था नसून विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणारे आणि समाजहितासाठी नेतृत्व घडविणारे व्यासपीठ आहे. नव्या कार्यकर्त्यांच्या नेतृत्वात जळगाव महानगरात विद्यार्थी चळवळीला अधिक व्यापक आणि सकारात्मक दिशा मिळेल. तर नवनिर्वाचित महानगर मंत्री आर्यन भालशंकर यांनी, शहरातील प्रत्येक महाविद्यालयापर्यंत अभाविपचे संघटन पोहोचवून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व सामाजिक प्रश्नांसाठी सातत्याने कार्य करण्याचा आणि सकारात्मक नेतृत्व उभे करण्याचा निर्धार व्यक्त केला.

​या सोहळ्याला देवगिरी प्रदेश संघटनमंत्री सिद्धेश्वर लटपटे, जळगाव विभाग संघटनमंत्री अजित केंद्रे, जिल्हा प्रमुख प्रा. डॉ. भूषण राजपूत यांच्यासह मोठ्या संख्येने विद्यार्थी व कार्यकर्ते उपस्थित होते. नवीन कार्यकारिणीच्या माध्यमातून जळगाव महानगरातील विद्यार्थी चळवळीला अधिक बळकटी देण्याचा संकल्प या वेळी करण्यात आला.


 

Next Post
संत नामदेव महाराजांचा ६७६ वा संजीवन समाधी सोहळा उत्साहात; टाळ-मृदुंगाच्या गजरात निघाली पालखी

संत नामदेव महाराजांचा ६७६ वा संजीवन समाधी सोहळा उत्साहात; टाळ-मृदुंगाच्या गजरात निघाली पालखी

ताज्या बातम्या

महसूल मंत्री यांचा बांधावर शेतकऱ्यांशी थेट संवाद
कृषी

महसूल मंत्री यांचा बांधावर शेतकऱ्यांशी थेट संवाद

October 4, 2026
१२ वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार करणाऱ्या नराधम बापाला अटक
खान्देश

इन्स्टाग्रामवरील ओळखीनंतर लग्नाचे आमिष देत तरुणीवर अत्याचार; तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल

October 4, 2026
अनुभूती निवासी स्कूलमध्ये सीआयएससीई अंडर-१७ राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन
क्रिडा

अनुभूती निवासी स्कूलमध्ये सीआयएससीई अंडर-१७ राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन

October 4, 2026
दुष्काळ निवारणासाठी जिल्हा नियोजनचा ५०० कोटींचा निधी वळवणार
Uncategorized

दुष्काळ निवारणासाठी जिल्हा नियोजनचा ५०० कोटींचा निधी वळवणार

October 4, 2026
पिके गेली, पंचनामे अडले; शेतकऱ्यांना हेक्टरी लाखाची मदत द्या
जळगाव जिल्हा

पिके गेली, पंचनामे अडले; शेतकऱ्यांना हेक्टरी लाखाची मदत द्या

October 4, 2026
कोळन्हावी येथे तरुणाची आत्महत्या
गुन्हे

कोळन्हावी येथे तरुणाची आत्महत्या

October 4, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add