• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

संत नामदेव महाराजांचा ६७६ वा संजीवन समाधी सोहळा उत्साहात; टाळ-मृदुंगाच्या गजरात निघाली पालखी

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
August 12, 2026
in सामाजिक
0
संत नामदेव महाराजांचा ६७६ वा संजीवन समाधी सोहळा उत्साहात; टाळ-मृदुंगाच्या गजरात निघाली पालखी

जळगाव, ( प्रतिनिधी ) : श्री क्षत्रिय अहिर शिंपी समाज हितवर्धक संस्था, युवक व महिला मंडळ तसेच शहरातील विविध सहयोगी संस्थांच्या संयुक्त विद्यमाने संत शिरोमणी नामदेव महाराज यांचा ६७६ वा संजीवन समाधी सोहळा अतिशय उत्साहात आणि जल्लोषात पार पडला. वरुणराजाच्या प्रसन्न हजेरीत आणि टाळ-मृदुंगाच्या गजरात निघालेल्या भव्य पालखी सोहळ्याने संपूर्ण परिसर विठ्ठलमय झाला होता.

​कार्यक्रमाची सुरुवात समाज मंदिर येथील संत नामदेव महाराजांच्या मूर्तीचे व पालखीचे पूजन माजी महापौर सीमा भोळे यांच्या हस्ते करून झाली. त्यानंतर पांझरापोळ चौकातून सुंदर बगिच्यासह पालखी सोहळ्याला प्रारंभ झाला. लेवा भवन येथे पालखीचा शानदार समारोप झाला. या दरम्यान श्री गुरुद्वारा साहेब येथे शीख बांधवांच्या वतीने पालखीवर भव्य पुष्पवृष्टी करून स्वागत करण्यात आले. सोहळ्यानंतर सुमारे १५०० समाज बांधवांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.

​मुख्य कार्यक्रमात संत नामदेव महाराजांच्या प्रतिमेचे पूजन महापौर दीपमाला काळे, उपमहापौर मनोज चौधरी, स्थायी समिती सभापती डॉ. चंद्रशेखर पाटील, नगरसेवक अमर जैन, नरेंद्र पाटील, रविकिरण कोंबडे, समाजाध्यक्ष विवेक जगताप यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते झाले. अध्यक्षांनी आपल्या मनोगतात पदभार स्वीकारल्यानंतरचा हा पहिलाच संजीवन समाधी सोहळा असून समाज बांधवांनी दिलेल्या भरभरून प्रतिसादाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. स्वागत अध्यक्ष शरदराव बिरारी यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.

याप्रसंगी समाजाच्या वतीने जळगाव शहरातील एका प्रमुख चौकाला ‘संत नामदेव – गुरुनानक देव चौक’ आणि उड्डाणपुलाला संत नामदेवांचे नाव देण्याबाबतचे निवेदन महापौर व उपमहापौर यांना देण्यात आले. तसेच माजी अध्यक्ष राजेंद्र कुमार सोनवणे यांच्या संकल्पनेतून समाजाच्या डिजिटल ऑनलाइन खानेसुमारी (जनगणना) फॉर्मचे अधिकृत लॉन्चिंग करण्यात आले.

यावेळी बंडू शिंपी, रवींद्र कापुरे, पी. टी. शिंपी, दिलीप भांडारकर, रघुनाथ कोल्हटकर यांच्यासह अनेक मान्यवर, संस्थांचे पदाधिकारी, युवक व महिला मंडळाचे कार्यकर्ते आणि जळगाव शहरातील रामेश्वर कॉलनी, पिंप्राळा, दादावाडी परिसरातील समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मनोज भांडारकर, दिलीप सोनवणे, अनिल खैरनार, चेतन खैरनार, प्रदीप शिंपी, गणेश सोनवणे, निलेश जगताप, सुनील सोनवणे, सुनील गांगुर्डे, महेश शिंपी, केतन मेटकर, आनंद शिंपी, भरत सोनवणे, देविदास शिंपी, हेमंत शिंपी, योगेश शिंपी, माधुरी शिंपी, प्रमोद निकुंभ, राजेंद्र सोनवणे, मुकुंद मेटकर, राजेंद्र बाविस्कर, सतीश जगताप, सुरेश सोनवणे, बापू खैरनार, राहुल शिंपी, जितेंद्र शिंपी, सुमित अहिराव यासह असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी अथक परिश्रम घेतले.


 

Next Post
राखीव वनक्षेत्रात ५०० रोपांची लागवड; ३ हजार सीड्स बॉलची पेरणी

राखीव वनक्षेत्रात ५०० रोपांची लागवड; ३ हजार सीड्स बॉलची पेरणी

ताज्या बातम्या

महसूल मंत्री यांचा बांधावर शेतकऱ्यांशी थेट संवाद
कृषी

महसूल मंत्री यांचा बांधावर शेतकऱ्यांशी थेट संवाद

October 4, 2026
१२ वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार करणाऱ्या नराधम बापाला अटक
खान्देश

इन्स्टाग्रामवरील ओळखीनंतर लग्नाचे आमिष देत तरुणीवर अत्याचार; तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल

October 4, 2026
अनुभूती निवासी स्कूलमध्ये सीआयएससीई अंडर-१७ राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन
क्रिडा

अनुभूती निवासी स्कूलमध्ये सीआयएससीई अंडर-१७ राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन

October 4, 2026
दुष्काळ निवारणासाठी जिल्हा नियोजनचा ५०० कोटींचा निधी वळवणार
Uncategorized

दुष्काळ निवारणासाठी जिल्हा नियोजनचा ५०० कोटींचा निधी वळवणार

October 4, 2026
पिके गेली, पंचनामे अडले; शेतकऱ्यांना हेक्टरी लाखाची मदत द्या
जळगाव जिल्हा

पिके गेली, पंचनामे अडले; शेतकऱ्यांना हेक्टरी लाखाची मदत द्या

October 4, 2026
कोळन्हावी येथे तरुणाची आत्महत्या
गुन्हे

कोळन्हावी येथे तरुणाची आत्महत्या

October 4, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add